Author: maharashtrabreakingnews.com

पिंपळे सौदागर ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमित्ताने  शत्रुघ्न काटे यांच्या सौजन्याने पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन,गोविंद यशदा चौक याठिकाणी  प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा “भव्य सामूहिक महाआरती” सोहळ्याचे अतिउत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा  मंदिरात पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि “जय श्रीराम” यांच्या नावाने संपूर्ण भारतीयाच्या मुखात हा एकच जयघोष गुंजला. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सौजन्याने पिंपळे सौदागर याठिकाणी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा “भव्य सामूहिक महाआरती” सोहळ्याला परिसरातील रामभक्तांनी उत्सवासारखे साजरे केले.अयोध्येत राम…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगळी वेगळी राम भक्ती म्हणून चिंचवडमध्ये प्रथमच भव्य रांगोळीच्या माध्यमातून प्रभू श्री रामांची प्रतिकृती साकारली होती. चिंचवड विधानसभा आमदार अश्विनी जगताप,भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या हस्ते या रांगोळीतून साकारलेल्या श्रीराम प्रतिकृतीचे उदघाटन करण्यात आले.या वेळी अनेक माजी नगरसेवक ,आदी उपस्थित होते. ‘क’ कॅलिग्राफी संस्थेच्या माध्यमातून व अनेक रामभक्तांच्या सहयोगाने कै. मुरलीधर माचुत्रे व्यायाम शाळा जुन्या तालेरा हॉस्पिटल जवळ, पोदार शाळा रोड काकडे पार्क, चिंचवडमध्ये 50×20 फूट अश्या मोठ्या स्वरूपात सर्वांना दि. 21 व 22 जानेवारी रविवारी आणि सोमवारी* सर्वांना पाहण्यासाठी खुली ठेवली होती. उदघाटन प्रसंगी अयोजक शरद कुंजीर ‘क’ कॅलिग्राफी…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “अंतर्मनातील भावनांचे विरेचन करण्यासाठी कविता हे उत्तम माध्यम आहे!” असे विचार ज्येष्ठ प्रवचनकार ह. भ. प. किसनमहाराज चौधरी यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. कवयित्री मानसी चिटणीस लिखित ‘माझ्यातील बुद्धाचा शोध’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना किसनमहाराज चौधरी बोलत होते. मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त किशोर जोशी, ज्येष्ठ साहित्यिक अरविंद दोडे, शोभा जोशी, कवयित्री मानसी चिटणीस यांची व्यासपीठावर; तसेच ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, नंदकुमार मुरडे, नीलेश शेंबेकर, अभिजित काळे, हेमंत जोशी, स्मिता कुलकर्णी यांची सोहळ्यात प्रमुख उपस्थिती होती. ह. भ. प. किसनमहाराज चौधरी पुढे म्हणाले की, “मानसी चिटणीस यांच्या कविता अंतर्मुख करणाऱ्या आहेत. काव्यातील…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने शिवतेज नगर येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र शिवतेजनगर समिती यांच्या वतीने परिसरातील सर्व नागरिकांना सहभागी करून घेत विविध उपक्रम राबवण्यात आले. शिवतेज प्रतिष्ठान, शिवतेज मित्र मंडळ, राजे शिवबा युवा मंच आदी संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवतेजनगर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गणपती मंदिर आणि पंचमुखी हनुमान मंदिर या मंदिरांमध्ये होम हवन, विष्णुसहस्रनाम, भक्ती संगीत अभंगवाणी, गीत रामायण अशा कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद लाभला परिसरातील महिला आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रामायणाच्या कथेवर आधारित नृत्य आणि नाटिका सादर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबई येथे मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा -२०२३ स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड मधील हिंदुस्थान अँटिबायोटिक स्कूलच्या माध्यमिक विभागाने अंतिम फेरीत पाच वैयक्तिक बक्षीसांसह प्रथम क्रमांक पटकावला. नवी मुंबईतील मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, वाशी येथे अंतिम फेरी नुकतीच पार पडली. यामध्ये महाराष्ट्राच्या विविध विभागातून संघ दाखल झाले होते. अंतिम फेरीत हिंदुस्तान अँटिबायोटिक्स स्कूल, माध्यमिक विभागाच्या ‘द फ्लायर्स’ टीमने ३१ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मिळवले. तसेच वैयक्तिक पातळीवर लेखन प्रथम क्रमांक – जगदीश पवार; दिग्दर्शन प्रथम क्रमांक – जगदीश पवार; पार्श्वसंगीत प्रथम क्रमांक – मंगल साठे;…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुणे जिल्हा व तालुका परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड मनपा शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २३-२४ मध्ये पिंपरी मधील हिंदुस्तान अँटिबायोटिक्स स्कूलच्या ‘एक्सीडेंट अलर्ट इंडिकेटर’ या प्रकल्पाने नववी ते बारावी या गटातून १५० प्रकल्पातून दुसरा क्रमांक पटकावला. एच. ए. स्कूलचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी अभिज्ञ कुलकर्णी याने प्रकल्प सादर केला. विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहावी ते आठवी या गटात ७५ संघाची निवड झाली होती. या मध्ये हिंदुस्तान अँटिबायोटिक स्कूलच्या इयत्ता सातवी मधील संस्कृती पाटील व झयान शेख यांच्या गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोन्ही गटांना श्वेता नाईक व हविनाळ शिवयोगेश्वर,…

