- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
*सुधारित* *प – ४ हजार चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त; अडीच एकर वाहनतळाची जागा मोकळी! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मंगळवारी (दि. १०) अनधिकृत बांधकामांविरुद्ध धडक मोहीम राबवत, कारवाईचा बडगा उगारला. प्राधिकरणाच्या सेक्टर ९ आणि ११ मधील पत्राशेड्स, गॅरेजेस तसेच भोर तालुक्यातील अनधिकृत होर्डिंग्जवर ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४ हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले असून, अडीच एकर शासकीय जागा मोकळी करण्यात आली आहे. दि. १० फेब्रुवारी रोजी सेक्टर ९ मधील पत्राशेड, तसेच सेक्टर ११ मधील ४५ मीटर रस्त्यालगत असलेल्या गॅरेज आणि लेबर कॅम्पवर (कोठी) कारवाई करण्यात आली. वाहनतळासाठी आरक्षित जागेवर उभारलेली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ५ व्या इंडिया इंटरनॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल विजेत्या खेळाडूंचा पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दिल्ली येथे नुकतीच ५ वी इंडिया इंटरनॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड येथील १४ वर्षाखालील ३७ किलो वजन गटात अधिराज शेंडगे याने सुवर्णपदक पटकावले. तर १४ वर्षाखालील ३२ किलो गटात वैष्णवी खत्रावात हिने सुवर्णपदक व सिद्धी हुंबे हिने रौप्य व कांस्य पदक मिळवले. याशिवाय १५ वर्षाखालील ४२ किलो…
शुभेच्छांसाठी हार-पुष्पगुच्छ नको, शैक्षणिक साहित्य द्या उपमहापौर शर्मिला बाबर यांचे नागरिकांना आवाहन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उपमहापौर पदाच्या शुभेच्छा देताना अनेक नागरिक हार, पुष्पगुच्छ तसेच इतर भेटवस्तू आणून देत आहेत. त्याअनुषंगाने उपमहापौर शर्मिला बाबर यांनी आवाहन केले आहे की, उपमहापौर पदाच्या शुभेच्छा देताना हार, पुष्पगुच्छ तसेच इतर भेटवस्तू न देता त्याऐवजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून उपयोगी ठरेल असे साहित्य द्यावे. हे साहित्य ‘मस्ती की पाठशाळा’ या संस्थेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत. मस्ती की पाठशाळा हा उपक्रम बांधकामस्थळ (Construction Site) येथे काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी चालविला जात आहे. रावेत येथे असलेल्या या प्रकल्पांतर्गत सध्या ६० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक साहित्य…
एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तातडीने बदलीचे आदेश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका आस्थापनेवरील एकाच विभागात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्याचे आदेश नवनिर्वाचीत महापौर रवी लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत. महापौर रवी लांडगे आपल्या आदेशात म्हणतात, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणणे हे आपले प्रमुख ध्येय आहे. मात्र, महापालिकेच्या आस्थापनेवरील अनेक अधिकारी आणि कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून अधिक काळ एकाच विभागात अथवा एकाच पदावर ठाण मांडून बसले आहेत. स्थापत्य, पर्यावरण, नगररचना, बांधकाम परवाना, आरोग्य, वैद्यकीय, करसंकलन, भांडार आणि उद्यान यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ…
स्वच्छता, वृक्षारोपण आणि जलसंवर्धनातून विद्यार्थ्यांनी दिला समाजसेवेचा संदेश आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (फार्मसी), आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील साईबाबा सेवाधाम, कान्हे येथे विशेष हिवाळी शिबीर उत्साहात पार पडले. दि. २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित या शिबिरामध्ये ५० स्वयंसेवकांनी ‘समाजसेवेचा जागर’ करत विविध उपक्रम राबविले. विविध सामाजिक उपक्रमांवर भर शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी सेवाधाम परिसराची स्वच्छता केली. विशेषतः किनारा वृद्धाश्रमाजवळ औषधी गुणधर्म असलेल्या शेवग्याच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात या वनस्पतीचा लाभ वृद्धाश्रमातील रहिवाशांना होणार आहे. यासोबतच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ‘शोषखड्डे’ तयार करून जलसंवर्धनाचा महत्त्वाचा संदेश…
