Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील डॉ. रेखा मोहन भोळे यांना  veyil फाउंडेशन तर्फे राष्ट्र सेवा पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे . ही ओळख तिच्या सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल आहे , Dr भोळे यांनी समाजात सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट प्रयत्नाची आणि समर्पणाची दखल घेऊन त्यानां हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे . तिची अथक ,समाजकल्यानाची बांधिलकी असंख्य व्यक्तींच्या जीवनात स्पर्शून गेली आहे, ज्यामुळे त्याच्या कल्याणात लक्षणीय फरक पडला आहे, तिच्या निस्वार्थी सेवेद्रवरे तिने करुणा व सहानुभूती चे खरे उदाहरण दिले आहे , इतरांना तिच्या पावलांवर पाऊल ठेवण्यास प्रेरित केले आहे,veyil foundation एक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  कार्यालयीन कामकाजात कार्यरत असताना उत्साहाने, प्रामाणिकपणे केलेल्या कामांचे कर्मचा-यांस समाधान लाभते, तोच सेवेतील खरा आनंद असतो असे सांगून सर्व सेवानिवृत्तांनी पुढील आयुष्य आपले आरोग्य संभाळून, आनंदाने जगावे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे मार्च २०२४ अखेर अधिकारी, कर्मचारी अशा एकुण २३ जणांचा सेवानिवृत्ती निमित्त सह आयुक्त इंदलकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी संदीप वडके, चारूशीला जोशी, कर्मचारी महासंघाचे नथा मातेरे, सुप्रिया जाधव आदी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागृत मित्र मंडळ, समर्थ कॉलनी, विकास नगर, किवळे यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकविण्यात आला. महिलांच्या हस्ते मूर्तीचे पूजन व लहान मुलांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या हस्ते महा शिव आरती घेण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सर्व धर्मीय बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. लहान बालकांनी शिव घोषणा देऊन या कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. हा आनंद उत्सव साजरा करताना संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जीवनात पारितोषिक मिळणे म्हणजे आपण गुणवत्ता सिद्ध करणे होय. पण ही गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी त्यात जिद्द, चिकाटीला पर्याय नाही. युवकांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमावर अधिकाधिक भर  द्यायला हवा. काळाची पाऊले ओळखून येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊन आपल्यातील क्षमता सिद्ध करायला हव्यात,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व निवेदिका  स्वाती महाळंक यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, आधुनिक युगातील समाजमाध्यमांच्या माध्यमातून आपला व्यक्तिमत्व विकास साधता येईल. यु-ट्युबसारख्या माध्यमाकडे युवकांनी आर्थिक स्त्रोत म्हणूनही पाहायला हरकत नाही. तथापि त्याचे तंत्र जाणून घेतले पाहिजे. कार्यक्रमाच्या…

Read More

– तब्बल ३७ कलावंत ९ गाण्यांचा समावेश असलेले भव्यदिव्य नाटक – भाऊसाहेब भोईर यांच्या मोरया थिएटर्सची निर्मिती पिंपरी  ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भगव्या ध्वजाने नटलेला प्रा . रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचा परिसर, नाट्य रसिकांच्या स्वागताला सनई चौघडे, तुतारी अशा प्रकारच्या मंगलमय वातावरणात शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘ शिवतांडव’ या भव्य नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मोरया गोसावी गणेशाच्या आणि पिंपरी चिंचवडकरांच्या साक्षीने मोठ्या दिमाखात पार पडला. पहिल्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘ शिवतांडव’ या नाटकातून महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास मराठी रंगमंचावर उलगडणार आहे. भाऊसाहेब भोईर यांच्या मोरया थिएटर्सने या भव्यदिव्य नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकाचे  दिग्दर्शक दिलीप भोसले…

