- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– रिक्षा, टॅक्सीसह इतर प्रवासी वाहनांना होणारा लेट पासिंग दंड रद्द करण्याची घोषणा – महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने निर्णयाचे स्वागत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रिक्षा, टॅक्सीसह इतर वाहनांना लेट पासिंगबाबत दर दिवशी लावण्यात येणारा ५० रुपयांच्या दंडाचा जुलमी कायदा अखेर रद्द करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिक्षा चालक, मालक यांनी सुरू ठेवलेल्या लढाईला यश आले असल्याचे प्रतिपादन ऑटो, टॅक्सी, रिक्षा, टेम्पो, बस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले. तसेच राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे बाबा कांबळे यांनी स्वागतही केले आहे. लेट पासिंग बाबत केंद्र सरकारने जुलमी कायदा राबविला आहे. दर दिवशी रिक्षा व इतर वाहनांना ५० रुपयांची दंडाची…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फ़त घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांतील १६ विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर मानांकन मिळविले असून ही बाब अभिमानास्पद आहे, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फ़त घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहिर झाला आहे. यामध्ये १३२ विद्यार्थी पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यापैकी १६ विद्यार्थी हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांतील आहेत. उर्दू शाळा आकुर्डी, उर्दू शाळा रुपीनगर, उर्दू शाळा थेरगाव, उर्दू शाळा खराळवाडी, उर्दू शाळा चिंचवड, उर्दू शाळा जाधववाडी, उर्दू शाळा लांडेवाडी, मुलांची शाळा मोशी, उर्दू…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक स्तरावर ॲनिमेशन, व्हीएफएक्स, मल्टीमीडिया या क्षेत्रात प्रचंड मोठ्या संधी आहेत. एनी फिल्म प्रा. लि. ने या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि एनी फिल्म प्रा. लि. यांच्यामधील सामंजस्य करारामुळे पीसीयुच्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांना ॲनिमेशन मधील उच्च दर्जेदार आधुनिक तंत्रज्ञान अभ्यासण्याची संधी मिळाली असून त्याचा फायदा घ्यावा, असे मत एनी फिल्म प्रा. लि. चे संचालक निखिल हल्ली यांनी व्यक्त केले. पीसीयू आणि एनी फिल्म प्रा. लि. यांच्या मध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी निखिल हल्ली बोलत होते. कार्यक्रमास उद्योजक तज्ज्ञ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरीमध्ये शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत २० जुलै रोजी ‘विजयी संकल्प मेळावा’ होणार आहे. त्यावेळी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याची माहिती शहरात पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली आहे. पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर या मेळाव्याकरिता जोरदार तयारी सुरू झाली आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे याठिकाणी पूर्णपणे बंदिस्त असा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील अजित पवारांची ताकद शरद पवार गट कमी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे माजी नगरसेवक यांच्यासह अजित पवारांच्या जवळचे स्थानिक नेते शरद पवार गटात येणार असल्याची माहिती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या कित्येक वर्षांपासून गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा मुद्दा चर्चिला जात होता परंतु आता येथील रहिवाशांसाठी एसआरए अंतर्गत प्रकल्प राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या ठिकाणी बांधकाम व्यवसायिकांकडून काही स्थानिक व्यक्ती व राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून रहिवाशांचे संमती पत्र भरून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याबाबत संबंधित बांधकाम व्यवसायिकांनी नागरिकांशी चर्चा केली नसल्याने किंवा त्यांना विश्वासात घेतले गेले नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संमती पत्र भरून घेत असताना पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी किती दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे ?, तोपर्यंत रहिवाशांचे पुनर्वसन कुठे होणार ?, तर मुळात हा प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या बिल्डरची नेमणूक केली आहे का…
पुणे ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीत रिपबल्किन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत, तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत किमान 10 ते 12 जागा आम्हाला मिळाव्यात, तसेच ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण न होता मराठ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा तसेच क्रिमिलेयरची मर्यादादेखील 8 लाखांवरुन 12 लाख रुपये करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. पुण्यात शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य संघटक परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, आयूब शेख,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- किवळे, रावेत येथे दररोज होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुकाई चौक ते विकासनगर येथील रस्ता रुंदीकरण करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, किवळे रावेत येथील वाहतूक कोंडी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुकाई चौक ते विकासनगर हा मार्ग एक महत्त्वाचा अडथळा बनला आहे. विशेषतः पीक अवर्समध्ये, यामुळे गैरसोय, विलंब आणि अपघातांचा धोका वाढतो. रस्त्याची सध्याची रुंदी वाहतुकीच्या वाढत्या प्रमाणात सामावून घेण्यासाठी अपुरी आहे, ज्यामुळे दीर्घकाळ ट्रॅफिक जाम आणि प्रवाशांमध्ये निराशा निर्माण होते. मुकाई चौक आणि विकासनगरच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही…
– संबंधित जागेमध्ये ‘स्पोर्ट्स स्कूल’ निर्मितीसाठी पाठपुरावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मौजे. चऱ्होली येथील आरक्षण क्रमांक २/९२ शाळेसाठी आरक्षीत असलेला भूखंडाचे खासगीकरण करण्याचा निर्णय अखेर महापालिका प्रशासनाने मागे घेतला. संबंधित जागा खासगी संस्थेला देण्याची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी या खासगीकरण प्रक्रियेला तीव्र विरोध केला होता. चऱ्होलीतील संबंधित शाळा आरक्षणावर खासगी संस्थेद्वारे शैक्षणिक इमारत उभारण्याबाबत महापलिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू होती. तसेच, निविदा प्रक्रियाही सुरू केली होती. यावर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच, मौजे चऱ्होली आरक्षण क्रमांक २/ ९२ मधील शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये प्रशासनाने क्रीडा शाळा (स्पोर्ट्स…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने सांगवीच्या विकासाचे शिल्पकार माजी महापौर स्व. अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांच्या १० व्या स्मृति दिनानिमित्त अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ०३ या वेळेत जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या आवारात आयोजित करण्यात आला आहे. दहावी- बारावी (पास-नापास), पदवी, आयटीआय, इंजिनिअरिंग धारक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/VL5K6ZEBCYrFiESQ8 या गुगल लिंक द्वारे नोंदणी किंवा 9075304042 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उद्योजक अजय शितोळे, अरविंद…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) सर्व प्रकारचे मूल्यांकन थांबविण्याची मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक संस्था कर (एलबीटी) १ऑगस्ट २०१५ मध्ये शासनाने रद्दकेला होता. त्यास जवळपास ९ वर्षे वजीएसटी लागू होऊन पण ८ वर्षे झाली असताना अजूनही वस्तू व सेवाकराच्या काळात अद्यापपर्यंतस्थानिक संस्था कराचे मूल्यांकनचालूच आहे. किंबहुना उद्योजकांना कोणतीही सूचना न देता अनेकठिकाणी उद्योगांची बँक खातीमहापालिकेतर्फे परस्पर गोठवली जात आहेत. महाराष्ट्र शासनाने १७ जून२०१५ ला स्थानिक संस्था कराचीअभय योजना जाहीर केली होती. अभय योजनेंतर्गत निर्धारणा ३१ऑगस्ट…
