Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अनधिकृत होर्डिंग्ज तत्काळ काढून टाकण्यात यावे. शहरातील होर्डिगचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अनधिकृत असलेले लगेच काढून टाकण्यात यावेत अशी मागणी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष  ॲड . संदीप चिंचवडे यांनी आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काल घाटकोपर मुंबई येथे होर्डिंग कोसळून त्याखाली 8 लोक मृत्यूमुखी पडले आहेत.65लोक जखमी झाले. महानगरपालिकेने वेळीच सावध होऊन आपल्या शहरातील होर्डिग चे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अनधिकृत असलेले लगेच काढून टाकण्यात यावेत जे अधिकृत आहेत त्याचे बाबत इंजिनीअर्स कडून खुलासे घ्यावेत आणि तरी सुद्धा दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी यापूर्वी ज्यांनी परवानग्या घेतल्या आहेत…

Read More

मधुश्री व्याख्यानमाला – प्रथम पुष्प पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “स्वतःला सिद्ध केल्याशिवाय प्रसिद्धी लाभत नाही!” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी  निगडी प्राधिकरण येथे  व्यक्त केले. मधुश्री कला आविष्कार आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘कलारसिक ते सिनेनिर्माते’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना भाऊसाहेब भोईर बोलत होते. कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे अध्यक्षस्थानी होते; तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे, मधुश्रीच्या अध्यक्ष माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार, सचिव राजेंद्र बाबर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानापूर्वी, आदर्श गृहनिर्माण संस्था…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील जुनी सांगवी येथे वसंतदादा पुतळा, बसस्टॅन्ड समोर उभारण्यात आलेल्या पालिकेच्या सीएनजी गॅस शवदाहिनीच्या इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनलमध्ये बिघाड झाल्याने ­­­­शवदाहिनी चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती ह क्षेत्रीय कार्यालयातील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ यांनी दिली.            जुनी सांगवी येथील सीएनजी गॅस शवदाहिनीत अंत्यसंस्कारासाठी पिंपरी मनपा क्षेत्रातील विविध ठिकाणाहून नागरिक येतात. सीएनजी गॅस शवदाहिनीच्या इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल मध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी मे.एन.वाय.सी. एंटरप्रायजेस यांना चालन, देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले आहे. तरीही हे काम पूर्ण होण्यास चार दिवस लागणार असल्याचे  ह प्रभागातील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप…

Read More

* प्रभागनिहाय महापालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी * आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन अन्‌ पदाधिकारी सतर्क पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील भोसरी विधानसभा मतदार संघात पावसाळा पूर्व कामे मार्गी लावण्यासाठी तसेच, आपत्ती व्यवस्थान व नियोजन अचूक करण्यासाठी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांची ‘टीम’ महापालिका प्रशासनासोबत मैदानात उतरली आहे. मुंबई-घाटकोपर येथे वादळी पावसामुळे होर्डिंग कोसळून १८ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये मोशी येथील जयगणेश साम्राज्य चौकात होर्डिंग कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणहीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, पावसाळापूर्व कामे आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज करण्यासाठी आमदार लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आमदार महेश…

