- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील मिलिटरी इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या आर्मी रोईंग नोडवर नुकत्याच पार पडलेल्या ४९व्या महाराष्ट्र राज्य आऊटडोउर रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या डाॅ.विश्वनाथ कराड क्रीडा अकादमीने तीन सुवर्ण, एक रौप्य व एका कांस्य पदकासह बाजी मारली आहे. वरिष्ठ डब्ल्यू-२ गटात स्नेहा सोळंकी, भाग्यश्री घुले या जोडीने तर सब-ज्युनियर (१५ वर्षांखालील) गटात प्रतीक पवार व सांघीक एसजेबी-4 गटात वैभव लाड, श्रेयस गर्जे, प्रथमेश कांदे, कार्तिक कांबळे यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर ज्युनियर (१८ वर्षांखालील) गटात ओम लाड व शुभंकर फड या जोडीला सुवर्णपदक अगदी थोड्या फरकाने हुकल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर एसजेबी-२…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेतील सर्व प्रशासकीय कामकाज मराठी भाषेतून करण्यात यावे, यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्त असलेल्या अधिकारी कर्मचा-यांना अवगत करून आपल्या विभागातील सर्व कामकाज आणि अधिकारी कर्मचा-यांच्या स्वाक्षऱ्या मराठी भाषेतून होतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना महापालिका प्रशासन विभागाच्या वतीने सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. महापालिका कामकाज आणि व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाद्वारे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या सर्व प्रशासकीय कामकाजात तसेच व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले असून त्याबाबत सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील सर्व कामकाज मराठी भाषेत होईल याची दक्षता घ्यावी,असे परिपत्रक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासन…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळ्यापैकी ६ पालखी सोहळ्यातील ३४४ दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे ६८ लाख ८० हजार रुपये अनुदान देण्यास पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह भ प अक्षय महाराज भोसले यांनी दिली . आषाढी एकादशीपुर्वी राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळ्यातील सुमारे १५०० दिंड्याना वारकरी दिंडी सन्मान निधी योजनेची २० हजार रुपये रक्कम थेट लाभधारक दिंडी किंवा दिंडी चालक यांच्या नावावर जावी याबाबत शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रमुख अक्षय महाराज भोसले यांनी शासन दरबारी जोरदार प्रयत्न केले होते…
‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ शब्दधन काव्यमंचचा उपक्रम पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “दर्जेदार गझललेखन शिवधनुष्य पेलण्यासारखे असते! मीना शिंदे या मराठीत दिवान लिहिणार्या आद्य महिला गझलकार आहेत. आपल्या लेखनातून त्यांनी प्रयोगशीलता जपली आहे!” असे गौरवोद्गार आद्य मराठी गझल संशोधक प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी वाकड, पिंपरी येथे काढले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमात ज्येष्ठ गझलकारा मीना शिंदे यांना सन्मानित करताना सांगोलेकर बोलत होते. सन्मानचिन्ह, ग्रंथ, शाल आणि श्रीफळ असे सत्काराचे स्वरूप होते. सत्काराला उत्तर देताना मीना शिंदे यांनी, “ज्ञानोबा – तुकोबा यांच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी ‘साहित्यिक येता घरा, तोचि दिवाळी – दसरा”…
सांगवी-रहाटणी मंडल महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी सांगवी-रहाटणी मंडल महिला मोर्चाच्या कार्यकारिणीवर नवीन महिला पदाधिकाऱ्यांची आज निवड करण्यात आली. या नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना माझ्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. या सर्व महिला पदाधिकारी सांगवी-रहाटणी मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभा नवनाथ जांभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम करणार आहेत. त्यामध्ये चिंचवड विधानसभा महिला मोर्चा प्रमुखपदी कुंदा भिसे, सांगवी-रहाटणी मंडल महिला मोर्चा सरचिटणीसपदी पल्लवी दिलीप काशीद, प्रभाग क्रमांक २९ महिला मोर्चा अध्यक्षपदी वैशाली भरेकर, उपाध्यक्षपदी आशा टटले, प्रभाग क्रमांक ३१ महिला मोर्चा अध्यक्षपदी शितल आगरखेड, उपाध्यक्षपदी वैशाली जाधव, सचिवपदी रेखा दिनेश कदम, प्रभाग क्रमांक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सोनवणे वस्ती चिखली प्र. कं. १ येथे बांधलेल्या टाऊन हॉल या इमारतीस पिंपरी चिंचवड मनपाचे दिवंगत नगरसेवक तथा स्व. दत्तात्रय काका साने यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी विजय जरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनवणे वस्ती येथे पिं चिं महानगरपालिका यांनी जो टाऊन हॉल बांधला आहे त्या टाऊन हॉलला पिं. चिं. दिवंगत नगरसेवक तसेच विरोधीपक्ष नेते स्व. दत्तात्रय (काका) साने यांचा नाव देऊन त्यांनी जे पिं चिं. महानगरपालिके साठी दिलेले योगदान, तसेच जी केलेली जनसेवा व कोरोना काळामध्ये केलेल्या बहुमुल्य मोलाचे काम हे चिखली करांसाठी व नागरिकांसाठी अविस्मरणीय आहे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहरामध्ये झिका आजाराचा रुग्ण आढळून आल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. यासंदर्भात त्वरीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी शहरातील पालिकेच्या सर्व रुग्णालयांना दिल्या आहेत. वैद्यकीय विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू हा Flavivirus प्रजातीचा असून तो एडिस डासामार्फत पसरतो, अशी माहिती वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आली आहे. झिका आजाराची लक्षणे डेंग्यू आजारासारखी असतात. ताप, अंगावर रॅश (पुरळ) उमटणे, डोळे येणे, खांदे व स्नायु दुखणे, थकवा आणि डोकेदुखी ही लक्षणे सौम्य स्वरुपाची आणि २ ते ७ दिवंसापर्यंत राहतात. झिका…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात १ जुलै २०२४ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी महायुती सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना असून, या योजनेचा पिंपरी चिंचवड शहरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील महिला भगिनींना या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेता यावा, तसेच योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदार संघातील विमल गार्डन, रहाटणी येथे गुरुवार, दि.४ जुलै रोजी, सकाळी १० वाजता…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहीत पवार, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे आदी उपस्थित होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि त्यांच्यासोबत १४ नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत, असे वृत्त होते. त्यानंतर आता युवक सेलमधील बड्या पदाधिकाऱ्यासह पिंपरी विधानसभा अध्यक्षांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंद कामगार संघटनेच्या नोंदणीकृत बांधकाम कामगार सभासदांना संसार भांडे किट वाटप करण्यात आले. तसेच बांधकाम कामगारांची रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कामगारांना माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. निर्मला सद्गुरू कदम यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना संसार किट वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे शितल सिकंदर, पुष्पा सितापराव, सविता भावके, दत्ता पवार, फिलिप सिकंदर, रविंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
