Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी केवळ मार्क महत्वाचे नाहीत. स्वतःमधील गुण ओळखून कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे ठरवा. उच्च गुण प्राप्त करणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होतोच असे नाही, यासाठी बुध्दिमत्ता आवश्यक आहे. आपली बुध्दिमत्ता कोणत्या क्षेत्रात चालते हे ओळखता आले, तर खऱ्या अर्थाने तुमच्या करिअर वाटा मोकळ्या होतील. गुणवत्तेबरोबर बुध्दिमत्ता महत्वाची असल्याची ठोस भूमिका माजी सनदी अधिकारी डॉ. अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करताना शनिवारी मांडली. तसेच करिअर आणि व्यक्तिमत्त्वासाठी विचार व आचाराची त्रिसूत्रीही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पिंपरीतील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करिअर मार्गदर्शन विशेष…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडीतील विविध विकास कामे पूर्ण कामे पूर्ण करण्यात यावी अशी मागणी  दिनेश यादव यांनी अतिरिक्त आयुक्त  प्रदिप जांभळे पाटील यांना  लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुदळवाडी भागात विविध मागणी साठी आज दिनेश यादव यांनी पिपंरी  चिंचवड  महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली.आमदार  महेश लांडगे यांच्या मार्गदर्शन खाली अनेक विकास कामे सुरू करण्यात आली आहेत.कुदळवाडी भागात ट्राफिक समस्या सोडवण्यासाठी अंतर्गत डिपी रस्ते विकसित करण्यासाठी दिले लेखी पत्र तसेच कुदळवाडी नाला बांधकाम करण्यासाठी ही पत्र दिले. स्वी सदस्य दिनेश यादव यांनी आमदार  महेश लांडगे यांच्या सहकार्याने विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे .कुदळवाडी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जात असली तरी या नगरीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाही आहे. संस्कृती आणि कलेची हीच आवड लोकांमध्ये निर्माण करण्याचे तसेच पिंपरी चिंचवडची सांस्कृतिक ओळख जपण्याचे काम महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी अकादमीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले. नाट्यगीत, अभंग, शास्त्रीय गायन, सतार-व्हायोलिन जुगलबंदी, सहगायन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेल्या ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव २०२४’ चे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. महापालिकेच्या ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पालक मंत्री पुणे जिल्हा  अजित पवार यांच्या सूचनेनुसार शासन आपल्या दारी हा उपक्रम चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) व पिंपरी चिंचवड अप्पर तहसिल कार्यालय व पुणे, मुळशी तहसिल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदरचा कार्यक्रम दि.१० जून, १४ जून, १८ जून,१९ जून, २४ जून २०२४ दरम्यान चिंचवड विधानसभेतील विविध भागात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यासाठी शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे, महिला अध्यक्षा प्रा. कविता…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचे प्रा. गणेश रामकृष्ण राहाटे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘ॲन इमप्रुव्हड व्हर्टीकल हॅण्ड ऑफ फाॅर नेक्स्ट जनरेशन हेट्रोजेनियस वायरलेस नेटवर्क’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला. त्यांना पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. राहाटे यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होत संशोधन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांसह सहयोगी संशोधन – प्रा. डॉ. गुयेन ची न्गॉन, डीन, कॅन-थो युनिव्हर्सिटी व्हिएतनाम. प्रो. न्युयेन व्हॅन कुओंग, डीन, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी कॅन-थो युनिव्हर्सिटी व्हिएतनाम.…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रासह, महाराष्ट्रातील विविध संतांच्या साहित्याचा समावेश करावा अशी मागणी भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर, विद्यार्थी विभाग, जिल्हा संयोजक अनिकेत ज्ञानेश्वर शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.       पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत शेलार यांनी तसे पत्र बालभारतीच्या संचालक आणि पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त यांना दिले आहे.       छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदीप्यमान इतिहास सर्वांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. महाराष्ट्र ही अनेक थोर संत, समाज सुधारक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- आजची मुले ही उद्याच्या देशाची उज्ज्वल भविष्य आहेत, विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी तसेच समस्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण गुणवत्तापूर्ण विकास व्हावा यासाठी महापालिका शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांत मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून या उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी ते सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. येत्या शैक्षणिक वर्षात सर्वांनी योग्य समन्वयाने काम केल्यास विद्यार्थ्यांचा गुणवत्तावाढीचा आलेख अधिकाधिक वाढेल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने महापालिकेच्या बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांच्यासमवेत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये येत्या सोमवारी(दि.१० जून) सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या असून ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या कालावधीत जनसंवाद सभा…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाहूनगर येथील शाहू वाचनालयाच्या वतीने साडेतीनशे वा शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. जेष्ठ उद्योजक लक्ष्मण टक्केकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवव्याख्याते राजेंद्र घावटे यांनी शिवराज्याभिषेकाची महती व्याख्यानातून सांगितली. “भारताच्या इतिहासातील ती एक अलौकिक घटना असून राज्याभिषेकामुळे लोककल्याणकारी आदर्श राज्याची स्थापना झाली. सुवर्णाक्षरांनी लिहावा असा हा इतिहास आहे.” असे ते म्हणाले. माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, अधाटे गुरुजी, राजेंद्र पगारे, दयानंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मनीषा पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन गणेश सहाणे यांनी तर आभार प्रदर्शन राजाराम रायकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्राजक्ता पवार,…

Read More

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा पुढाकार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी प्रभाग क्रमांक २७मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून आणि माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे, उद्योजक अनिल नखाते, अजय कदम, संदीप गोडांबे, शिवसेनेचे उपशहरप्रमुख अंकुश कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप दळवी यांच्यासह प्रभागातील नागरिक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले की, वृक्ष म्हणजे निसर्गाचे खरे रत्न. ते आपल्याला केवळ…

Read More