Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर भरण्याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शहरात सुमारे ७ लाख ३२ हजार ३०२ मिळकतींची नोंद असून, त्यापैकी ५ लाख २६ हजार २२६ मालमत्ताधारकांनी आतापर्यंत मालमत्ता कराचा भरणा केला आहे. तर अद्याप २ लाख ६ हजार ७६ मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली. ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही मालमत्ता कराचा भरणा केला नाही त्यांनी चालू वर्षाचा मालमत्ता कर थकबाकी तातडीने भरावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन…

Read More

बैठकीत नागरी केंद्रीत विकास साधण्यावर देण्यात आला भर पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अंदाजपत्रक तयार करताना आर्थिक परिस्थिती, पारदर्शकता आणि परिणामकारकता यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. विविध विभागांनी नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन नियोजन करावे. नागरी केंद्रित विकास हा महापालिकेच्या कामकाजाचा केंद्रबिंदू राहील आणि त्या दृष्टीने सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. तसेच यामध्ये उपलब्ध संसाधनांचा योग्य व कार्यक्षम वापर करून नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार सुविधा देताना लोकप्रतिनिधींचे सहकार्य देखील प्रशासनाला लाभणार आहे, असे मत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाचा आढावा घेण्यासाठी दिवंगत महापौर मधुकरराव पवळे…

Read More

पिंपरी चिंचवड साहित्य मंच* आयोजित श्रावण शु. प्रतिपदा (२५ जुलै २०२५ ) पासून उपक्रम……. *”लिहिते व्हा…”*…. मालिकेचे नाव : चरित्रात्मक अभंग भाग क्रमांक :- १७, बुधवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ प्रस्तुतकर्ता : सौ.माधुरी शिवाजी विधाटे *संत चोखामेळा* मेहुणपुऱ्यात | चोखा तो जन्मला | मंगळवेढ्याला | स्थिरावला || दुःख उपेक्षेची | मिळे अनुभूती | अस्पृश्य ही जाती | म्हणूनिया || सवर्णांकडून | सोसलासे त्रास | अंतरी विश्वास | विठूवरी || कुठे जन्म घ्यावा | नाही जरी हाती | उद्धरली याती | हरीनामे || पत्नी सोयरा ही | सात्विक वृत्तीची | दृढ भक्ती तिची | विठू पदी || मेहुणे बंकाजी | भगिनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने ‘अर्थसंकल्प प्रचार-प्रसार संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात अर्थसंकल्पातील विविध योजना आणि त्याचा युवकांना होणारा फायदा यावर संमेलनाचे प्रमुख वक्ते तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडी सरचिटणीस हनुमंत लांडगे यांच्या उपस्थितीत व भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर चर्चा करण्यात आली.. हनुमंत लांडगे यांनी, हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून तो विकसित भारताचा पाया रचणारा आहे. विशेषतः कामगार वर्ग आणि मध्यमवर्गीयांच्या हिताचे रक्षण यामध्ये करण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्यावर आधारित रोजगाराच्या संधी यामुळे…

Read More

वाढदिवसानिमित्त डस्टबीन वाटप व ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी.. सामाजिक कार्याद्वारे समाजात जनजागृती निर्माण करण्याचा भिसे दाम्पत्याचा प्रयत्न कौतुकास्पद पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते संजयशेठ भिसे आणि नगरसेविका डाॅ. कुंदाताई संजय भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताचे उपक्रम राबविण्यात आले. प्रभाग क्रमांक २८ अंतर्गत पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनावर भर देत डस्टबीन वाटप तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी परिसरात ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यावेळी ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशन, विठाई वाचनालय, आनंद हास्य क्लब, नवचैतन्य हास्य क्लब, कोकणे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात कै. दिवंगत आमदार लक्ष्मण (भाऊ) पांडुरंग जगताप यांचे भव्य तैलचित्र सन्मानपूर्वक लावण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी महापालिका आयुक्त व महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नढे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत आणि सर्वांगीण विकासात लक्ष्मणभाऊ जगताप यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. अभ्यासू लोकप्रतिनिधी, कुशल संघटक आणि ‘शहराचा डॅशिंग नेता’ म्हणून त्यांची ओळख होती. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषद सदस्य तसेच सलग तीन वेळा विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी विविध पदांवर कार्य करत शहराच्या विकासासाठी योगदान दिले. शहरातील अनधिकृत बांधकामांचा…

Read More

जगन्नाथ पुरी (ओडिशा), (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय मजदूर संघाचे (BMS) तीन दिवसीय २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन धर्मनगरी जगन्नाथ पुरी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले. ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील विविध क्षेत्रांतील हजारो प्रतिनिधींनी सहभाग घेतला. अधिवेशनात कामगारांच्या हिताशी निगडित गंभीर राष्ट्रीय प्रश्नांवर सखोल चर्चा व मंथन करण्यात आले. अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात अखिल भारतीय अध्यक्ष श्री एस. मलेशम यांनी देशातील कामगारविरोधी धोरणांवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी जाहीर केले की दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील सर्व राज्यांतील जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालये, शासकीय कार्यालये, कामगार कार्यालये व ई-कार्यालयांसमोर धरणा आंदोलन करण्यात येईल.…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साऊज्योती फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका जीवनगौरव पुरस्कार लता अण्णा नवले (शितल भानुदास औटी) यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान सुभेदार महेंद्र गवई, डॉक्टर शंकर अदानी तसेच प्रसिद्ध अभिनेते बाळराजे वाळुंजकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. लता अण्णा नवले सध्या श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, आकुर्डी, पुणे–३५ येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले समर्पित कार्य, सामाजिक भान आणि शिक्षणप्रेम यामुळे त्या आदर्श शिक्षिकेचा मान मिळविण्यास पात्र ठरल्या आहेत. या सन्मानामुळे शिक्षण…

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पीसीसीओईआरला पुरस्कार जाहीर  पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ही केजी टू पीएचडी शिक्षण देणारी देशातील एक अग्रेसर शैक्षणिक संस्था आहे. पीसीईटीमध्ये आकुर्डी, रावेत आणि साते, वडगाव मावळ अशा तीन भव्य कॅम्पसचा समावेश आहे. यामध्ये शिशुवर्ग पासून डॉक्टरेट होण्यापर्यंत उच्च शिक्षण देणाऱ्या एकूण दहा संस्थांचा समावेश आहे. यामध्ये २०१४ साली रावेत येथे स्थापन केलेल्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रीसर्च (पीसीसीओईआर) या महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा “उत्कृष्ट महाविद्यालय (व्यावसायिक कोर्स) पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे हे अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी काढले.    पीसीसीओईआर ला सावित्रीबाई फुले…

Read More

भारतीय वारसा हीच आपली खरी ओळख पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “भारतीय कला आणि संस्कृतीचा वारसा हा केवळ इतिहास नसून तो आपल्या प्रगत भविष्याचा पाया आहे,” असे प्रतिपादन फिल्म्स विभागाचे माजी महासंचालक डॉ. मुकेश शर्मा यांनी केले. पुणे महानगरपालिका आणि एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एडीटी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हेरिटेज यात्रा २०२६’चा समारोप पु. ल. देशपांडे कलाग्राम येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, प्र. कुलपती डॉ. नचिकेत ठाकूर, अधिष्ठाता डॉ. माधवी गोडबोले, डॉ. प्रिया सिंग आणि डॉ. अश्विनी पेठे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावर्षीच्या महोत्सवाला पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. गेल्या…

Read More