क्षयमुक्त भारतासाठी आपण सर्वानी एक पाऊल पुढे येऊन “या” मोहिमेत सहभाग घ्यावा – शत्रुघ्न काटे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शत्रुघ्न (बापू) काटे युथ फाउंडेशन आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने हॉटेल गोविंद गार्डन पार्किंग,पिंपळे सौदागर याठिकाणी BCG क्षयरोग (TB) विरुद्ध मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या या शिबिराचे मुख्य उद्देश्य म्हणजे जेष्ठ नागरिकांना क्षयरोग (TB) विरोधी BCG लस देऊन सुरक्षित करणे.
बॅसिलस कॅल्मेट-गुएरिन ( बीसीजी ) ही लस प्रामुख्याने टीबी विरुद्ध वापरली जाणारी लस आहे. या लसीकरणासाठी ५ वर्षांपूर्वी क्षयरोग होऊन गेलेले,मधुमेहाचे रुग्ण,कुपोषित प्रौढ, TB रुग्णाच्या संपर्कात आलेले,धूम्रपान करणारे तसेच BMI कमी असणारे नागरिक लाभ घेऊ शकतात .
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत संपूर्ण भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. या अनुषंगाने मनपा क्षेत्रातील १८ वर्षेवरील प्रौढ व्यक्तींना BCG लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली आहे.
यावेळी , क्षयमुक्त भारतासाठी आपण सर्वानी एक पाऊल पुढे येऊन प्रत्येक नागरिकाने बीसीजी लस घेऊन क्षयरोगाला कायम स्वरूपी हद्दपार करण्याच्या या मोहिमेत सहभाग घ्यावे असे आवाहन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केले आहे.
यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला.