Author: maharashtrabreakingnews.com

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पहिल्या संविधान गीताचे लोकार्पण, ‘वंदे संविधान’ काव्यसंमेलन, क्रांतिसूर्य सावित्रीज्योती पुस्तकाचे प्रकाशन आणि संविधान गीतकार प्रा. शंकर आथरे यांचा सन्मान अशा अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बंधुता प्रकाशनाच्या संचालिका मंदाकिनी रोकडे यांनी दिली. विश्वबंधुता साहित्य परिषद, काषाय प्रकाशन आणि बंधुता प्रकाशन या संस्थांच्या वतीने येत्या शनिवारी (ता. २४ जानेवारी) सकाळी १० वाजता नवी पेठेतील पत्रकारभवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभामध्ये ज्येष्ठ साहित्यिका आणि विचारवंत ऍड. प्रार्थना सदावर्ते व साहित्यिक डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांच्या हस्ते ‘क्रांतिसूर्य सावित्रीज्योती’ पुस्तकाचे प्रकाशन, संविधानाचे पहिले गीतकार…

Read More

      पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित पहिल्या टप्प्याच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या खाजगी आणि सरकारी शाळांना मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.      पुणे जिल्हा प्रशासन, बजाज तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज पुणे ग्रँड टूर-२०२६ युसीआय मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा १९ ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल यांनी निर्धारित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार आयोजित करण्यात येत…

Read More

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पीसीयू सज्ज – हर्षवर्धन पाटील पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले २१ व्या शतकातील अत्याधुनिक शिक्षण केंद्र आहे, जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून ही संस्था वेगाने पुढे जात आहे असे गौरवोद्गार परम महासंगणकाचे शिल्पकार डॉ. विजय भटकर यांनी पीसीयूच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यात काढले.     विद्यापीठाच्या ध्येयधोरणाचे आणि दीर्घकालीन शैक्षणिक दृष्टीचे भटकर यांनी विशेष कौतुक केले. शैक्षणिक विस्ताराच्या योजना तसेच प्रस्तावित केंद्रीय संशोधन सुविधा, संशोधन केंद्र या उपक्रमांचा उल्लेख करत, हे केंद्र विद्यार्थी, प्राध्यापक आणि उद्योग क्षेत्रासाठी आंतरशाखीय संशोधन, नवोन्मेष आणि व्यावहारिक समस्यांच्या निराकरणासाठी एक महत्त्वाचे सामायिक व्यासपीठ ठरेल, असा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – असंघटित कामगारांसाठी लढाऊ, व आक्रमकपणे कार्य करणारी संघटना कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र च्या जालना जिल्हा अध्यक्षपदी भगवानराव नागोराव काळे यांची निवड करण्यात आली आहे . कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र ही बांधकाम कामगार,घरेलू कामगार, कंत्राटी कामगार,रिक्षा चालक,फेरीवाला, यांच्या न्याय हक्कासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असून ४५ हजार सभासद संख्या असलेल्या या संघटनेच्या जालना जिल्ह्याचे अध्यक्षपदी काळे यांची निवड करण्यात आली आहे. काळे यांच्या बांधकाम कामगार, शेतमजूर, व सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल कष्टकरी संघर्ष महासंघाने घेऊन जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात सुमारे १४ जिल्ह्यात संघटनेचे काम सुरू असून या निवडीने पुन्हा कामगाराचे हितासाठी लाभदायी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या सभागृहाची रचना केवळ राजकीय नव्हे, तर शैक्षणिकदृष्ट्याही लक्षवेधी ठरत आहे. १२८ नगरसेवकांच्या या सभागृहात चौथी पासपासून ते पदव्युत्तर आणि व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या प्रतिनिधींचा समावेश असून, लोकशाहीतील व्यापक प्रतिनिधित्वाचे चित्र स्पष्टपणे दिसून येते. महापालिकेच्या कारभाराची सूत्रे आता विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या नगरसेवकांच्या हाती आली आहेत. उपलब्ध माहितीनुसार, चौथी ते सातवीपर्यंत शिक्षण घेतलेले १४ नगरसेवक, तर आठवी ते नववीपर्यंत शिकलेले १८ नगरसेवक सभागृहात आहेत. दहावी व बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असून, दहावी पास २७ आणि बारावी पास २१ असे एकूण ४८ नगरसेवक या गटात येतात. उच्चशिक्षण घेतलेल्या नगरसेवकांचाही सहभाग लक्षणीय आहे. बीए,…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘भारत हे हिंदुराष्ट्रच आहे!’ असे प्रतिपादन बजरंग दल प्रांत संयोजक नितीन महाजन यांनी श्री सावतामहाराज मंगल कार्यालय, राहता (शिर्डी) येथे रविवार, दिनांक ११ जानेवारी  व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि बजरंग दल उत्तर अहिल्यानगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शौर्य संचलन व त्रिशूळ दीक्षा सोहळ्यात नितीन महाजन बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महंत आत्मारामगिरी महाराज, विश्व हिंदू परिषद – पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे, बजरंग दल प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे, विभाग मंत्री सुनील खिस्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह प्रा. दीपक जोंधळे, जिल्हा मंत्री विशाल वाकचौरे, बजरंग दल…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे राष्ट्रीय युवा दिन २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘युवक सप्ताह २०२६’ अंतर्गत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सहभागी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचे आयोजन स्वामी विवेकानंद चेअर अंतर्गत करण्यात आले. २०२२ साली स्थापन झालेली ही चेअर माईर्स एमआयटी समूहाचे संस्थापक, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलपती व अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या आशीर्वादाने कार्यरत असून, कार्यकारी अध्यक्ष व प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. या उपक्रमात समग्र विकास शाळा (एसएचडी), अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष (आयक्यूएसी) तसेच स्कुल ऑफ वैदिक विज्ञान यांचा संयुक्त…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘नारायण सुर्वे यांचे जीवन म्हणजे वेदनेचा प्रवास होय! जिल्हा परिषदेच्या शाळेला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून देणारे दत्तात्रय वारे हे सर्वार्थाने आदर्श शिक्षक आहेत; परंतु सरकार संवेदनशीलता विसरली होती!’ अशी खंत ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी जिल्हा परिषद शाळा, जालिंदरनगर, कनेरसर, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे (शनिवार, दिनांक १७ जानेवारी) व्यक्त केली. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित एकदिवसीय पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतीश गोरडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता म्हणून भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे. सन २०४७ मध्ये देशाचा १०० वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना आपला देश विकसित भारत देश म्हणून जगभर ओळखला जावा, यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करीत आहे. वेगाने विकसित होणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. यामध्ये सर्वच बाजूने पिंपरी चिंचवड शहराचे देखील मोठे योगदान आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ते केंद्र सरकारपर्यंत एकाच विचाराचे सरकार असल्यास शहराचा आणि राज्याचा नियोजनबद्ध पद्धतीने वेगाने विकास करता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सभापती…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने (भाजप) एकहाती सत्ता मिळवत शहराच्या राजकारणावर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. १२८ सदस्यांच्या महापालिकेत भाजपचे सर्वाधिक ८४ नगरसेवक निवडून आले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ३७, शिवसेना (शिंदे) पक्षाला ६, तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे. या निवडणुकीतील एक महत्त्वाचा राजकीय पैलू म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची मते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या तब्बल ७६ उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. याउलट भाजपच्या ३७ उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यामध्ये भाजपचे चार, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार अवघ्या ५०० मतांच्या फरकाने पराभूत झाले, ज्यामुळे…

Read More