- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशातील सर्वांत मोठ्या व तितक्याच महत्त्वाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये मी अध्यक्ष असताना अनेक बदल घडवावे लागले. मात्र, जेव्हा या परीक्षेमध्ये नीतिशास्त्र या विषयाचा अंतर्भाव करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यावर चौफेर टीका झाली. तथापि, तत्कालीन सरकार व मंत्रालयाने आयोगावर ठाम विश्वास व्यक्त केल्याने या बदलांची प्रभावी अंमलबजावणी झाली. कालांतराने नीतिशास्त्राचे महत्त्व सर्वांना पटले, असे मत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (युपीएससी) माजी अध्यक्ष डॉ. डी. पी. अग्रवाल यांनी व्यक्त केले. ते एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथील स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (एसआयसीएस) तर्फे नागरी सेवांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित “नागरी सेवा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाला सन्मान देण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. यासाठी भाजपाचे नेते आणि आमदार महेश लांडगे यांनी सकाळी पत्र पाठवून प्रशासनाला सविस्तर निवेदन दिले आणि दुपारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन पुढील नियोजन ठरवले. पिंपरी-चिंचवड महापालिका नवीन प्रशासकीय भवनाच्या आवारात ‘‘अजित सृष्टी’’ साकारण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, आर्किटेक्ट सुनील पाटील उपस्थित होते. आमदार लांडगे म्हणाले की, दिवंगत अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाला गती दिली. पायाभूत सुविधा, नागरी सेवा,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजकारणातील वैर हे केवळ विचारांचे असते, मनाचे नाही, याचा प्रत्यय आज पिंपरी-चिंचवडमध्ये आला. शहराचे भाग्यविधाते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आयोजित श्रद्धांजली सभेत त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजप आमदार महेश लांडगे यांना आपला शोक अनावर झाला. भरमंचावर उभं राहून “दादा, मला माफ करा…” असे म्हणत लांडगे भावूक झाले आणि अवघ्या ४० सेकंदात शब्द अपुरे पडल्याने त्यांनी मंच सोडला. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडच्या वर्चस्वावरून अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता. निवडणुकीच्या रणधुमाळीत महेश लांडगे यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. त्यांच्यातील वाक्युद्ध संपूर्ण राज्यात गाजले होते. या…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आज संध्याकाळी ५ वाजता पार पडणार आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील. उपमुख्यमंत्री पदासोबतच सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील निवड होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी त्यांची आज निवड केली जाईल. या शपथविधी सोहळ्यासाठी सुनेत्रा पवार आणि जय पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाले आहेत. आज दुपारी २ वाजता विधानभवनातील कॅबिनेट सभागृहात राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला जाईल आणि त्यानंतर आमदारांच्या संमतीचे…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार हे साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही झोकून देऊन काम करायचे. हाच शिरस्ता ठेवून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सर्व स्तरातील संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, मंत्री, नेते यांनी सुट्टी न घेता काम करावे, तसा अध्यादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढावा. ही खऱ्या अर्थाने अजितदादांना श्रद्धांजली ठरेल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना राजेंद्र जगताप म्हणाले, की स्व. अजितदादा पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत संपूर्ण महाराष्ट्र आपल्या भोवती जोडून ठेवला तो केवळ आणि केवळ त्यांच्या काम करण्याच्या झपाट्याने, शिस्तीने आणि सर्वांगीण विकासाच्या प्रयत्नाने. ते सत्तेत असोत वा…
अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजित सृष्टी’’ उभारणार! – भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांची प्रशासनाला सूचना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावणजी हर्डिकर यांना सविस्तर निवेदन दिले आहे. चिंचवड येथील डी-मार्टसमोरील 33.86 एकर जागेत उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय संकुलात सुमारे 8.65 एकर क्षेत्रावर मुख्य इमारतीचे काम सुरू असून, भविष्यात महापालिकेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज याच ठिकाणाहून चालणार आहे. या पार्श्वभूमीवर, या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मार्गदर्शक अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे व दूरदृष्टीपूर्ण योगदान दिले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वाघेरे म्हणाले कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक सक्षम, आर्थिकदृष्ट्या सबळ व औद्योगिकदृष्ट्या प्रगत महानगर म्हणून उभी राहण्यामागे मा. अजितदादा पवार यांचे नेतृत्व व मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. पाणीपुरवठा योजना, रस्ते व वाहतूक व्यवस्था, औद्योगिक विकास, नागरी पायाभूत सुविधा, जलनिस्सारण व्यवस्था…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव अजरामर राहावे, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीस ‘स्वर्गीय अजितदादा पवार भवन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका’ असे नामकरण करण्यात यावे, तसेच त्या इमारतीच्या प्राणांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील विविध लोकप्रतिनिधी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे. स्व. अजितदादा पवार यांनी सन १९९२ ते २०१७ या कालावधीत पिंपरी चिंचवड या औद्योगिक नगरीच्या विकासासाठी…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमानाला बारामतीत लँडिंग दरम्यान झालेल्या अपघात झाला. यात दादांसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू बुधवारी ( दि. २८ ) झाला. या घटनेने संपूर्ण राज्यासह आळंदी पंचक्रोशीत शोककळा पसरली. आळंदी शहरात माऊली मंदिर परिसरातील प्रसाद, फुल विक्रेते, दुकानदार यांनी स्वयंस्फूर्तीने आपापल्या आस्थापना बंद ठेवून दादांच्या जाण्याने शोक व्यक्त केला. आळंदी पंचक्रोशीत बुधवारी ( दि. २८ ) माऊली मंदिर परिसरातील महाद्वार चौक, भराव रस्ता आणि श्री शनी मारूती मंदिर भागात व्यापारी, नागरिक, आळंदी ग्रामस्थ यांनी शोक व्यक्त करीत बंद पाळला. गुरुवार ( दि. २९ ) आळंदी शहरात शाळा क्रमांक २ परिसरातील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘अध्यात्मातील अनुभूती व्यक्तीला सद्गुणाकडे नेते!’ असे विचार ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी विरंगुळा केंद्र, चिंचवडगाव येथे (मंगळवार, दिनांक २७ जानेवारी ) व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘जिव्हाळा’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करताना अरुण बोऱ्हाडे बोलत होते. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष गोपाळ भसे, कोषाध्यक्ष अरविंद जोशी, अंकाचे संपादक नंदकुमार मुरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. अरुण बोऱ्हाडे पुढे म्हणाले की, ‘ज्येष्ठत्वामुळे माणूस अध्यात्माकडे वळतो हे जरी खरे असले तरी वैविध्यपूर्ण साहित्य अन् उत्कृष्ट निर्मितिमूल्य यामुळे ‘जिव्हाळा’ हा वार्षिक अंक अतिशय दर्जेदार झालेला आहे!’ नंदकुमार मुरडे यांनी…
