- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या वतीने वकील बार रूम मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. या वेळी अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे, माजी अध्यक्ष ॲड.नारायण (नाना) रसाळ, ॲड.सुनिल कडूसकर, ॲड.जे.के.काळभोर ( काका ) ,ॲड.गायकवाड, ॲड.अरुण (मामा) खरात, ॲड.बी.के कांबळे, ॲड.अधिक चरेगावकर,ॲड. राजेश रणपिसे, ॲड.रुपाली पवार,ॲड.अंजली सावंत, ॲड. गुंजाळ, ॲड. सुरेखा शेख इ.वकील मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड.गोरख कुंभार, महिला सचिव ॲड.वर्षा तिडके, खजिनदार ॲड.ऐश्वर्या शिरसाठ ॲड.जयेश वाकचौरे, ॲड.तेजश चवरे, ॲड.विशाल पौळ यांच्याकडून करण्यात आले.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ चारही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होत असून नागरिकांना मतमोजणीविषयक माहिती देण्यासाठी मतमोजणी केंद्रावर संवाद कक्ष तयार करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना मतमोजणी विषयक माहिती घेता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दापोडी मधील ज्येष्ठ नागरिक मोनिका व्हिक्टर स्टीफन यांचे शनिवारी (दि.१) निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुली, दोन मुले, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माध्यम क्षेत्रातील जेष्ठ छायाचित्रकार रूप सिंग यांच्या त्या थोरल्या भगिनी होत. तसेच पुणे, पिंपरी मध्ये विविध वृत्तपत्रात कार्यरत असलेले छायाचित्रकार संजय आणि राजेश स्टीफन यांच्या त्या मातोश्री होत.
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा मतमोजणीच्या दिवशी असणाऱ्या विधी आणि इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन आणि एन.एस.यु.आय.ने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या एलएलबी या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या शेवट सत्राच्या परीक्षेचा पहिला पेपर दि.०४ जून २०२४ रोजी होत आहे; परंतु सदर दिवशी देशातील अठरावी लोकसभा निवडणूक २०२४ची मतमोजणी असल्याने या कामकाजासाठी अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, पदाधिकारी यांची नेमणूक असणार आहे. असे अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी जे एलएलबी सोबतच इतर अभ्यासक्रमाचा अभ्यास करीत आहे अशा बहुतांशी अधिकारी व कर्मचारी…
पावणेतीन लाख मालमत्ता धारकांनी भरला कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी तत्काळ कर भरणा करण्याचे महापालिकेचे आवाहन पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाची ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्टाईल ‘बॅटिंग’ सुरू असून अवघ्या 60 दिवसांत तब्बल 308 कोटींचा कर वसूल करण्यात आला आहे. विविध कर सवलतींचा लाभ घेत 2 लाख 71 हजार 503 मालमत्ता धारकांनी आपला कर भरणा केला आहे. तसेच 30 जूनपर्यंत असलेल्या कर सवलतींचा लाभ घेऊन कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. शहरात 6 लाख 30 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. गतवर्षी विभागातर्फे राबविलेले विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, नोटीसा, नळ…
महापालिका अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवूनही शहर भाजप पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने सुरु आहे बांधकाम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथे स्वतःची पाऊणगुंठा जागा असतानाही सव्वा गुंठा जागा ताब्यात घेऊन अनधिकृत बांधकाम सुरु आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवूनही शहर भाजप पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने हे धोकादायक बांधकाम सुरु आहे. याबाबत महापालिका आयुक्त, कार्यकारी अभियंता, बांधकाम परवानगी व अनधिकृत, बांधकाम नियंत्रण विभाग, उपअभियंता, बांधकाम परवानगी व अनधिकृत, बांधकाम नियंत्रण विभाग ‘ड’ प्रभाग, तसेच महापालिकेच्या ऑनलाईन प्रणालीवर तक्रार करूनही अनधिकृत बांधकाम जोरात सुरु आहे. निकृष्ट दर्जाचे हे बांधकाम आजूबाजूच्या नागरिकांना धोक्याचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम वेळीच थांबविण्याची मागणी मराठवाडा जनविकास…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस नागरी हक्क सुरक्षा समिती पक्ष संघटनांच्या वतीने शुक्रवारी पिंपरीत “मनुस्मृती दहन” आंदोलन केले. इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या पाठ्यक्रम शालेय शिक्षण विभागाकडून तयार केलेला असून, त्यामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश अभ्यासक्रमात केल्याने पुन्हा एकदा चातुवर्ण्य, अंधश्रद्धा याला खतपाणी घालण्याचे व समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत होत आहे. तसेच शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा चंचुप्रवेश कोणालाही मान्य नसून, कदापिही त्याचा समावेश केला जाता कामा नये,आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, ही सर्वमान्य समाज प्रतीकात्मकरित्या सरकारला समजावी,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशातील तमाम नारीशक्तीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श असल्याने संस्कार, संस्कृती आजही कायम आहे, असे मत पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त पिंपरी महापालिका भवना जवळील अहिल्यादेवी चौकात जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सिमाताई बोलत होत्या. अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांनी अभिवादान केले. यावेळी कासारवाडी येथील आशा शेंडगे-धायगुडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने परमपूज्य अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंतीचे आयोजन केले होते. शहरातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकींतर्गत जिल्ह्यातील सर्व चार लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होत असून मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. डॉ. दिवसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, रोहिदास पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते. बारामती आणि पुणे लोकसभा मतदार संघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये, शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव, ता. शिरुर येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामामध्ये तर मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शिवछत्रपती क्रीडा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोरवाडी पिंपरी येथील पुतळ्याला संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मयूर जगताप यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे महासचिव संतोष शिंदे यांनी जयंतीनिमित्त असे मनोगत व्यक्त केले की अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना…