Read More

विशाखा सुभेदार व पंढरी कांबळे यांना ‘कला गौरव पुरस्कार’ जाहीर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त देण्यात येणारा ‘कला गौरव पुरस्कार’ यंदा महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम विशाखा सुभेदार व पंढरी कांबळे यांना अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुरस्कार प्रदान समारंभ येत्या रविवारी (१९ मे) सायंकाळी ६.०० वाजता कै. गोळवलकर मैदान (गोल मैदान) यशवंत नगर, तळेगाव दाभाडे स्टेशन येथे आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -दिघी मधील श्री कॉलनी येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रकाश वीर यांनी केले तर छत्रपती  संभाजी महाराज यांच्या जीवनावरील माहितीपट  ऋषिकेश जाधव , प्रकाश वीर ,नामदेव राठोड यांनी सादर केले . तसेच ऋषिकेश जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा समजावून सांगितली . छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवामध्ये विठाई महिला भजनी मंडळ यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पाळणा सादर केला . तसेच ऐतिहासिक अभ्यासक असणारे संतोष घुले यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर कसे होते या विषयावरती मार्गदर्शन केले . कार्यक्रम प्रसंगी स्वरा तापकीर , शर्वरी कोरडे ,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे झालेल्या २०२३-२४ दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमधील परीक्षेला बसलेले शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. परीक्षेला एकूण ११९ विद्यार्थी बसले होते. दहावीतील सिद्धी मावळंगकर हिला ९६.४० टक्के गुण मिळवून ती विद्यालयामध्ये प्रथम आली आहे. आरोही सुतावानी (९५.८०),कृष्णा काळे (९५.२0),सिद्धेश सावंत (९४.४०), यश शर्मा (९४.२०) हे सर्व अव्वल ठरलेले विद्यार्थी आहेत. विद्यालयातील एकूण १९ विद्यार्थ्यांना ९०% हून अधिक गुण मिळाले आहेत ,तर २९ विद्यार्थी हे ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी कॅम्प येथील सावली निवारा केंद्र या निराधारांचे पालन – पोषण आणि उपचार – संगोपन करणाऱ्या संस्थेला पिंपरी चिंचवड काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून आवश्यक वस्तूंची मदत करत सेवा कार्य करण्यात आले. मानवतेला साजेसे आणि मानवी जीवनाचे एक वेगळे रूप या ठिकाणी अनुभवायला मिळाले अतिशय सुंदर, संवेदनशील, सहृदय असे काम या ठिकाणी संस्थेचे संचालक मा. हुसैनि  यांच्याकडून आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून केले जात आहे. रस्त्यावर किंवा समाजात इतरत्र निराधार बेवारस अवस्थेत आजारपणात पडून असलेल्या माणसांना या ठिकाणी आणून त्यांची सेवा संगोपन उपचार केले जातात. या अशा उल्लेखनीय कार्याला हातभार लावला गेल्याबद्दल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला. अखिल…

Read More

दोन दिवसीय सर्वेक्षणानंतर सोमवारपासून अनधिकृत होर्डिंगवर मनपा करणार कारवाई पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अनधिकृत होर्डिंग कोसळून होणाऱ्या अपघाताचा धोका कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरामध्ये सर्वंकष सर्वेक्षणास बुधवार, दिनांक १५ मे रोजीपासून सुरुवात करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आठ झोनमध्ये परवाना निरीक्षकांद्वारे शुक्रवार, दिनांक १७ मे रोजीपर्यंत दोन दिवसीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वंकष सर्वेक्षणासाठी नोडल अधिकारी म्हणून संदीप खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शुक्रवार, दिनांक १७ मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असून सर्वेक्षणाच्या निकर्षांवर विचार करण्यासाठी होर्डिंग मालकांना बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे. ‘या’ बाबींचे होणार सर्वंकष सर्वेक्षण… सर्वेक्षणामध्ये होर्डिंग्जचे कायदेशीर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अजित पवारांनी अमोल कोल्हेंना आव्हान देत, शिरूर लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यामुळं अख्ख्या राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे होतं. त्याच शिरूर लोकसभेतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना  संधी दिली. तर कोल्हेंना दुसऱ्यांदा खासदार होऊ न देण्याचा चंग बांधलेल्या अजित पवारांवर उमेदवार आयात करावा लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक आणि माजी खासदार शिवाजी आढळरावांना घड्याळाच्या चिन्हावर उतरविण्याची ‘वेळ’ अजित पवारांवर आली. 2019 च्या तुलनेत यंदा मतांची टक्केवारी पाच टक्क्यांनी घसरली असून त्याचा फटका कुणाला बसणार हे 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. उमेदवार ठरल्यानंतर सुरू झाली ती आव्हान-प्रतिआव्हानांची लढाई. आधी अजित पवारांचं मग शिवाजी…

Read More