- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवीतील मजूर अड्ड्यावर मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व दिलासा संस्थेच्या वतीने भितीपत्रके वाटून,शपथ देऊन कविता सादर करुन व आवाहन करून जागृती करण्यात आली. 17 व्या लोकसभेचा मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अशिक्षित असणाऱ्या मजूर अड्ड्यावर जनजागृती करण्यात आली.यामध्ये आण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर मतदान सर्व श्रेष्ठ काम, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. आपलं मत लोकशाहीला मत.प्रलोभनांना बळी पडू नका .असे शर्टवर लिहून जोगदंड स्पीकर मधून मजूर कामगारांना मतदान करण्यासाठी नम्रपणे आवाहन करत होत.त्यांनी मतदान करण्याची शपथ दिली. दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले की, आपली लोकशाही बळकत करण्यासाठी शासनाने दिलेल्या सुट्टीच्या दिवशी भटकंती…
साडेतीन लाख करदात्यांनी घेतला लाभ सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांची माहिती पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा शहरातील साडेतीन लाख करदात्यांनी लाभ घेतला आहे. या करदात्यांना तब्बल 24 कोटी 32 लाख रुपयांची कर सवलत मिळाली आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली. शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळा जमीन, मिश्र यासह विविध अशा 6 लाख 25 हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर संकलन विभागाच्या वतीने कर वसूल करण्यात येतो. 2023-24 या आर्थिक वर्षात 6 लाख 25 हजार मालमत्तांपैकी 5 लाख 11 हजार 154…
श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४ – प्रथम पुष्प पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “संसार हा बुद्धिबळाचा पट असतो. सुसंवादाने अवतीभवती असलेल्या नातेवाईकांचा तर्हेवाईकपणा सांभाळून जगता आले तरच मन:शांती लाभते!” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक ०६ एप्रिल २०२४ रोजी केले. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४ अंतर्गत ‘मन करा रे प्रसन्न’ प्रवचनमालिकेतील ‘नातेवाईक, तर्हेवाईक आणि मन:शांती’ या विषयावरील पहिले पुष्प गुंफताना उपाध्ये बोलत होते. माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मधू जोशी, गतिराम भोईर, राजेंद्र…
श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४ – द्वितीय पुष्प पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आपली दु:खे आणि संकंटे स्वामींना कथन करण्यापेक्षा दुर्दैव सोसण्याची शक्ती मागणे हीच खरी भक्ती होय!” असे प्रतिपादन ह. भ. प. श्रेयस आणि मानसी बडवे या दांपत्याने बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक ०७ एप्रिलला केले. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४ अंतर्गत द्वितीय पुष्प गुंफताना बडवे दांपत्याने कीर्तन जुगलबंदी सादर केली. ज्येष्ठ स्वामीभक्त मधू जोशी, मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे (पाटील), उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधावडे, सहसचिव मीनल…
काळेवाडीत युवा सेनेच्या मेळाव्यात नियुक्तीपत्र वाटप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवा सेनेच्या पदाधिका-यांचा मेळावा काळेवाडीतील इंदू लॉन्स येथे संपन्न झाला. यावेळी युवासेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तसेच युवासेनेच्या पिंपरी व चिंचवड विधानसभेतील विविध पदावर 100 पदाधिकाऱ्यांना युवासेना शहर प्रमुख चेतन (अण्णा) पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, राज्याच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, प्रचार प्रमुख योगेश बाबर, शहर संघटीका अनिता…
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देऊन न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम खासदार श्रीरंग बारणे यांनी केले आहे. त्याची जाणीव ठेवून हजारो शेतकरी मतदान करतील, असा विश्वास आकुर्डीतील ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक शंकरराव पांढरकर यांनी व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) आकुर्डी परिसरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली. बारणे यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस, शिवसेना मावळ तालुका संघटक सुनील तथा मुन्ना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत महापालिकेमार्फत सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी आयोजित करण्यात येणा-या जनसंवाद सभांचे आयोजन केले जाणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचार संहिता १६ मार्च ते ६ जून या कालावधीत घोषित केली आहे. या आचारसंहिता कालावधीत जनसंवाद सभांचे आयोजन केले जाणार नसल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय कार्यालयीन कामकाजाचा दिवस असलेल्या प्रत्येक महिन्याच्या…
– सचिन अहिर, शशिकांत शिंदे, संग्राम थोपटे, बाळाराम पाटील यांची उपस्थिती पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) :- मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे (पाटील) यांच्या प्रचारार्थ रविवार दि. ७ एप्रिल २०२४ रोजी महाविकास आघाडीचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा होणार आहे, अशी माहिती शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर यांनी दिली. रहाटणी येथील विमल गार्डन बँक्वेट हॉल येथे सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड शहर महाविकास आघाडीचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. मेळाव्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख तथा आमदार सचिनभाऊ अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार शशिकांत…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ८ हजार ३८२ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रकिया करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरवले आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ११ हजार ८९८ बॅलेट युनिट, ११ हजार…
पिंपरी विधानसभेतील भाजपा कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिं.चिं भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभेती भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शंकरभाऊं जगताप यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट देण्यात आली.देशात सर्वत्र लोकसभेची प्रचाराची जोरदार तयारी सुरु असताना वाढदिवसाच्या दिवशी महापुरुषांना अभिवादन करुन व तेथील स्वच्छता करण्याचा संकल्प या वेळी सर्व पदाधिकारी यांनी केला, या वेळेस पिंपरी विधानसभेतील सर्व महापुरुषांचे स्मारक स्वच्छ करून त्यांना पुष्पहार अर्पण मानवंदन करण्यात आले. समाजात वेळोवेळी सामाजिक कार्य भाजपा शहराध्यक्ष यांच्या हातून घडत असतात, त्यामधे स्व.लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ महाआरोग्य शिबिर असो, दिव्यांगां ना मदत म्हणून,बचत गट महिलांसाठी योगदान, शालेय विद्यार्थी…
