Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह दि. २८ जून २०२४ पर्यंत  अर्जित रजेवर गेले आहेत. या कालावधीत राज्य शासनाने पुणे महानगर प्रदेश विकास  प्राधिकरणचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला  आहे. याबाबतचा स्वतंत्र आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने निर्गमित केला आहे. आयुक्त राहुल महिवाल यांनी विभागप्रमुखांसमवेत महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज बैठक घेऊन महापालिका कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी आषाढीवारी पालखी सोहळा, आपत्ती व्यवस्थापन, नालेसफाई तसेच इतर तातडीच्या विषयाबाबत माहिती घेऊन संबधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास…

Read More

“सुलतान” लघुपटाचा वर्ड प्रिमियर जर्मनीतील स्टूटगार्ट शहरात जूलै मध्ये पार पडणार पिंपरी, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) – भारतीय चित्रपट आतंरराष्ट्रीय महोत्सव स्टटगार्ट हा युरोपमधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव आहे. 2004 पासून तो दरवर्षी जुलैमध्ये पाच दिवस फिल्मब्युरो बॅडेन-वुर्टेमबर्गद्वारे जर्मनीमधील स्टूटगार्ट येथे आयोजित केला जातो. दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेला सुलतान या लघुपटाची युरोप खंडातील जर्मनी मधील स्टुटगार्ट या शहरात पार पडत असलेल्या या २१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल स्टुथगार्ट २०२४ साठी अधिकृत निवड झाली असून सुलतान लघुपटाचा वर्ल्ड प्रिमियर जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहरात जूलै महिण्यात पार पडणार आहे. स्पर्धेतील कित्येक लघुपटाला मागे टाकून सुलतानची या महोत्सवासाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह हे तब्बल १८ दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. दि.११ जून ते २८ जून या कालावधीत त्यांनी अर्जित रजा घेतली आहे. त्यांच्या उपरोक्त कालावधीत श्री. राहुल महिवाल, भाप्रसे, महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश महाराष्ट्र राज्याचे कार्यासन अधिकारी शिवाजी बा. चव्हाण यांनी दिले आहेत. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दि.११ ते दि.२८ जूनपर्यंत रजा मागितली होती. त्यांच्या या अर्जित रजेस सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे. शेखर सिंह यांच्या उपरोक्त रजा कालावधीचा आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बकरी ईदच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सर्व संबधित विभागातील कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत पिंपरी येथील महापालिका मुख्य कार्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहामध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता संजय…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी – पिंपळे सौदागर येथे महानगरपालिकेच्या  वतीने पिंपळे सौदागर येथे सुमारे  ४ एकर एवढ्या क्षेत्रात, आत्याधुनिक सर्व सोयीसुविधायुक्त योगा पार्क  बांधण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत आतापर्यंत ३२४ कोटींची विविध विकास कामे  करण्यात आले.आहेत. यापैकी स्मार्ट सिटी अंतर्गत योगा पार्क विकसित करण्यात आले आहे. हे योगा पार्क याच  जुन महिन्याच्या अखेरिस नागरिकासाठी खुले करण्यात येणार आहे. सुरूवातीला या पार्क मध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही परंतु या पार्कची निगराणी राखण्याकरीता या पार्कमध्ये येण्यासाठी वेळ व प्रवेश शुल्क ठरवले जाईल, यामध्ये मनपाचा वतीने प्रत्येक व्यक्ती मागे ५ किवां १० रूपये शुल्क आकारण्यात येईल जेणेकरून या…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) च्या पुणे शाखेतील 2 विद्यार्थिनी विद्यार्थ्यांनी मानाच्या JEE Advanced 2024 परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून लक्षणीय यश संपादित केले आहे. या विद्यार्थ्यांचे हे यश म्हणजे त्यांचे कष्ट, निष्ठा आणि  AESL मध्ये मिळणा-या उच्च दर्जाच्या मार्गदर्शनाला मिळालेली पावतीच आहे.  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास ने आज या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला. स्वरा टकले हिला देशात 595 वा क्रमांक मिळाला तर अक्षत बाझल ने 983 वे स्थान पटकाविले. या विद्यार्थ्यानी AESLच्या क्लास रूम तुकडीत मार्गदर्शन घेत जगातील अत्यंत अवघड प्रवेश परीक्षा मानली जाणा-या JEE Advanced 2024 परीक्षेची तयारी केली. त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय अभ्यासतील विविध संकल्पना समजावून देण्यासाठी घेतलेले खडतर परिश्रम आणि अभ्यासाचे अत्यंत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील शाळांचे फायर सेफ्टी नूतनीकरण फी वाढवू नये म्हणून शाळांच्या वतीने अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे.  महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या खाजगी शाळांना फायर सेफ्टी नूतनीकरण फी वाढवण्यात आली आहे. यामुळे शाळांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. याविरोधात अमित गोरखे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. अमित गोरखे यांनी पत्रात म्हटले आहे की शाळा मुलांच्या सुरक्षेसाठी फायर सेफ्टीसारख्या महत्त्वपूर्ण नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, परंतु फी वाढवल्याने शाळांवर अनावश्यक आर्थिक ताण येतो. शाळांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन फी वाढवणे योग्य नाही. फायर सेफ्टी नूतनीकरणच्या फी ची वाढ रद्द…

