अरुण पवार व बालाजी पवार बंधूचे दातृत्व गाईंच्या चाऱ्यासाठी गो शाळेला आर्थिक मदत
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व राज्यस्तरीय श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र अरुण पवार आणि लोकनियुक्त आदर्श सरपंच बालाजी पवार यांच्या यांनी दातृत्वाची पुन्हा प्रचिती देत गोशाळा चाऱ्यासाठी आर्थिक निधी गोशाळेला सुपूर्द केला.
श्री दत्त जयंती जन्मोत्सवानिमित्त कासारवाडीतील श्री दत्त साई सेवा कुंज येथील महोत्सवात ह. भ. प. संतोष महाराज पायगुडे यांच्या हस्ते कासारवाडी येथील श्री दत्त साई सेवाकुंज आश्रमाचे ह.भ. प. शिवानंद स्वामी महाराज यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी ह.भ. प. धारूतात्या बालवडकर, ह. भ. प. शेखर महाराज जांभुळकर, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ह. भ. प. विजय जगताप, ह. भ.प. पांडुरंग आप्पा दातार पाटील, ऍड. दिलीप करंजुले, ह. भ. प. निवृत्ती आबा कोळेकर, ह. भ. प. वसंतराव कलाटे, ह.भ.प. पांडुरंग भोईर, ह. भ. प. नानासाहेब उर्फ आदिनाथ शितोळे, ह. भ.प. शिवाजी शिंदे, (फौजी ) ह. भ. प. दीपक दातार आदी उपस्थित होते.
ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांनी मनोगत व्यक्त करताना अरुण पवार व बालाजी पवार यांच्या दातृत्वाचे कौतुक करीत असा दानशूर सुपुत्र निर्माण होणे, हे आई – वडीलांची पुण्याई असते, असे गौरवोद्गार काढले. अरुण पवार हे उद्योजकातील दानशूर व्यक्ती आहेत, असे सांगितले. अरुण पवार यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे कौतुक केले.
ह.भ.प. शिवानंद स्वामी महाराज यांनी सांगितले, की अरुण पवार व बालाजी पवार या बंधुनी या अगोदरही अनेक गो-शाळांना चाऱ्यारुपी मदत केली आहे. गाय आणि माय गोमाता वाचली पाहिजे याच उदात्त भावनेतून अरुण पवार व बालाजी पवार मदत करत असतात. जेवढे माणसांसाठी सेवाकार्य करतात, तेवढेच मुक्या प्राण्यांसाठी सेवाकार्य करत असतात. वन्य प्राण्यांसाठीही खूप मोठी मदत दरवर्षी पवार बंधू करीत आले आहेत.