Author: maharashtrabreakingnews.com

“पीसीयू – सीएक्सओ २०२६ परिषदे”चे यशस्वी आयोजन पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आपल्या करिअरमधील आणि विकासातील ब्लाइंड स्पॉट ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सतत अपस्किलिंग आणि रीस्किलिंग याची गरज आहे. एआयचा वापर करून आपण त्यावर निश्चित मात करू शकतो असे प्रतिपादन सीआयआय कंपनीचे सीएसआर आणि विशेष प्रकल्प प्रमुख सुवोदीप मुखर्जी यांनी केले.   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन (ट्रिपल आय) सेल च्या वतीने पहिल्या “पीसीयू – सीएक्सओ २०२६ परिषद” चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन सुवोदीप मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे,…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला स्वयं आणि बाह्य मूल्यांकन मध्ये “स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ऍक्रेडिटेशन फ्रेमवर्क” (एसक्यूएएएफ) यात सहाव्या क्रमांकासह ‘अ +’ श्रेणी मिळाली आहे.      या सर्वेक्षणात १०,७१२ शाळांचे बाह्य मूल्यांकन करण्यात आले. एस. बी. पाटील पब्लिक स्कूलची राज्य शाळा मानक स्व-मूल्यांकनात निवड करण्यात आली.    प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली शालेय गुणवत्ता, शिस्त आणि नूतन शिक्षणपद्धती, शालेय उपक्रम तसेच शाळाबाह्य उपक्रम राबविण्यात येतात.    महाराष्ट्रातील ही…

Read More

सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचा-यांची जबाबदारीने काम करण्याची पध्दत,सेवाभाव व आठवणी कायम स्मरणात राहतील – उपमहापौर शर्मिला बाबर शहर अभियंता मकरंद निकम अनेक वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त….सेवा शिल्लक असताना त्यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती… अधिकारी आणि कर्मचारी कालपर्यंत कार्यरत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे कामकाज करून सेवानिवृत्त होणारे महापालिकेतील सहकारी अधिकारी,कर्मचारी हे त्यांची जबाबदारीने कामकाज करण्याची पध्दत,सेवाभाव आणि त्यांच्या आठवणींमुळे कायम स्मरणात राहतील असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले आणि सेवानिवृत्तांना आरोग्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात माहे फेब्रुवारी २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १८ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ८…

Read More

सरकारच्या चुकीच्या धोरणाने कामगारांचा घात पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव जवळील ‘एवनीरा’ परिसरातल्या एस.बी.एल. एनर्जी लिमिटेड या दारुगोळा बनवणाऱ्या डिटोनेटर कंपनीत आज सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे भीषण साखळी स्फोटात १४ महिलांसह ३ पुरुष असे १७ कामगारांचा मृत्यू झाला यात आणखी १८ कामगार भीषण गंभीर जखमी झाले. सरकारच्या उद्योगस्नेही धोरणाचा हा परिणाम असून कामगार कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचा परिणाम आहे; मृतांच्या वारसांना २० लाख रुपये देण्यात यावे. व त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी, तसेच अशा घटना रोखण्यासाठी सरकारी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली. कष्टकरी…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक गरजांनुसार पिंपरी-चिंचवड शहराच्या वीज यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकारकडून पुनर्गठित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) अंतर्गत ११०० कोटी रुपयांच्या आराखड्याला गती देण्यात येणार आहे. दरम्यान, दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ताथवडे उपकेंद्राच्या प्रस्तावावरून आमदार शंकर जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेतला असता, विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहे. आमदार शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे पिंपरी-चिंचवड आणि भोसरी परिसरातील वीज समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. यावेळी आमदार जगताप म्हणाले, पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून २०५१ पर्यंत ती ९३ लाखांच्या घरात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी–चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक २८, पिंपळे सौदागर येथे सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या कामातून ओळख निर्माण केलेले ॲड. दिपक नागरगोजे हे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रबळ दावेदार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे व स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १६ वर्षांपासून पक्ष सत्तेत नसतानाही त्यांनी सातत्याने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम केले आहे. बूथ पातळीपासून ते प्रभाग स्तरापर्यंत कार्यकर्त्यांना जोडून ठेवणे, पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवणे आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असतात. कोरोना महामारीच्या कठीण काळात ॲड. नागरगोजे यांनी कोणताही राजकीय गाजावाजा न करता गरजू…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवडसह भोसरी विधानसभा मतदारसंघातीलवाढत्या औद्योगिक व निवासी वीज समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक आहे. नवीन प्रस्तावित विकासकामे आणि पायाभूत प्रकल्पांसाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्यात येईल. तसेच, वीज पुरवठा सक्षम करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी दिले. महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने नियम १०५ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील वीज पुरवठा सक्षमीकरणाच्या अनुशंगाने विविध मागण्याची लक्षवेधी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात मांडली. त्याला मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांनी लेखी उत्तर दिले आणि वीज यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्याचे संकेत दिले. गणेशखिंड शहर मंडळांतर्गत…

