- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात पिंपरीत भाजपचे काळ्या फिती बांधून आंदोलन अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांचे देशातील आरक्षण संपविण्याचे वक्तव्य पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अमेरिकेच्या चालू दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीवर टीका करून देशातील सामाजिक आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत वक्तव्य केले. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भागात पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपा पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात काळया फिती बांधून आंदोलन केले. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार अमर साबळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, आमदार अमित…
संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सुवर्ण महोत्सवी वर्ष आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचे रचीयाता आहेत. सन २०२४ – २५ हे माऊलींचे ७५० वे वर्ष असून आळंदी देवस्थाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवाचे सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (७५०) २०२४-२५ साजरे करणार आहे. या निमित्त सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (७५०) २०२४ – २५ बोधचिन्ह तयार केले असून या बोधचिन्हाचे अनावरण राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन् यांचे हस्ते राजभवन, मुंबई येथे झाले. यावेळी प्रधान सचिव प्रवीण दराडे यांचे आळंदी देवस्थानचे वतीने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड राजेंद्र…
आयआयएमएस मध्ये भारतीय ज्ञान परंपरा विषयावरील व्याख्यान संपन्न यशस्वी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञान तंत्रज्ञान शिकतानाच भारतीय ज्ञान परंपरेची प्रासंगिकता आणि त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे असे आवाहन भारतीय ज्ञान परंपरा आणि भगवद्गीतेच्या अभ्यासक रोमा अभ्यंकर यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) मध्ये भारतीय ज्ञान परंपरा या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेतील ग्रंथामध्ये सांगितलेले तत्वज्ञान हे आजही कशाप्रकारे सुसंसगत ठरत आहे, आणि त्याचा यथायोग्य वापर केल्यास आपली सध्याची कार्यसंस्कृती आणि नैतिकता अधिक सक्षम होऊ शकते असा विश्वास रोमा अभ्यंकर यांनी वक्त केला. शिक्षण, प्रशासन, विज्ञान आणि व्यवस्थापन या सारख्या आधुनिक क्षेत्राला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- कोविड योद्धा महिला बचत गटाने घरगुती गणेशोत्सवात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींचा आकर्षक देखावा साकारला असून हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे ज्या महिलांच्या पतींचे निधन झाले अशा महिलांना एकत्र करून महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत उमेद जागर उपक्रमाअंतर्गत कोविड योद्धा महिला बचत गटाची निर्मिती करण्यात आली आहे. थेरगाव येथील या कोविड योद्धा महिला बचत गटातील महिलांनी गणेशोत्सवातील बहिण भावाचा महत्वपूर्ण सोहळा असलेल्या गौरी – गणपती सजावट पूजनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या राज्यशासनाच्या महत्वकांक्षी योजनेचा आकर्षक देखावा साकारला आहे. या देखाव्यात गौरी अर्थात…
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेचे साहित्य पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने विद्यार्थ्यांना शालेय साहित्यवाटपासाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) उपक्रम सुरू केला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा थेट लाभ मिळावा हा उद्देश असलेल्या उपक्रमातून आत्तापर्यंत शाळेमध्ये उपस्थित असणाऱ्या तब्बल ४९,००० विद्यार्थ्यांना रेनकोट, शूज, शालेय साहित्याच्या किटचे यशस्वीपणे वितरण करून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने बॅंक ऑफ बडोदाच्या सहकार्याने, डिजिटल ई-रूपी पेमेंट प्रक्रिया राबविल्यामुळे साहित्य वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहून उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे. चौकट – साहित्याचे टप्प्याटप्प्याने यशस्वी वितरण ‘डीबीटी’च्या पहिल्या टप्प्यामध्ये अंदाजे ३९,००० उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना साहित्याच्या किटचे वाटप करण्यात…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे मुख्य अभियंता -१ या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे हे ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असल्याने रिक्त मुख्य अभियंता -१ हे पद रिक्त झाले होते. या पदाचा अतिरक्त पदभार सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे यापूर्वी असलेल्या स्थापत्य विभागाचे कामकाज कायम राहणार असून आता पाणीपुरवठा विभागाचे कामकाज देखील असणार आहे. यासाठी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश निर्गमित केला आहे.
