- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्येष्ठ विधिज्ञ आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे यांना नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ कविवर्य विठ्ठल वाघ व ज्येष्ठ साहित्यिक केशव देशमुख यांच्या शुभहस्ते १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी अकरा वाजता आदर्शगाव हिवरेबाजार, जिल्हा अहिल्यानगर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ॲड. सतिश गोरडे यांची पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, विधिसाक्षरता, कैद्यासाठी मोफत कायदेविषयक साहाय्य, कौटुंबिक मोफत…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी पुण्यात सफाई कामगार आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेत प्रशासनाला स्पष्ट इशारा देत, समस्या वेळेत न सुटल्यास संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे येथील १५ कायमस्वरूपी सफाई कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरपासून वेतन न मिळाल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. याप्रकरणी मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, अतिरिक्त सचिव, जिल्हाधिकारी पुणे, अधीक्षक अभियंता तसेच…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन विविध सामाजिक, कामगार व राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील कामगारांवर लागू होत असलेल्या नव्या श्रम संहितेचे परिणाम, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण तसेच राज्यातील शेतकऱ्यांसमोरील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कामगार व शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी वाळवा-ईश्वरपूर परिसरात जयंतराव पाटील यांचा राजकीय दबदबा कायम असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांच्या…
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या नियोजनासाठी महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमामध्ये पिंपरी चिंचवड शहरातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुरु तेग बहादूर साहिब जी यांनी दिलेल्या त्याग आणि समर्पणाच्या प्रेरणादायी वारशाला अभिवादन करण्यासाठी सहभागी होणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार यासाठी महापालिका कटिबद्ध आहे, असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले. ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य…
पीसीसीओई येथे इंद्रधनु आंतरराष्ट्रीय ग्रँड चॅलेंज स्पर्धा संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हवामान बदल हे सध्याचे सर्वात मोठे वैज्ञानिक आव्हान आहे. हवामान बदल ओळखण्यासाठी एआय हे तंत्रज्ञान उपयोगी आहे. पर्यावरणात आमुलाग्र बदल झाल्यामुळे अचानकपणे आपत्ती उद्भवते. त्यामुळे अति पर्जन्यवृष्टी, दुष्काळ, भूकंप, भूस्खलन अशी संकटे येऊ शकतात. यामुळे तलाव, धरणे, नदीकिनारी असणाऱ्या पूर संरक्षक सीमा भिंती या पायाभूत सुविधा विस्कळीत होऊ शकतात. जसे की, कॅटरिना चक्री वादळात मोठ्या संरक्षक बांधामुळे सुरक्षा होईल असे सर्वांचे मत होते. परंतु तो बांध अयशस्वी झाला उलट त्यामुळे शहराचे अधिक नुकसान वाढले असे अमेरिकेचे न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. पीटर ग्राफमन यांनी सांगितले. पिंपरी…
टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘यशस्वी उद्योजक हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर राष्ट्राचे भाग्यविधाते आहेत!’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी ऑटोक्लस्टर सभागृह, चिंचवड येथे बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी काढले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे या संस्थेच्या वतीने भारतरत्न जे आर डी टाटा आणि उद्योगमहर्षी रतन टाटा पुरस्कार प्रदान सोहळ्यात गिरीश प्रभुणे बोलत होते. आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर अध्यक्षस्थानी होते; तसेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी तौरल इंडिया लिमिटेडचे सी ई ओ ॲल्युमिनियममॅन भरत गीते यांना भारतरत्न जे आर…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शहरात शाहिरी,व्याख्यान यांसह विविध कार्यक्रम आणि शिवजयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धाचे आयोजन – महापौर रवि लांडगे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरात विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली आहे. या प्रबोधन पर्वात ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्यासह ‘शिवशंभो गर्जना’, ‘शाहीरी कार्यक्रम’, ‘यशाचा नवा मंत्र – शिवमंत्र’, विविध विषयांवर व्याख्याने, ‘छत्रपती…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील कौंसिल हॉल येथे आज जिल्हा नियोजन समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. मा. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री श्रीम. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते. या वेळी आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच नागरिकांच्या हिताच्या योजनांना गती देण्याची ठाम मागणी केली. ग्रामीण व शहरी भागासह कॅंटोन्मेंट बोर्डाचा समावेश असलेल्या मावळ तालुक्याच्या विशेष परिस्थितीचा विचार करून या भागासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून…
आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा संस्थान, श्री क्षेत्र आळंदी देवाची यांच्या वतीने राष्ट्रसंत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी संस्थेच्या आळंदी येथील धर्मशाळेत हा उत्सव उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी दिली आहे. या सोहळ्याचे उद्घाटन माजी सामाजिक न्याय मंत्री मा. बबनराव घोलप यांच्या हस्ते होणार असून, भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेश दादा लांडगे यांच्या शुभहस्ते आळंदीचे नगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवकांचा विशेष नागरी सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ ते ११ या…
देशव्यापी संपात कामगारांचे आक्रोश आंदोलन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशात आणि राज्यात श्रमशक्तीचे योगदान मोठे आहे, देशभरातील कामगारांनी लढून, संघर्षातून निर्माण केलेले ४४ कायदे रद्द करून कामगारांना देशोधडीला लावणारे ४ श्रम संहिता रद्द करा. शेतकरी विरोधी धोरणे रद्द करा, वीज कंपन्याचे खाजगीकरण रद्द करा, कष्टकऱ्यांना सामाजिक सुरक्षा द्या अशा मागण्यांसाठी आज थरमॅक्स चौक चिंचवड येथे आंदोलन करण्यात आले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, रिक्षा टॅक्सी संघर्ष महासंघ, बांधकाम कामगार महासंघ, फेरीवाला क्रांती महासंघातर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात झालेल्या कामगार आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महानगरपालिका सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, निमंत्रक सचिन नागाने, बालाजी लोखंडे,माधुरी जलमूलवार, सुनील भोसले,…
