- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पीसीसीओई येथे केविस्टा टेक्नॉलॉजी हॅकेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कॅव्हिस्टा टेक्नॉलॉजीज हॅकेथॉन स्पर्धेमधून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला चालना मिळते. तसेच एखादी समस्या सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करून त्यावर निश्चित पर्याय शोधण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आजच्या तरुण अभियंत्यांमधील संशोधक व चिकित्सक वृत्ती पाहता ते तंत्रज्ञानाद्वारे जागतिक पातळीवर भारताचे नाव पुढे नेतील असे प्रतिपादन कॅव्हिस्टा टेक्नॉलॉजीजचे महाव्यवस्थापक भास्कर रेड्डी यांनी केले. कॅव्हिस्टा टेक्नॉलॉजीज आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) येथे कॅव्हिस्टा टेक्नॉलॉजीज हॅकेथॉन या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रेड्डी बोलत होते. यावेळी पीसीईटी प्लेसमेंट…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सुसंवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचा मूलमंत्र आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार डॉ. संजय उपाध्ये यांनी काशीधाम मंगल कार्यालय, चिंचवडगाव येथे (रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी) व्यक्त केले. गांधी पेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न!’ या मासिक प्रवचनमालिकेतील अमृतमहोत्सवी ७५ वे प्रवचनपुष्प गुंफताना ‘विचार करूनच बोला!’ या विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांनी निरूपण केले. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक राहुल कलाटे, शेखर चिंचवडे, नगरसेविका मनीषा चिंचवडे आणि गांधी पेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तर विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सभागृहात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत असून महापालिकेतील पाच विषय समित्यांच्या सभापतीपदासाठीची निवडणूक येत्या २ मार्च रोजी पार पडणार आहे. सभापतीपदासाठी इच्छुकांना आज (२५ फेब्रुवारी) दुपारी ३ ते ५ या वेळेत उमेदवारी अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. अर्ज दाखल होताच कोणत्या समितीवर कोणाची वर्णी लागणार याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अलीकडेच झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा–कला–साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समितीच्या सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. स्थायी समितीत १६ सदस्य असून उर्वरित पाच विषय समित्यांमध्ये प्रत्येकी नऊ सदस्य आहेत. या समित्यांमध्ये सत्ताधारी…
आमदार जगताप यांच्या विधानसभेतील तारांकित प्रश्नानंतर धक्कादायक माहिती उघड २०२५ मध्ये २३९ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त; ५ वर्षांत १८ हजार आरोपी गजाआड मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूवर कडक कायदेशीर बंदी असतानाही छुप्या मार्गाने विक्री आणि उत्पादन जोरात सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नामुळे समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत पोलीस प्रशासनाने १३ हजार ७८३ गुन्हे दाखल करत तब्बल १८ हजार ५०१ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. एकट्या २०२५ या वर्षात तब्बल २३९ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आमदार जगताप यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे नाशिक, ठाणे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपच्या गुंडांकडून पुण्यातील काँग्रेसभवन तसेच जनप्रबोधक नेते, कार्यकर्त्यांवर द्वेष भावनेतून होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पिंपरी चौकात आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे प्रांतातध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत सपकाळ यांना विरोध करण्यासाठी पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन वर हल्ला केला दगडफेक केली आणि काल भाजपच्या विरोधात सातत्याने आणि सत्याने बाजू मांडणारे हनुमंत पवार यांच्यावर भाजपच्या गुंडांकडून हल्ला करण्यात आला या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आज भीमसृष्टी स्मारका समोर पिंपरी चौक येथे काँग्रेस पक्ष आणि शहरातील विविध पुरोगामी संघटनांनी संयुक्तरित्या भाजप विरोधी निषेध आंदोलन केले. याप्रसंगी भाजप विरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या, हातामध्ये विविध आशयाचे मथळे…
महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार उद्घाटन, २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान नागरिकांना खरेदीसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने महिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘पवनाथडी’ जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या जत्रेचे उद्घाटन २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर आयोजित या उपक्रमात नागरिकांना खरेदीसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार आहे. महिला बचत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सध्या कोणत्याही पदासाठी भरती प्रक्रिया सुरू नसल्याची स्पष्ट माहिती प्रशासन विभागाने दिली आहे. अलीकडे समाजमाध्यमांवर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचे भासवणारी खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. तसेच महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे, उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध केली जात आहे. परंतु महानगरपालिकेकडून भरती प्रक्रियेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत आदेश अथवा सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तथापि, बनावट जाहिराती व संदेशांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी प्रशासन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीच्या वतीने ( 2024 -2025 ) मध्ये केलेल्या पाहणीत महाराष्ट्र राज्यातील 429 अ प्लस + श्रेणी प्राप्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाना निवडण्यात आले आहे . कनिष्ठ महाविद्यालयाच्या यादीत पिंपरी चिंचवड शहरातील एकूण कनिष्ठ महाविद्यालयापैकी चिंचवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजची एकमेव पहिले स्वयंअर्थसय्यीत असलेल्या या कनिष्ठ महाविद्यालयाला राज्यस्तरीय ( शाळा गुणवत्ता व मूल्यांकन व आश्वासक आराखडा ) मूल्यांकन प्रक्रियेत अ प्लस + श्रेणी प्राप्त झाली आहे . महाराष्ट्र राज्यात तब्बल 1 लाख 2 हजार 675 शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे अतिशय काटेकोरपणे मूल्यमापन करण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) आयोजित संगणक अभियांत्रिकी विभागाच्या रोबोहॉक क्लबच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सव स्पर्धा “रोबोराष्ट्र २०२६” चे आयोजन करण्यात आले होते. मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाचे सहाय्यक उपाध्यक्ष सुनील मेहता यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि शाळांमधून १२० पेक्षा अधिक संघ आणि ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वरिष्ठ श्रेणी, कनिष्ठ श्रेणी, रेस्क्यूलिंपिक्स ३.० आणि चक्रव्यूह या चार विभागांमध्ये तांत्रिक स्पर्धा घेण्यात आल्या. चारही विभागातील प्रथम तीन विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते एकूण १,९०,००० रुपयाची पारितोषिके आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘भगवद्गीता हा केवळ एक ग्रंथ नसून तो मानवी जीवन जगण्याचा मार्गदर्शक पथ आहे!’ असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्ते शंकर गायकर यांनी महासाधू मोरया गोसावी क्रीडासंकुल, चिंचवडगाव येथे (रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी) व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल – पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आयोजित हिंदू स्वाभिमान मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून शंकर गायकर बोलत होते. यावेळी इस्कॅान मंदिर, रावेतचे प्रमुख गोपती दास, विश्व हिंदू परिषद प्रांतमंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, नितीन वाटकर, प्रांत उपाध्यक्षा माधवी सौंशी, परेश पटेल यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच समाजातील विविध…
