Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेस (इंटक) च्या वतीने आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मा. अप्पर तहसीलदार कार्यालय, निगडी पुणे येथे कामगार, कर्मचारी व सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकदिवसीय शांततामय व गांधीवादी आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले. केंद्र शासनाने कोणतीही पूर्व चर्चा न करता लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांच्या निषेधार्थ तसेच कामगारविरोधी धोरणे व कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात विविध कामगार संघटना, कर्मचारी संघटना, आशा, अंगणवाडी, एमडीएम कर्मचारी, एनएचएम कर्मचारी तसेच इतर क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान निदर्शने, घोषणाबाजी व सभेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.…

Read More

हिंदमाता व्याख्यानमाला पुष्प तिसरे तळेगाव दाभाडे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज आयआयएम, आयआयटी, एनआयएफटी अशा प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांमध्ये या क्षेत्रात विविध करिअर संधी उपलब्ध झाल्या आहेत. नवीन नियुक्त्या वाढत आहेत. या संस्थांमध्ये मराठी टक्का वाढायला हवा. त्यामुळे पालकांनी मुलांची अंगभूत क्षमता, बौद्धिक क्षमता, आर्थिक क्षमता ओळखून मुलांना प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे माजी संचालक सुरेश वांदिले यांनी केले. दरम्यान, भंडारा डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर कामासाठी हिंदविजय पतसंस्थेच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश ट्रस्टकडे सुपूर्द केला. तळेगाव दाभाडे येथील हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त ‘हिंदमाता व्याख्यानमाले’तील तिसरे पुष्प सुरेश वांदिले यांनी गुंफले. त्यांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्राधिकरण, निगडी येथे महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिवंगत शाहीर कै. राजेंद्र आहेर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शाहीर प्रकाश ढवळे यांनी प्रस्ताविक करत कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली, तर शाहीर अशोक कामथे यांनी मनोगत व्यक्त केले. पुढे उपस्थित शाहीरांनी आपल्या दमदार सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. यामध्ये सुरेश सुर्यवंशी, बाळासाहेब मालुसकर, घनश्याम कुदळे, जालिंदर शिंदे, दुर्गा शिंदे, वनिता मोहिते, स्मिता बांदिवडेकर, चित्रा कुलकर्णी, कांचन जोशी, लिना देशपांडे, ऊव्वला…

Read More

‘डीपीडीसी”च्या बैठकीत आमदार शंकर जगताप यांची निधी देण्याची मागणी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी झालेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आग्रही भूमिका घेत त्यांनी एनसीएल पाषाण उपकेंद्र ते महावितरणच्या औंध कर्मचारी वसाहतीपर्यंत उच्च क्षमतेची (२२ के.व्ही.३०० स्क्वेअर मिमी) नवीन वीज वाहिनी टाकण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली. या मागणीला बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्हा नियोजन समितीची…

Read More

तळेगाव, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) – वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हाच सर्वोत्तम पर्याय आहे, हा संदेश देत एस.एम.एस.ई.टी. बी.एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. वन विभागाने विकसित केलेल्या तळेगाव वन उद्यान, सोमाटणे फाटा येथे महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आवळा, करंज, जांभूळ, शिसम आणि वावळा यांसारख्या विविध देशी प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. वनविभागाच्या वडगाव परिक्षेत्र कार्यालयाने सोमाटणे फाटा येथे सुमारे साडेचार हेक्टर जागेत देशी वृक्ष लागवडीचा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे या मुख्य उद्देशाने हा परिसर हिरवाईने नटवला जात आहे. या ठिकाणी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी आणि ‘समर्पण दिन’ भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजप कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना शर्मिलाताई बाबर यांनी पंडितजींच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्या महान कार्यावर आपले विचार व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते रवींद्र देशपांडे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.…

Read More

लायन्स क्लब इंटरनॅशनल पीस पोस्टर २०२५ – २६ चा पारितोषिक सोहळा संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘चित्रकला हे अव्यक्त संवादाचे माध्यम आहे; पण विश्वशांतीचा प्रभावी संदेश त्यातून जगाला देता येतो!’ असे विचार लायन्स क्लब इंटरनॅशनल मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन एम जे एफ विजय सारडा यांनी ग. दि. माडगूळकर प्रेक्षागृहात मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी व्यक्त केले. लायन्स क्लब इंटरनॅशनल पीस पोस्टर २०२५ – २६ या आंतरराष्ट्रीय विश्वशांती चित्रकला स्पर्धांच्या पारितोषिक वितरण व प्रदर्शन सोहळ्यात विजय सारडा बोलत होते. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी – २ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेश आगरवाल, डिस्ट्रिक्ट ३२३४ डी – २ चे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने दोन दिवसीय संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन विषयी चौथे राष्ट्रीय स्तरावरील परिषद, भोसरी येथील क्वालिटी सर्कल एसलन्स सेंटर मध्ये संपन्न झाली. या दोन दिवसीय परिषदेमध्ये आठ राज्यातील ३३ उद्योग समूहांमधून ३७८ प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. या परिषदेमध्ये ९७ गुणवत्ता केस स्टडी आणि २० विविध विषयावरील तज्ञांची सत्रे सादर करण्यात आली. ज्यामुळे देशभरातील विविध उद्योग समूहातील प्रतिनिधींमध्ये संपूर्ण गुणवत्ता चळवळीबद्दल वाढती बांधिलकी अधोरेखीत झाली. या परिषदेचे आयोजन सेंटर ऑफ एसलन्सच्या वतीने करण्यात आले होते व आयोजनाचे यजमानपद कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चाप्टरने भूषविले होते. यात देशभरातील विविध उद्योग क्षेत्रातील तज्ञ,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथील एमबीए प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी नुकताच हैदराबाद येथे औद्योगिक अभ्यास दौरा पूर्ण केला. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योग विश्वातील प्रत्यक्ष कार्यपद्धती, आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापन कौशल्यांचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. या औद्योगिक भेटीत विद्यार्थ्यांनी इस्रो, हैदराबाद, पारले – जी बिस्किट निर्मिती कारखाना, मस्कती मिल्क अँड क्रीम फॅक्टरी, टी-वर्क आणि झिंदा तिलिस्मत फॅक्टरी या नामांकित कंपन्यांना भेटी दिल्या. इस्रो भेटीत विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन, उपग्रह निर्मिती प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व प्रकल्प व्यवस्थापन याबाबत सखोल माहिती मिळाली. पारले – जी कारखान्यात स्वयंचलित बिस्किट उत्पादन, पुरवठा…

Read More

बाहा – एसएइ इंडिया स्पर्धेत पीसीसीओईचा तृतीय क्रमांक पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभव आणि औद्योगिक आस्थापना मधील अनुभव मिळावा. तसेच सद्य परिस्थितीत औद्योगिक क्षेत्राची उच्चशिक्षित, तंत्र कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेऊन नियोजन केले जाते. या अंतर्गत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये पीसीसीओइचे विद्यार्थी सहभागी होऊन बक्षीस मिळवतात आणि आपल्या संस्थेचे व महाविद्यालयाचे नाव उंचावतात. हा क्षण प्राध्यापकांबरोबरच पीसीइटीच्या विश्वस्त मंडळाला देखील कौतुकास्पद आहे असे गौरवोउद्गार पीसीटीइटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी काढले. पिथमपुर, मध्य प्रदेश येथील नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स येथे बाहा एसएई इंडिया – २०२६ या…

Read More