न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलचा क्रीडा महोत्सव उत्साहात

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलचा क्रीडा महोत्सव कै. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण, पिंपळे सौदागर या ठिकाणी आयोजित केला होता.
सांगवी वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे , विठ्ठल (नाना) काटे, संस्थेचे सचिव अरुण चाबुकस्वार, मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निंर्माला कुटे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी कुस्तीगिर संघटना उपाध्यक्ष काळुराम कवितके, युवा नेते सागर कोकणे, उद्योजक नितीन गारवे, सामाजिक कार्यकर्ते अरुण तांबे, सुमित डोळस, बाळासाहेब शेंडगे, जितेश जगताप, निलेश भिसे, शशी जाधव आणि सद्दाम सोमदार शाळेचे मुख्याध्यापिका नाझनीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, फहाद खान उपस्थित होते.
यात कब्बडी, खो-खो, क्रिकेट, रनिंग, सॅक रेस, लेमन अँड स्पून, बुक बेलन्सिंग, रस्सीखेच, स्किपींग, बॉल इन बास्केट, हॉपिंग, फ्रुट कलेक्टिंग, बॅग पॅकअप, थ्री लेग्स, फ्रॉग जम्प आणि रिंग थ्रोविंग या क्रीडाचे आयोजन करण्यात आले होते तसेच पालकांसाठी संगीत खुर्ची, रस्सीखेच, आणि क्रिकेट या स्पर्धा घेण्यात आल्या.
लहान मुलांमधील शारीरिक विकासासह संज्ञानात्मक, भावनिक आणि सामाजिक कौशल्ये वाढविण्याच्या संकल्पनेतून क्रिडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, असे उदगार सांगवी वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी काढले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुनंदा साळवी मॅडम यांनी केले व क्रीडाशिक्षक आशिष पांडे व मोसीन अंसारी, रहीम शेख यांनी आभार मानले.