Read More

वाकड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड येथील भूमकर चौकातील अस्पष्ट आणि मोडकळीस आलेले दिशादर्शक फलक हटवून त्याठिकाणी नवीन फलक लावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड प्रभागातील जनसंवाद सभेत संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी लेखी पत्र दिले आहे. वाकड येथील भूमकर चौक हा नेहमीच गजबजलेला परिसर असून या ठिकाणहून जाणाऱ्या वाहनांची संख्या खूप मोठी आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसर याच भागात असल्याने नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मुंबई बेंगलोर महामार्गालगत हा भाग असल्याने वाहनचालकांना योग्य रस्ते आणि दिशा समजण्यासाठी दिशादर्शक फलक सुस्थितीत असणे आवश्यक आहे, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्या प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भोसरी एमआयडीसी येथे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि दुर्गा ब्रिगेड तर्फे भव्य महाआरती आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  अभय  भोर संपर्क कार्यालयात श्रीरामाची आरती घेण्यात आली आरतीला औद्योगिक परिसरातील उद्योजक कामगार आणि महिला भगिनी उपस्थित होत्या. तसेच औद्योगिक परिसरामध्ये उद्योजक आणि कामगार बंधू तर्फे रॅली घेऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाके वाजवून आणि उद्योजक कामगारांनी नाचून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष  अभय भोर उद्योजक जसबिंदर सिंग, प्रवीण चव्हाण, जसबाल सिंग, सचिन जाधव , प्रशांत पठारे दुर्गा भोर तसेच अनेक उद्योजक कामगारांचा सहभाग…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- महापालिका शाळांमध्ये झालेले वैविध्यपूर्ण बदल, महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेले विविध महत्वाकांक्षी उपक्रम आणि आदर्श शिक्षक यामुळे महापालिका शाळांचे चित्र पूर्णपणे बदलताना दिसत आहे. जल्लोष शिक्षणाचा या उपक्रमामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस निश्चितच मदत झाली आहे, असे मत खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महापालिका शाळांचे यश साजरे करण्यासाठी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे २३ व २४ जानेवारी २०२४ रोजी “जल्लोष शिक्षणाचा २०२४” या कार्यक्रमाचे महापालिकेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार बारणे बोलत होते. यावेळी आमदार अश्विनी जगताप, आयुक्त शेखर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्या येथे काल श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानिमित्त पिंपळे गुरव येथे दीपमहोत्सव कार्यक्रमाने राजमाता जिजाऊ गार्डन दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले. पिंपळे गुरव, राजमाता जिजाऊ गार्डन या ठिकाणी भाजप शहराध्यक्ष  शंकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश काशीद, पोपट जगताप, मधुकर रणपिसे, प्रसाद जाधव रवी धनवडे ,नरेश पवार ,राज जाधव ,कोळी साहेब शशिकांत गायकवाड, अँड रणजीत ढोमसे, रणजित डोमसे, बाळासाहेब देवकर, सुर्य नमस्कार ग्रुप,हास्य क्लबचे सभासद उपस्थित होते.

Read More