- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
मावळात महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कामाची नोंद घेणार ‘टीम नमो’ लोकसभा निवडणुकीतील कामावर मिळणार पुढे संधी; महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘अब की बार, चार सौ पार’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक -एक जागा महत्त्वाची असल्याने सहा जणांचे खास पथक दिल्लीहून मावळ लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहे. महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते विजयासाठी करत असलेल्या प्रयत्नांबाबत बारकाईने माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या गोपनीय अहवालाच्या आधारे पुढील संधी मिळणार असल्याने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मताधिक्य मिळवून देण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र दिसत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेतर्फे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात, कादंबरी, कथा, कविता, ललित आणि बालसाहित्य या पाच विभागात महाराष्ट्रातून १८ पुरस्कार विजेत्यांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद – शान्ता शेळके सभागृह, प्राधिकरण निगडी येथे झालेल्या या सोहळ्यास व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ञ डॉ. न. म जोशी, ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनिता ऐनापुरे, डॉ. रजनी शेठ, आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे रविंद्र पाटील, विवेक मोहिले, रजनी दुवेदी, संभाजी बारणे, नंदकुमार मुरडे, सुनंदा शिंगनाथ आदी पुरस्कर्ते उपस्थित…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी काळेवाडी-रहाटणी भागातील मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ काळेवाडी येथील श्री ज्योतिबाच्या पादुका समोर पत्रकाची पूजा करून व नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. व मतदारांच्या घरोघरी जाऊन पत्रक वाटून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. या वेळी शिवसेना उबाठा गटाचे उपशहरप्रमुख हरेश नखाते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली किरण नढे, आम आदमी पक्षाचे संजय मोरे,…
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी निगडी प्राधिकरण येथील अप्पूघर येथील दुर्गा टेकडीवर ‘मॉर्निंग वॉक’साठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे “मशाल” चिन्हाचे बटण दाबून मतदान करा, असे आवाहन मतदारांना केले. या वेळी शिवसेना पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, प्रचारप्रमुख योगेश बाबर, उपशहरप्रमुख अमोल निकम, वैभवी घोडके, संजय दुर्गुळे, निखिल दळवी, अमोल भोईटे, अभिजीत सोनके, विकास भिसे, बापू फाटांगरे, राजू जगदाळे,लाला लाहोटी, तेजस पवार, महेश पानसकर यांच्यासह महाआघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान,…
– पिंपरी व चिंचवड विधानसभेत मतदारांपर्यंत पोहोचली ‘मशाल’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला जात आहे. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य नागरिक, सोसायट्यांमध्ये जाऊन मशाल चिन्ह पोहोचवले जात संजोग वाघेरेंना विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे. मतदार संघातील गेल्या दहा वर्षातील नागरिकांच्या आरोग्य सुविधा, रोजगार, शिक्षण, वाढती महागाई, बेरोजगारी, समाजातील शांतता, कायदासुव्यवस्था या प्रश्नांवर मतदारांशी चर्चा केली जात आहे. या सोबत मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी आणि आपल्यासोबत राहणारा तुमचा प्रतिनिधी म्हणून संजोग वाघेरे पाटील…
– लोकसभा निवडणूक देशाची; विकासाची दृष्टी असणारा माणूस संसदेत पाठवा पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पाच वर्षांपूर्वी आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोनाचे संकट आले आणि अशा संकटातच “ते” राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते. असा गौप्यस्फोट शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या बाबत मोशी येथे केला. महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मोशी येथील गणेश बँक्वेट हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख व बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे…
संजोग वाघेरे यांना वेल्फेयर पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग):- मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पिंपरी चिंचवड शहर वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाकडून पाठींबा देण्यात आला आहे. पिंपरी येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी खासदार संजय राऊत यांचे उपस्थितीत उमेदवार संजोग वाघेरे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. वाघेरे यांनी पाठिंब्याचे पत्र स्वीकारत सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी वेल्फेअर पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सालार शेख, पुणे जिल्हाध्यक्ष जावेद सौदागर, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अमिल सैफी, खाजाभाई नदाफ, इब्राहिम शेख, तौसिफ पठाण, सलीम नदाफ, चांदभाई…
– मावळ लोकसभेत मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारात सक्रीय चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारात त्यांचे सुपुत्र ऋषिकेश वाघेरे देखील सक्रीय आहेत. ते मॉर्निंग वॉकदरम्यान युवकांशी संवाद साधत वडिलांचा प्रचार करत आहेत. मशाल चिन्ह पोहोचविण्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मतदान करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे. विशाल नगर येथील महापालिकेचे ज्ञानज्योती सावित्री फुले उद्यान आणि वाकड येथील तानाजीभाऊ कलाटे उद्यान या ठिकाणी युवा वर्गाशी त्यांनी संवाद साधला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे मयूर जाधव, सुनील कस्पटे, इंजि. देवेंद्र…
बारणे यांच्या पनवेलमधील बाईक रॅली व कामोठेतील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद दक्षिण भारतीय मतदारांचाही बारणे यांना पाठिंबा पनवेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नवीन पनवेल, खारघर व कामोठे या परिसरात काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला तसेच रात्री कामोठे येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली असल्यामुळे त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे, असे आवाहन बारणे यांनी यावेळी केले. बाईक रॅलीमध्ये शेकडे तरुण महायुतीतील आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. रॅलीमधील विजया रथावर खासदार बारणे, यांच्या…
उरुळी कांचन ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रात लोकांची मनस्थिती परिवर्तन करण्याची आहे. दहा वर्षात देशाचा कारभार करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, त्यांची काम करण्याची पध्दत पाहून लोक अस्वस्थ आहेत. देशाच्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, हे दाखवून देण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे, असे प्रतिपादन जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलं. उरुळी कांचन येथे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, जिल्ह्याध्यक्ष जगन्नाथ शेवाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, काँग्रेसचे देवदत्त भन्साळी आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले…
