Author: maharashtrabreakingnews.com

टेडेक्स पीसीसीओइआर निगडी येथे संपन्न पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जीवनात आपली खरी लढाई बाह्य प्रतिस्पर्ध्यांशी नसून अंतर्मनाशी असते. या मनातील अडथळ्यांवर मात करून विचारपूर्वक निर्णय घेतल्यास प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार ठरू शकते असे प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू रणजीत बजाज यांनी सांगितले.      पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च च्या (पीसीसीओइआर) वतीने निगडी येथे “टेडेक्स पीसीसीओइआर २०२६” या कार्यक्रमात मार्गदर्शनातील मार्गदर्शन करताना बजाज बोलत होते.    यावेळी पीसीइटी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश…

Read More

दांडेकर पूल चौकात बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत प्रभावी जनजागृती पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, सिंहगड विधी महाविद्यालय आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दांडेकर पूल चौक येथे बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सिंहगड विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती केली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मा. रेणुका देशपांडे (सरकारी अभिवक्ता न्यायालय पुणे) यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हटले, “बालविवाह ही सामाजिक कुप्रथा असून ती पूर्णपणे तुटली पाहिजे. बालविवाह करणारे व त्यास प्रोत्साहन देणाऱ्यांवर कायद्याने कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. आजही बालविवाह हा समाजावरील कलंक आहे आणि…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया गोसावी मंदिरात दिर्घायुष्यासाठी अभिषेक व पुजा अजितदादांच्या दु :खद निधनामुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमांना बगल चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचा सोमवारी वाढदिवस आहे. मात्र महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती हा परिवार असून घरात दुःखाचे वातावरण असताना कोणताही आनंदोत्सव साजरा करू नये, वाढदिवस येत-जात राहतात, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे. शिंदे यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे तसेच आरोग्यासाठी सायकलिंगचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने ‘हिरकणी मावळे रायडर्स’ या सायकलपट्टूंच्या टीमने चिंचवड ते पुणे–तुळजापूर मार्गे अक्कलकोट असा सुमारे ४०० किलोमीटरचा दिवस-रात्र सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. या अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक मोहिमेत महिला व पुरुष अशा एकूण दहा सायकलपट्टूंनी सहभाग घेतला होता. या सायकलपट्टूंनी दाखवलेल्या जिद्द, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने स्वामी समर्थ मठ, चिंचवड येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेत प्रज्ञा अजगर, सोनाली कदम, अपर्णा अष्टीकर,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीत Cariappa Parade Ground येथे पार पडलेल्या एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या कन्येने देशपातळीवर आपला ठसा उमटवला. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनु भान हिने आर्मी विंग (सीनियर विंग) मधून देशातील सर्वोच्च ‘बेस्ट कॅडेट’ हा मानाचा किताब पटकावला. एका दिमाखदार सोहळ्यात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते तनु भान हिला सुवर्ण पदक आणि मानाची ‘केन’ देऊन गौरविण्यात आले.शिस्त,नेतृत्व, शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि राष्ट्रसेवेची भावना या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत तिने हा सन्मान मिळवला. विशेष म्हणजे तनु भान ही पिंपळे सौदागर येथील रहिवासी असून, तिच्या या यशामुळे केवळ तिच्या प्रभागाचेच नव्हे,…

Read More

महापौर रवि लांडगे यांनी केली निगडी व चिखली जलशुद्धीकरण केंद्रांची पाहणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम व सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने महापौर रवि लांडगे यांनी आज निगडी व चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान शहराला लागणारी एकूण पाण्याची गरज, महापालिकेच्या वतीने सध्या करण्यात येणारा पाणीपुरवठा, तसेच भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता राबविण्यात येत असलेल्या प्रस्तावित उपाययोजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, चीफ केमिस्ट डॉ. प्रशांत जगताप, कार्यकारी अभियंता विजयसिंग भोसले, महेश बरीदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘प्रतिभावंतांनी अत्युच्च स्फूर्तीची प्रतीक्षा करावी!’ असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी कवयित्री शांता शेळके सभागृह, निगडी प्राधिकरण येथे (शुक्रवार, दिनांक ०६ फेब्रुवारी) व्यक्त केले. कविवर्य राजन लाखे लिखित ‘बेलाच्या पानावर…’ या हायकूसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. मिलिंद जोशी बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे जिल्हा प्रतिनिधी डाॅ. पुरुषोत्तम काळे, लोकसाहित्याचे अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. रजनी शेठ, राजन लाखे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले की, ‘कवितेलाही आचारसंहिता असते…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य मंडळाने कॉपिमुक्त अभियानांतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य केले आहेत. या नियमानुसार प्रत्येक वर्गात कॅमेरा असणे सक्तीचे केल्यामुळे शहरातील 90 टक्के केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध केली आहे. राज्य मंडळामार्फत 2025-26 साठी बारावीची परीक्षा 10 तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीला होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान किती परीक्षा केंद्रांवरील परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यन्वित आहे, याची चाचपणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत सुरू केली आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेराची सुविधा उपलब्ध असेल, त्या केंद्रांनाच मान्यता दिली जाणार आहे. याबाबत यंदा मंडळामार्फत परीक्षा केंद्रावरील परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्हीची सुविधा आहे की, नाही…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग दुसऱ्यांदा भाजपाची सत्ता आली आहे. एकूण 128 नगरसेवक संख्या असलेल्या महापालिकेत बहुतांश नगरसेवक स्थायी समिती सदस्य पदासाठी इच्छुक आहेत. तर, अनुभवी व दिग्गज नगरसेवक समिती अध्यक्षपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता वाढली आहे. समितीच्या 16 सदस्यांची निवड 20 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. महापालिकेचे महापौरपदी रवी लांडगे, उपमहापौरपदी शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेतेपदी प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची निवड शुक्रवारच्या (दि. 6) विशेष सभेत झाली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहून ती सभा 20 फेब्रुवारी दुपारी एकपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्या सभेत स्थायी समिती…

Read More

पीसीसीओईआर येथे पासपोर्ट सेवा शिबिर संपन्न  पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. यामध्ये शेती, उद्योग, शिक्षण, संशोधन आणि उच्च शिक्षित कुशल मनुष्यबळ या विभागांचे मोठे योगदान आहे. भारतीय युवा वर्ग उच्च शिक्षण, संशोधन आणि रोजगारासाठी परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. हे प्रमाण यापुढेही उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. देशाची अर्थव्यवस्था पुढे आणि जागतिक प्रतिमा उंचावण्यासाठी युवकांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे असे प्रतिपादन भारतीय परराष्ट्र सेवा विभाग अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी केले.    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे पासपोर्ट सेवा शिबिर व भारतीय परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांचे…

Read More