- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, पुणे यांना शाश्वतता व हरित कौशल्य शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रतिष्ठित ‘आयडीए पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला आहे. इंडिया डिडॅक्टिक्स असोसिएशन (आयडीए), नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा हा राष्ट्रीय पुरस्कार “शाश्वतता व हरित कौशल्य शिक्षणातील नवकल्पना” या विशेष श्रेणीत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा यशोभूमी येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर (आयआयसीसी), नवी दिल्ली येथे पार पडला. शाश्वत विकास, पर्यावरणीय जबाबदारी आणि हरित कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या विद्यापीठाच्या अभिनव शैक्षणिक पद्धती, संशोधनाधारित उपक्रम आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आठवी विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा आठवा हंगाम २३ ते २८ जानेवारी २०२६ दरम्यान विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पार पडणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी पद्मश्री, अर्जुन पुरस्कार व ऑलिंपिक कांस्यपदक विजेते मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे (एनएसएनआयएस) उपमहासंचालक व वरिष्ठ कार्यकारी संचालक विनित कुमार, मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू तृप्ती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती तसेच सत्तारूढ पक्षनेतेपदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीनंतर सत्तेची समीकरणे स्पष्ट होत असतानाच इच्छुक उमेदवारांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेचा कारभार पुढील पाच वर्षे कुणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समाजघटकांची भक्कम सांगड, अनुभव आणि वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास मिळवण्यावर इच्छुकांचा भर आहे. मागील चार वर्षांत सत्ताधारी पक्षाची कामगिरी, विकासकामांचा आढावा आणि पुढील पाच वर्षांचा आराखडा या मुद्द्यांवर चर्चांना उधाण आले आहे. पक्षांतर्गत बैठकांमध्ये संभाव्य नावे, प्रभागीय समतोल, सामाजिक प्रतिनिधित्व आणि राजकीय गणितांचा विचार केला जात आहे. अनुभवी नगरसेवकांसह नवोदित चेहऱ्यांनीही दावेदारी मांडली असून, काहींनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत यंदा अनेक प्रभागांतील निकाल अत्यंत चुरशीचे ठरले. काही प्रभागांमध्ये विजयी उमेदवार थोडक्या मतांनी निवडून आले, तर अनेक ठिकाणी शिंदेसेना, मनसे, अपक्ष उमेदवार तसेच ‘नोटा’ला मिळालेली मते ही विजयी आणि पराभूत उमेदवारांतील मतफरकापेक्षा जास्त असल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे या निवडणुकीत तिसऱ्या आघाड्यांचा आणि मतविभाजनाचा मोठा प्रभाव दिसून आला. प्रभाग क्रमांक ८ मधून भाजपचे सुहास कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या सीमा सावळे यांचा अवघ्या २५६ मतांनी पराभव केला. मात्र, येथे शिंदेसेनेचे महेंद्र सरवदे यांना १,५९८ मते मिळाल्याने लढत अधिक चुरशीची ठरली. प्रभाग ३२ मध्ये भाजपचे प्रशांत शितोळे यांनी राष्ट्रवादीचे अतुल शितोळे यांचा २९० मतांनी पराभव…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता अबाधित राखली आहे. विशेष बाब म्हणजे भाजपचे शहराध्यक्ष म्हणून बापू काटे यांची निवड झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीतच हा मोठा राजकीय यशाचा टप्पा गाठण्यात आला आहे. त्यामुळे शहराध्यक्ष बापू काटे यांच्या नेतृत्वावर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदारांनी दाखवलेला विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळवली होती. त्यानंतर २०२२ च्या कालावधीत विविध विकासकामे, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि संघटनात्मक बांधणी यामुळे भाजपचा जनाधार अधिक मजबूत झाला. याच पार्श्वभूमीवर २०२५ मध्ये बापू