दिघी रोड परिसरातील नागरिकांनी दिला विजयाच्या ‘हॅट्रिक’चा विश्वास
– फुगे, शिंदे कुटुंबीयांचा विश्वास, आदरतिथ्य पाहून महेश लांडगे भारावले!
– महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारात ग्रामस्थ एकवटले
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सर्वांच्या सोबतीने, सर्वांच्या बरोबरीने कुटुंबाची व्याख्या पूर्ण होत असते. चार-दोन लोकांच्या येण्या-जाण्याने कुटुंबाची चौकट मोडली जाऊ शकत नाही. आमदार महेश लांडगे आमच्यासाठी आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत होतो आणि कायम राहू, असे सांगत खंडोबा माळ, दिघी रोड परिसरातील फुगे, शिंदे कुटुंबियांनी यंदा आमदार महेश लांडगे यांच्या विजयाची ‘हॅट्रिक’ आम्हीच पूर्ण करणार असा विश्वास दिला.
भाजपा महायुतीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी प्रभाग क्रमांक सात येथील खंडोबा माळ, गजानन हाऊसिंग सोसायटी, विनायक रेसिडेन्सी, यांसह दिघी रोड परिसरामध्ये भेटी-गाठी घेत नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी फुगे, शिंदे तसेच भांबुर्डेकर या परिवारांनी आमदार महेश लांडगे यांचे स्वागत केले. या परिवाराची आपुलकी आणि जिव्हाळ्याने आमदार लांडगे अक्षरशः भारावले. माजी उपमहापौर कैलास भांबुर्डेकर, विजय फुगे, निवृत्ती फुगे, अतुल फुगे, यांसह समस्त फुगे, शिंदे परिवार यावेळी उपस्थित होता.
चार दोन लोकं म्हणजे कुटुंब नव्हे…
भेटी-गाठी दरम्यान फुगे परिवाराकडून भावना व्यक्त करण्यात आल्या. कुटुंब म्हणजे दुखा-सुखाची सोबत असते. चार दोन लोकांच्या विचारातून कुटुंबाची व्याख्या पूर्ण होत नसते. आमदार महेश लांडगे हे आमच्या कुटुंबातीलच एक व्यक्ती आहेत. त्यांच्या सोबत आम्ही कायम आहोत असा विश्वास यावेळी फुगे, शिंदे परिवाराकडून देण्यात आला.
भोसरी विधानसभा मतदारसंघ म्हणजे एक कुटुंब आहे. कुटुंबाच्या सुखदुःखात आमदार महेश लांडगे कायम सोबत असतात. त्यामुळेच त्यांनी शाश्वत विकासाची १० वर्ष यशस्वी पूर्ण केली आहेत. अनेक योजना, प्रकल्प आणि उपक्रमांनी भोसरी मतदारसंघाला नावारूपाला आणले. त्यामुळे यंदाही भोसरी एक कुटुंब म्हणून आमदार लांडगे यांच्या पाठीशी उभा राहील, असा आम्हाला विश्वास आहे.
– विजय फुगे, समन्वयक, महायुती, भोसरी विधानसभा.