स्वच्छता, वृक्षारोपण आणि जलसंवर्धनातून विद्यार्थ्यांनी दिला समाजसेवेचा संदेश आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (फार्मसी), आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील साईबाबा सेवाधाम, कान्हे येथे विशेष हिवाळी शिबीर उत्साहात पार पडले. दि. २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित या शिबिरामध्ये ५० स्वयंसेवकांनी ‘समाजसेवेचा जागर’ करत विविध उपक्रम राबविले. विविध सामाजिक उपक्रमांवर भर शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी सेवाधाम परिसराची स्वच्छता केली. विशेषतः किनारा वृद्धाश्रमाजवळ औषधी गुणधर्म असलेल्या शेवग्याच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात या वनस्पतीचा लाभ वृद्धाश्रमातील रहिवाशांना होणार आहे. यासोबतच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ‘शोषखड्डे’ तयार करून जलसंवर्धनाचा महत्त्वाचा संदेश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे पिं. चिं. शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण जिवनगौरव” पुरस्कार मेजर महेंद्र गवई यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात देण्यात आला.गवई म्हणाले की पुरस्कार प्रेरणा देतात ,सामाजिक कार्य देशसेवा समजून देशहितासाठी करण्याचा मोलाचा संदेश त्यांनी दिला. तुम्ही सेवेसाठी कुटुंबातील एक तरी व्यक्ती द्या असे भावनिक आवाहन उपस्थितांना केले. पुरस्काराला उत्तर देताना अण्णा जोगदंड म्हणाले की, आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि ते दिले पाहिजे या उदात्त भावनेतून आम्ही दोघेही पती-पत्नी काम करत आसतो, आम्ही दोघेही महाराष्ट्र शासनाचे पहिले पती-पत्नी गुणवंत कामगार असून ,यापुढे ही आम्ही सामाजिक काम करत…
‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा उदंड प्रतिसादात संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘मन या अदृश्य इंद्रियावरचे भाष्य म्हणजे ‘मनाचे श्लोक’ होय!’ असे विचार ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिक्षण प्रसारक मंडळीची मराठी माध्यम शाळा, यमुनानगर, निगडी येथे रविवार, दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी व्यक्त केले. मनोनिग्रह फाउंडेशन आयोजित समर्थ भारत अभियान अंतर्गत आंतरशालेय ‘मनाचे श्लोक’ पाठांतर व सूर्य नमस्कार स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात राहुल सोलापूरकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाचे अजेयबुवा रामदासी होते; तसेच समर्थ रामदासस्वामी अभ्यासक विजय गाडगीळ, राम रैना, संयोजक डॉ. राजीव नगरकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड परिसरातील विद्यार्थी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- महापौर पदाच्या शुभेच्छा देताना कुणीही हार, पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू घेऊन येऊ नयेत. त्याऐवजी द्यावयाच्याच असल्यास महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून उपयोगी ठरेल अशी पुस्तके, वह्या, लेखन साहित्य किंवा अन्य शैक्षणिक वस्तू शुभेच्छा अथवा भेटीच्या वेळी आणाव्यात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी केले आहे. महापौर रवी लांडगे हे नुकतेच दोन दिवसीय वरिष्ठ नेत्यांच्या भेटी व दौऱ्यावर होते. या कालावधीत शहरातील नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेता न आल्याबद्दल त्यांनी नागरिकांची दिलगिरी देखील व्यक्त केली. हार-पुष्पगुच्छ क्षणिक सन्मानाचे प्रतीक असले, तरी विद्यार्थ्यांसाठी दिलेले शैक्षणिक साहित्य त्यांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी अधिक उपयुक्त ठरते, असे महापौर रवि लांडगे यांनी…
यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या ‘टीम स्पीडटेल रेसिंग’ने जिंकले विजेतेपद पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या (मेकॅनिकल) ‘टीम स्पीडटेल रेसिंग’ने तामिळनाडूतील कोईम्बतूरच्या कारी मोटर स्पीडवेवर नुकत्याच पार पडलेल्या ‘फॉर्म्युला भारत २०२६ (डायनॅमिक्स)’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कंबशन प्रकारात ‘ओव्हरऑल डायनॅमिक्स’ विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत संघातील अभिषेक साहा याने उत्कृष्ट वाहनचालन कौशल्य व तांत्रिक प्रावीण्याच्या जोरावर ‘सर्वोत्तम चालक पुरस्कार’ मिळवला. वाहन रचना, गतिशास्त्र तसेच अभियांत्रिकी नवकल्पनांतील प्रावीण्याच्या बळावर संघाने हे यश संपादन केले. फॉर्म्युला भारत २०२६ (डायनॅमिक्स) ही भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीची एक प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील मोटरस्पोर्ट स्पर्धा आहे. यात देशभरातील महाविद्यालयीन संघ स्वतः डिझाइन व…