Read More

‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘धर्मरक्षणाबाबत सामान्य हिंदू बेसावध असूनहिंदूंच्या अज्ञानातून आणि बेसावधपणातून होणारे मतांतर हे राष्ट्रांतर असते!’ असे ठाम प्रतिपादन डॉ. गौतम खट्टर यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार २०२६’ सोहळा ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे गुरुवारी (दि. २६) उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. खट्टर यांनी राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचा समन्वय साधणारे राष्ट्र हीच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची संकल्पना असल्याचे सांगितले. तसेच धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या परखड विचारांचीही त्यांनी आठवण करून दिली. मंडळाच्या वतीने गेल्या सतरा वर्षांपासून राष्ट्रनिष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती व…

Read More

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘सेमिकंडक्टर तंत्रज्ञानावर’ राष्ट्रीय परिसंवाद पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सध्या भारत ९४ टक्के सेमिकंडक्टर चिप्स इतर देशांतून आयात करतो. त्यामुळे आपला देश अद्यापही सेमिकंडक्टर तंत्रज्ञानासाठी परावलंबी आहे. सेमिकंडक्टरमध्ये मक्तेदारी असलेल्या देशांनी आपल्याला सेमिकंडक्टर चिप्सचा पुरवठा बंद केल्यास भविष्यात भारताची मोठी कोंडी होऊ शकते. त्याचमुळे भारत सरकारने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सेमिकंडक्टर मिशनची घोषणा केली आहे. त्याद्वारे भारतात सेमिकंडक्टर कंपन्या स्थापन करण्यासाठी तब्बल ७६,००० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सेमिकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूक भविष्यात १,६०,००० कोटींपर्यंत वाढणार असून विद्यार्थ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड…

Read More

परिसरात विषारी धुराचे मोठे लोट; श्वसनाचा त्रास झाल्याने विद्यार्थी रुग्णालयात; परिसरात भीतीचे वातावरण लोणी काळभोर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  परिसरातील मुळा-मुठा नदीच्या पात्रात अवैधरित्या टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या आगीमुळे परिसरात प्रचंड विषारी धुराचे लोट पसरले असून श्वास घेण्यास त्रास झाल्याने एमआयटी शिक्षण संकुलातील काही विद्यार्थ्यांना शुक्रवारी मध्यरात्री जवळच्या रुग्णालयात भरती करावे लागले. एमआयटी शिक्षण संकुलातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न शनिवारीदेखील सुरू होते. एमआयटी शैक्षणिक संकुलात सध्या राज्यासह देश-विदेशातून आलेले जवळपास २०,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी जवळपास ५,००० विद्यार्थी व १,००० कर्मचारी शैक्षणिक संकुलाच्या परिसरात वास्तव्यास आहेत.…

Read More