Read More

भोसरीत भाजपा आमदार महेश लांडगे यांची आढावा बैठक आठ दिवसांत कामे मार्गी लावण्याची अधिकाऱ्यांना सूचना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदार संघातील पावसाळी पूर्व कामे आगामी ८ दिवसांत मार्गी लावा. रस्ते खोदाई नियमावलीची कठोर अंमलजावणी करावी आणि नागरी आरोग्याच्या दृष्टीने साथीचे रोग प्रतिबंधक औषध फवारणी करावी, अशा सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका फ-क्षेत्रीय कार्यालयात पावसाळा पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी स्थापत्य विभागाचे मुख्य शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह फ-क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, स्थापत्य, आरोग्य, उद्यान, वैद्यकीय आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. भोसरी मतदार संघातील  चिखली गावठाण, पाटीलनगर, मोरेवस्ती,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकड येथे माध्यमिक विद्यालयासाठी नव्याने इमारत बांधण्यात आलेली आहे. या विद्यालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वाकड येथील सर्व्हे क्र. १७२ येथे माध्यमिक विद्यालयासाठी (एसएस ४/२३) नव्याने शाळा इमारत बांधण्यात आलेली आहे. महानगरपालिका शाळांमध्ये शहरातील गोरगरीब व वंचित कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. या मुलांना आपल्या देशाच्या राष्ट्रपुरूषांचा इतिहास अगदी लहान वयातच समजला तर मुलांना शिक्षणात गोडी वाढेल. हीच मुले आपल्या देशाचे…

Read More

*दरवर्षी 1 हजार कोटी रुपयाच्या टॅक्सची केली जाते चोरी, GST विभागाच्या कार्यपध्दतीवर शंका* *बनावट कंपन्या उभा करुन GST बुडवण्याचा राजे रोस रहमानी खेळ सुरु* *अनेक भंगार व्यावसायीकांचा यात समावेश* चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी येथे काही वर्षापासून GST वाचवण्यासाठी वेगवेगळे हातकंडे वापरून, भंगाराच्या बोगस कंपन्या उभ्या करुन हजारो कोटी रुपयाची टॅक्सची चोरी करणारे मोटे रॅकेट सक्रीय असून त्यांच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक उत्पन्नावर डल्ला मारण्याचे काम राजेरोसपणे केले जात आहे. तर यातुन अनेक उद्योजकांची देखील फसवणुक केली जात आहे. असे असले तरी पुण्यातील GST विभागातील काही अधिकारी या रॅकेट मध्ये सहभागी असल्याने या रॅकेटमध्ये वाढ होत असल्याचे शिव श्रमिक…

Read More