महाराष्ट्र पूर्व सैनिक सेवा परिषद संस्थेच्यावतीने शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबातील वीरमाता वीर भगिनींचा गौरव
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पाकिस्तान विरुद्ध च्या युध्दात भारतीय सैन्याने जो विजय मिळवला होता त्याला ५२ वर्षे पूर्ण झाली संपूर्ण देशात हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो.
त्या निमित्ताने दिघी येथील मृणाल बॅकवेट येथे अखिल महाराष्ट्र पूर्व सैनिक सेवा परिषद या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र शाखेच्या वतीने १९६२ ते २०२१ पर्यंतच्या विविध झालेल्या युध्दात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबातील वीरमाता वीर भगीनींचा गौरव करण्यात आला.
या वेळी त्यांना एक महावस्त्र आणि एक मोमेंटो देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर राजेश गायकवाड, एअर मार्शल पी पी बापट, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त नीलकंठ पोमण, स्टेट बँक ऑफ इंडिया पुणे चे जनसंपर्क अधिकारी अमोल चौधरी, नरेंद्रपाल बक्षी, एअर व्हाइस मार्शल वैद्य, कर्नल जोशी, लेफ्टनंट कर्नल सतिश डांगे,मेजर मिलिंद टुंगर आदर्श सरपंच बाबाजी शेळके, कल्पना ताई मालपोटे,पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका जयश्री ताई मारणे नितीन बग्गा, निवृत्त सरकारी वकील नरेंद्र निकम आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना राजेश गायकवाड यांनी सांगितले की आज पर्यंत आपल्या संस्थेच्या वतीने जवळपास १२००० निवृत्त सैनिक कांना विविध ठिकाणी नोकरी देण्यात आली आहे,१९७१ च्या युध्दातील अनेक अनुभव सांगताना एअर मार्शल बापट म्हणाले हे युध्द जनरल माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली लढले गेले जवळ पास चौदा दिवस हे युध्द चालू होते आपण या युध्दात ढाकयां पर्यंत चा परिसर ताब्यात घेतला होता आणि विषेष म्हणजे ९३००० पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली होती. त्यांना रेल्वे च्या माध्यमातून पकडून आणण्यात आले होते आपल्या सैनिकांच्या शौर्या बद्दल सांगताना एअर मार्शल बापट म्हणाले समोर पाकिस्तानी बारा ते पंधरा टॅककर उभे होते आणि आपले फक्त दोन टॅककर असताना सुद्धा आपण त्यांचे सर्व टॅककर निसतनाबुत केले.
या कार्यक्रमाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे वारकरी सेवा संघाचे मुळशी तालुक्यातील पिंपळोली गावचे आदर्श सरपंच बाबाजी शेळके यांनी राष्ट्र प्रथम या भावनेतून गौरव साहित्य चे सौजन्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना आरोटे आणि आरती बेदमुथा यांनी तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेजर आर के सैनी आणि कर्नल एस पी शुक्ला यांनी केले.