Author: maharashtrabreakingnews.com

– आंद्रा भामा आसखेडचा दुसरा टप्पा जून-२०२५ पर्यंत पूर्ण होणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भविष्यातील २०४१ मधील संभाव्य लोकसंख्या गृहित धरुन शहराला पाणी पुरवठ्याचे स्त्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करीत आहोत. आंद्रा भामा आसखेड प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात १०० एमएलडी पाणी शहरात दाखल झाले. आता दुसऱ्या टप्प्याचे काम जून- २०२५ पर्यंत पूर्ण होईल. त्याद्वारे १६८ एमएलडी पाणी मिळणार आहे.  पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील ‘जैसे थे’ आदेश रद्द केला आहे. निगडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवली आहे. समाविष्ट गावांतील विविध ठिकाणी जलकुंभ आणि नवीन जलवाहिनीचे काम सातत्त्याने सुरू आहे. विशेष म्हणजे, आगामी काळात मुळशी धरणातून ७६० एमएलडी पाणी आरक्षीत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – समाजात घडणाऱ्या घटनांचा विचार करता मुलींनी आपल्या आरोग्याबरोबर सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. समाजात वावरताना न घाबरता येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना हिंमतीने केला पाहिजे. तसेच ‘गुड टच’ आणि ‘बॅड टंच’ कसे ओळखावे याविषयी मार्गदर्शन राहुल भातुकले यांनी विद्यार्थ्यांना केले. शाळांमध्ये भविष्यातील सुजन नागरिक घडत असतात विद्यार्थ्यांची सुरक्षा हा विषय खूप सवेदनशील असून त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे याबाबत शाळेतील शिक्षकांनी सजग राहून विद्यार्थ्यांच्या सुरक्षा बाबत आवश्यक उपायोजना करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थी सुरक्षा संवाद करणे आवश्यक आहे असे मत संस्थेचे संस्थापक  अरुण चाबुकस्वार यांनी व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात…

Read More

-भोसरी विधानसभेतील भ्रष्टाचाराचा आणखी एक नमुना – नव्या सिंथेटिक ‘ट्रॅक’ची वर्षभरापासून दुर्दशा -प्रशिक्षक, खेळाडूंचा संताप; आंदोलनाचा इशारा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील भ्रष्टाचारी कारभाराची अनेक उत्तम उदाहरणे समोर येत आहेत. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या उभारणीपूर्वीच मूर्तीच्या ‘मोजडी’ला तडे गेल्याचे नुकतेच महाविकास आघाडीने उघडकीस आणल्यानंतर, आता  इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील वर्षभरापूर्वी बसविलेला ‘सिंथेटिक ट्रॅक’ (इपीडीएम पियूस्प्रे ट्रॅक) उखडून त्याची पूर्णतः दुर्दशा झाली असल्याचे समोर आले आहे. या नवीन ट्रॅकसाठी वर्षभरापूर्वी चार कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. मात्र हा संपूर्ण खर्च पाण्यात गेले असल्याचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील…

Read More

भाजपा चिंचवड विधानसभा अधिवेशन; लाडकी बहिण योजनेला प्रोत्साहित होवून 120 महिलांचा भाजपमध्ये प्रवेश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – केंद्र व राज्य शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, युवकांसाठी युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून लाभ देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम महायुतीचे सरकार करीत आहे, जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बुथ स्तरावर जाऊन शासनाच्या योजनांची माहिती पोचवण्याचे काम अधिक प्रभावीपणे करावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. चिंचवड विधानसभा विस्तारित कार्यकारिणी अधिवेशन आज वाकड येथे पार पडले. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख यांना मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष शंकर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात ६ लाख ४३ हजार ७६९ मतदार असलेली अंतिम मतदार यादी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या हस्ते नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार संघात वाढलेला मतदार दुबार, बोगस, मयत अशाप्रकारचा आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेचे फेर सर्वेक्षण करून नव्याने मतदार डाटा तयार करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक ॲड. संदीप चिंचवडे यांनी  निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक विभागाला  केली आहे. ॲड. संदीप चिंचवडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्याची अंतिम मतदार यादी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली. या…

Read More

प्रसिद्ध गायक अवधुत गुप्तेंच्या हस्ते आज होणार पिंपरी चिंचवड आयडॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड आयडॉल २०२४ मोरया करंडक या स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार (दि. १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती हर्षवर्धन भोईर यांनी दिली. पिंपरी चिंचवड आयडॉलचे हे ९ वे पर्व आहे. आकुर्डीतील ग. दी. माडगुळकर नाट्यगृहात ही महाअंतिम फेरी संपन्न होणार आहे. या महाअंतिम फेरीनंतर सायंकाळी साडेपाच वाजता या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या हस्ते पार पडणार आहे. या स्पर्धेत ९ ते १५ आणि १६ ते ३५ या दोन वयोगटात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – एकच कलाकार एकच नाटक सलगपणे २२ वर्षे करतो आहे आणि या संपूर्ण कालावधीत या नाटकाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते आहे, हे भाग्य मला मिळाले आहे, अशी भावना प्रसिध्द अभिनेते भरत जाधव यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केली. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच पाच हजार प्रयोगसंख्येच्या दिशेने पुन्हा सही रे सही या नाटकाची विक्रमी घौडदौड सुरू आहे, असेही ते म्हणाले.      दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने पुन्हा सही रे सही या नाटकाला २२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नाटकातील प्रमुख कलावंत भरत जाधव व इतर कलाकारांचा चिंचवड नाट्यगृहात सत्कार करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब…

Read More

आझाद मैदानावरील धरणे आंदोलनात पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचा सहभाग पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेच्या कायम व कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात दिले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांनी दिली.      महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (२८ ऑगस्ट) मुंबई आझाद…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने मोशी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यापूर्वीच साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुतळा उभारण्यापूर्वी सल्लागार नेमण्यात येऊन त्यावरही कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. बोऱ्हाडेवाडी विनायकनगर  येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर सदर निवडलेली जागा चुकीची आहे. सदर जागेवर जाण्याकरता रस्ता अरुंद आहे. पार्किंगची सुविधा पुरेशी उपलब्ध होऊ शकत नाही. पुतळ्याशेजारी  टोलेजंग इमारती आहेत. त्यामुळे पुतळ्याच्या सौंदर्याला बाधा पोचू शकते तसेच पुतळ्याला यामुळे अडसर निर्माण होईल. त्याचप्रमाणे सदर निवडलेली जागा मुख्य रस्त्यापासून आत आहे. अशा मुख्य बाबी सामाजिक संघटना, नागरिक, इतिहास प्रेमी तसेच राजकीय…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  अल्पवयीन मुली, मुले, युवती, महिलांवर बलात्कार, सामूहिक बलात्कार आणि हत्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवेस वाढत होत आहे. अशा घटनांना पायबंद बसावा आणि यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील महिला व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना, मंडळ, ट्रस्ट आदींच्या प्रतिनिधींचा भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मोर्चाचे समन्वयक मानव कांबळे यांनी दिली. शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला प्रतिनिधींसह माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत धर, प्रियांका बारसे तसेच डॉ. मनीषा गरुड, सायली नढे, अनिता तुतारे, सविता इंगळे, अपर्णा…

Read More