Read More

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ममता अंधः कल्याण केंद्रात सामाजिक बांधिलकीतून मोहीते कुटुंबाच्या वतीने विशेष मुलांना स्नेहभोजन दिले. पिंपळे गुरव येथील ममता अंधः कल्याण केंद्रात  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षणासाठी आलेल्या 40 विशेष मुलांना स्नेहभोजन देऊन त्यांचा आनंद द्धिगुणीत केला सर्व मुलांनी आपापल्याला भविष्य काय व्हायचे आहे असे मनोगतातून सांगितले काही मुलांनी वेगवेगळ्या सिने कलाकार, राजकीय व्यक्तींचे आवाजातून आपली कला सादर केली, तर काही मुलांनी चित्रपटातील गाणी गायली. यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मारुती मोहिते म्हणाले की मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला खूप आनंद झाला आपल्याला परमेश्वराने सर्व काही देऊनही आपण समाधान नसतो आणि मला या मुलातच देव असल्याचे दिसले असे मोहिते…

Read More

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गुरुभक्तीतून यशस्वीतेचे द्वार उपलब्ध होते .गुरु आनंद भविष चे स्वप्न पहात. त्यातूनच अनेक संस्था ची आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराजांनी उभारणी केली केली .कुठलेही दोष आपल्यामध्ये येऊ नये यासाठी जागा ठेवू नये. भगवान मिळणे सोपा आहे परंतु गुरुभक्ती टिकून ठेवणे अवघड आहे .गुरु शिवाय आपले अस्तित्वच नसते ,असे मत उपाध्याय प्रवर अर्हम विजा प्रणेता प्रवीण ऋषीजी महाराज यांनी चिंचवड येथील होली चातुर्मास निमित्त आयोजित आचार्य सम्राट आनंद ऋषीजी यांच्या 32 व्या पुण्यतिथीआयोजित प्रवचनात व्यक्त केले . यावेळी मधुर कंठी तीर्थेश ऋषीजी महाराज जैन साध्वी पिंपरी चिंचवड सकल जैन संघाचे पदाधिकारी विविध जैन श्रावक संघाचे अध्यक्ष…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 8 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये दक्षिण मध्य मुंबई, कोल्हापूर, शिर्डी, बुलढाणा, हिंगोली, रामटेक, हातकणंगले आणि मावळ या मतदारसंघाचा समावेश आहे. महायुतीमध्ये अद्यापही काही मतदारसंघावरुन धुसफूस सुरु असताना शिंदे गटाकडून ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ज्या जागांवरुन वाद आहे त्यांचा समावेश टाळला आहे. शिंदे गटाने दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाणामधून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने आणि मावळमधून श्रीरंग आप्पा बारणे यांना उमेदवारी जाहीर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज  शिवजयंती तिथी प्रमाणे नेहरूनगर पिंपरी न्यायालयात पिंपरी चिंचवड ॲडव्होकट्स बार असोसिएशनच्या वतीने साजरी करण्यात आली. तसेच वकिल बार रूमधील महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत छत्रपती शिवाजी महारांजाच्या नावाचा जयघोष करून उत्सहात व आनंदात साजरी करण्यात आली. त्यावेळी जेष्ठ विधीज्ञ ॲड.काळभोर काका,ॲड.लाळगे पाटील , ॲड.गोखले ,ॲड.डांगे , ॲड.मुकुंद ओव्हाळ, ॲड.विवेक महामुनी,ॲड.निलेश जाधव,ॲड.अनिल शिंदे,ॲड.सनी काटे,ॲड.अक्षय भालेराव,ॲड.विकास शर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकट्स बार असोसिएशन चे विद्यमान सचिव ॲड.धनंजय कोकणे व सह-सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी केले.

Read More

1 हजार काेटींचे उदिष्ट साध्य करण्यासाठी थकबाकीदारांनी कर भरावा, महापालिकेचे आवाहन पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने कर वसुलीचे 1 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. उद्या (शुक्रवार)पासून महापालिकेला तीन दिवस सुट्टी आहे. मात्र, या तिन्ही दिवसात सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांना कर भरता यावा, यासाठी कॅश काऊंटर सुरू ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच सध्या महापालिका तिजाेरीत 910 काेटींचा महसूल जमा झाला असताना शेवटच्या तीन दिवसात 90 काेटी वसूल करण्याचे आव्हान कर संकलन विभागापुढे असणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी 17 विभागीय कार्यालये आणि ऑनलाइनची…

Read More