काटे यांची भाजप शहराध्यक्षपदी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी येथील श्री तुळजाभवानी माता मंदिर परिसरात )रविवार, दि. १८ ) श्री महाकालिका देवी वर्धापन दिन सोहळा तसेच मकरसंक्रांतीनिमित्त समाजातील महिला भगिनींसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड आणि मावळ त्वष्टा संस्थेच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेचे विद्यमान अध्यक्ष किशोर पिंपळे, माजी अध्यक्ष मधुकर पोरे, राधिका बोर्लिकर यांच्यासह कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला हा कार्यक्रम भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमात महिलांसाठी विविध करमणुकीचे खेळ आयोजित करण्यात आले होते. या खेळांचे आयोजन सौ. राधिका ताई बोर्लिकर यांनी अत्यंत उत्तम…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -लातूर जिल्हा मित्र मंडळ आणि सुप्रीम हॉस्पिटल यांच्या वतीने ४१ वे रक्तदान शिबीर रविवारी (दि. १८) रोजी आकुर्डी प्राधिकरण, जय हिंद चौक येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक लक्ष्मीकांत कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक बाबूराव सगावकर, प्रमुख पाहुणे उद्योजक अजय मुंगडे, प्रा. रामदास बिरादार, अध्यक्ष नंदकिशोर गुंजोटे, उपाध्यक्ष संगनाथ राऊत, राहुल देशमुख, सचिव औदुंबर नाईक, कार्याध्यक्ष भास्कर जगताप, मंडळाचे कार्यकर्ते प्रमोद गंगापुरे, मयुर कुमदाळे, प्रशांत गुंजोटे, महेश राऊत, विवेक जगताप, देवानंद गंगापुरे, चेतन गंगापुरे, विवेक दळवी आदी उपस्थित होते. गेल्या ४०…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात ‘हाका मारी बाई’ या नावाचे पोस्टर व बॅनर लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १९९० च्या दशकात या नावामुळे शहरात दहशतीचे वातावरण होते. त्याच पार्श्वभूमीवर २०२६ मध्ये पुन्हा मोरवाडी सिग्नलसह शहरातील विविध भागांत अशा स्वरूपाचे जाहिरात फलक व पोस्टर लावण्यात आल्याने तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी ॲड. सागर रतन चरण, सदस्य जिल्हा दक्षता समिती (महाराष्ट्र शासन) यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरात कोणत्याही माध्यमातून अनधिकृत, भीती निर्माण करणारे किंवा चुकीचा संदेश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हाका मारी बाईच्या नावाची दहशत १९९० च्या दशकात अशी प्रतिकूल परिस्थितीत आणि वातावरण निर्माण झाले होते आणि २०२६ मध्ये पुन्हा (मोरवाडी सिग्नल) पिंपरी चिंचवड शहरात असे जाहिरात फलक / पोस्टर बॅनर लावून पिंपरी चिंचवड शहरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.हाका मारी बाईच्या नावाची पोस्टर बॅनर तत्काळ काढा, अशी मागणी सदस्य जिल्हा दक्षता समिती महाराष्ट्र शासन व ॲड. सागर रतन चरण यांनी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे व पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. शहरात कोणत्याही माध्यमातून अनधिकृतपणे, वाईट हेतू किंवा चुकीच्या संदेशाद्वारे कोणतेही फलक /पोस्टर बॅनर लावले जाणार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पुणे जिल्ह्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल शर्यत बजाज पुणे ग्रॅंड टूर दि. १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सी.एफ.आय), आशियाई सायकलिंग महासंघ (ए.सी.सी) आणि आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघ (यु.सी.आय) यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत असून, महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या स्पर्धेमध्ये भारतासह विविध देशांतील नामांकित, व्यावसायिक सायकलपटू सहभागी होणार असून, ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सायकल शर्यतींपैकी एक ठरणार आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे नाव जागतिक क्रीडा मंचावर अधोरेखित होणार आहे. ड्रोन चित्रीकरणातून शहराचे जागतिक दर्शन…
