- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
फॅशन केवळ डिझाईन नाही, तर तुमची ओळख – संतोष कटारिया पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – फॅशन म्हणजे केवळ डिझाईन नव्हे, तर ती आपली ओळख असते. आपण केलेल्या प्रत्येक डिझाईनद्वारे जगाला त्यांच्या संस्कृतीची, वेशभूषेची एक कथा सांगितली जाते. त्यामुळे स्वतःच्या कल्पनांशी कायम प्रामाणिक राहा, सातत्याने नवकल्पना करत राहा आणि जगाला आणखी सुंदर बनवा, असे मत पेपरमिंट क्लोदिंग प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक संतोष कटारिया यांनी मांडले. ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (आयओडी)च्या फॅशन विभागाचा ११ वा वार्षिक ग्रॅज्युएशन फॅशन शो (जीएफएस) २०२६ निमित्ताने बोलत होते. याप्रसंगी ‘ग्लॅड यू केम अँड ग्लॅड वी मेट’चे संस्थापक मॅडी अमृतकर,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नसरापूर येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी हा यापूर्वीही लैंगिक छळ प्रकरणात शिक्षा भोगून बाहेर आलेला असल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी युवा आघाडीने आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. “अशा नराधमांना कायद्याची भीती राहिलेली नाही. त्यामुळे आरोपीचा १० दिवसांच्या आत एन्काऊंटर करण्यात यावा, अन्यथा आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘पिंक ई-रिक्षा’ योजनेत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि पिंक महिला रिक्षा चालक-मालक संघटनेने केला आहे. या कथित भ्रष्टाचाराविरोधात आणि फसवणूक झालेल्या महिला चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी मंगळवार, ५ मे रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी येथे रिक्षासह धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून सुरू होणारा हा मोर्चा ‘ग्रीन कॅनेटी’ कंपनीच्या शोरूमपर्यंत जाणार असून, फसवणूक झालेल्या महिला त्यांच्या नादुरुस्त रिक्षांसह आंदोलनात सहभागी होणार आहेत. कंपनी मालक आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘प्रत्येकाच्या योगदानातून हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे!’ असे आवाहन मन:शक्ती केंद्राच्या प्रा. डॉ. मंगला पानसरे यांनी गणेशनगर, थेरगाव येथे केले. एक मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगारदिन आणि बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. मंगला पानसरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी दिनेश जगताप, माध्यमिक विभागाच्या प्र. मुख्याध्यापिका सुनीता घोडे, प्राथमिक विभागाच्या प्र. मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे आणि प्रा. खुशाल पानसरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रा. डॉ. मंगला पानसरे यांनी, ‘मानवता, राष्ट्र, व्यक्ती कल्याण नमस्तू!’ या प्रार्थनेने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकारने पारंपरिक कामगार कायदे रद्द करून भांडवलदारांच्या फायद्यासाठी नवीन कायदे आणले आहेत. यामुळे कामगारांचे आर्थिक, सामाजिक शोषण होणार आहे. हे काळे कायदे मागे घेऊन पारंपरिक कामगार कायद्यांची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सर्व कामगारांनी वज्रमूठ करावी असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष व इंटक पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले. जागतिक कामगार दिनानिमित्त शुक्रवारी इंटक कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.१ मे) सकाळी भक्ती शक्ती चौक ते पिंपरी पर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रॅलीचे रूपांतर सभेत झाले. यावेळी कामगारांना डॉ. कैलास कदम यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रा बरोबरच विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारे थेरगाव चे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर विविध लेखकांनी लिहिलेल्या, ९ भाषेतील ५५१ पुस्तकांचा संग्रह जमा केला आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, तमिळ, तेलगू, गुजराती आणि सिंधी भाषेतील पुस्तकांचा समावेश आहे. संभाजी बारणे यांच्या या पुस्तक संग्रहाची “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये यथोचित नोंद करण्यात आली आहे. तसे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह नुकतेच बारणे यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या समितीच्या वतीने २५ मार्च २०२६ रोजी प्रदान करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अशा प्रकारचा पुस्तक संग्रह…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील ज्यु कॉलेज वाणिज्य शाखेचा १०० टक्के आणि विज्ञान शाखेचा ९८.८७ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेच्या अनुष्का पोळ ९३ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम मिळवला. अनिशा काळे ९१.८३ टक्के गुण द्वितीय तर प्रांजल थोरात ८७.३३ टक्के गुण मिळवून तृतीय आली. तसेच वाणिज्य शाखेतील कार्तिक शेळके आणि मानसी सावंत यांनी ८८.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. रोहिणी मुदलियार ८८.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर रितिका अमावासी ८७.६७ टक्के गुण मिळवून तृतीय आली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कामगार साहित्यिक श्रमश्री बाजीराव सातपुते यांच्या सहचारिणी नीता सातपुते यांना गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे ‘मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; तर उद्योजक भगवान पठारे यांना पद्मश्री नारायण सुर्वे कृषी – उद्योग जीवनगौरव सन्मान प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर प्राचार्य शंकर देवरे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस सन्मान), अरुण गराडे (पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान), संगीता झिंजुरके (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार) तसेच डॉ. स्वाती पाटील आणि नीलेश शेंबेकर यांना (पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार) प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मराठी विश्वकोश मंडळाचे माजी…
ज्ञानेश्वरी ही एक जीवनप्रणाली! – डाॅ. भावार्थ देखणे जिजाऊ व्याख्यानमाला – अंतिम पुष्प पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘भक्तीसोबतच माणसाला कर्मप्रवण करणारी ज्ञानेश्वरी ही एक जीवनप्रणाली आहे!’ असे प्रतिपादन डॉ. भावार्थ देखणे यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘एक तरी ओवी अनुभवावी!’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना डॉ. भावार्थ देखणे बोलत होते. चिंचवडगाव पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक दत्ता चासकर, नगरसेविका अपर्णा डोके, सामाजिक कार्यकर्त्या गीतल गोलांडे, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, कार्याध्यक्ष ॲड. विपुल…
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; पुष्टिपती विनायक अवतार पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्हाच्या काहिलीपासून भक्तांचे रक्षण व्हावे आणि दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या दूर व्हाव्या, असे मागणे मागत दगडूशेठ गणपती बाप्पांना शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ पुष्टिपती विनायक हा अवतार झाला. त्यानिमित्ताने मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्यावेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला. तसेच पं. रघुनंदन पणशीकर यांनी गायनसेवा अर्पण केली. मंदिरामध्ये गणेशयाग देखील…