– फेरीवाला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आळंदी नगरपालिका विक्रेता फेरीवाला समिती सदस्यांची बहुमताने निवड झाली. नियुक्त झालेल्या नवीन सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन्मान केला. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आळंदी येथे हा कार्यक्रम पार पडला. भगवान वैराट आणि बाबा कांबळे यांच्या दोन्ही संघटना एकत्र आल्यामुळे पाच जागेवर बिनविरोध निवड करण्यात आली. तर संतोष सोनवणे बहुमताने विजयी झाले. आळंदी नगर परिषदेमध्ये फेरीवाल्यांची निवडणूक झाली यामध्ये टपरी पथारी हातगाडी पंचायत संघटनेचे सदस्य बिनविरोध निवडून आले. 11 सप्टेंबर 2024, रोजी ही निवडणूक पार पडली. निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशीच अजित पवार यांचा नियोजित कार्यक्रम…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहराचे तहान भागवणारे पवना धरण 100 टक्के भरल्यानंतर प्रतिवर्षी सत्ताधारी व प्रशासकीय अधिकारी पवना माईचे पूजन करण्यासाठी येत असतात परंतु यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना देखील निवडणूक तोंडावर असल्याने सत्ताधाऱ्यांना व प्रशासनाला पवना माईचा विसर पडल्याचे जाणवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पवनामाईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते पवनामाईंचे पूजन करण्यासाठी पवना धरण येथे उपस्थित होते. उपस्थितांमध्ये माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत धर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे,श्रीमंत जगताप,दिलीप पानसरे,राजेंद्र कदम,एकलास सय्यद,हनुमंत वाबळे,नागेश सदावर्ते,गणेश काळे,सागर लष्करे,पप्पूलाल विश्वकर्मा,जिब्राईल शेख,हेमंत बलकवडे, श्रीकांत पवार,राजकुमार माने,प्रिया कांबळे, वंदना आराख,लक्ष्मीकांत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी येथे 02/09/2024 ते 04/09/2024 या कालावधीत पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते श्री. गोपाल देवांग यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी श्रीमती अनिता केदारी, बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश काकडे, अध्यक्ष श्री रघुनाथ खेडेकर, सदस्य रमेश शेट्टी व मनोज यादव स्पर्धा प्रमुख क्रीडा पर्यवेक्षक श्री दीपक कन्हेरे उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन श्रीमती. सुनीता पालवे यांनी केले. खेळाडूंची शपथ वाल्मीक पवार यांनी घेतली. ऋषिकेश वचकल श्रीमती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जगताप डेअरी येथील दिघे कुटुंबाने अमरनाथ यात्रा मार्ग हा देखावा केला असून भाविक हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहे. सुनीता परशुराम दिघे, राहणार क्षितिज कॉलनी, जगताप डेअरी यांनी यावर्षी आपल्या घरी अमरनाथ यात्रा मार्ग हा अतिशय वास्तव देखावा साकारला आहे. याच्यामध्ये अमरनाथ यात्रा मार्गाचा नकाशा दाखवून त्याप्रमाणे हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. श्रीनगर एअरपोर्ट दाखवून नंतर बसमार्गे पहलगाम व नंतर चंदनवाडी येथील बेस कॅम्प दर्शवला आहे. इथून पुढची सर्व यात्रा पायी करताना पिस्सु घाटी हा अतिशय चढणीचा मार्ग पार करून शेषनाग येथील हिमाच्छादित पर्वतरांगांचे मनोरम दर्शन घडते. वाटेत खळाळणारे जलप्रवाह, अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि…
