Author: maharashtrabreakingnews.com

– बोराटे म्हणाले गव्हाणे यांच्या पुढाकारातून प्रश्न मार्गी – स्वराज्य सोसायटीतील गणेश मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन   भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मोशी, बोराटेवस्ती येथील स्वराज्य हाऊसिंग सोसायटीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. तब्बल 605 सदनिकाधारक या पाणीटंचाईने वैतागले होते. या प्रश्नाला मार्गी लावण्याचा ”विडा” माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी उचलला. प्रशासकीय संघर्ष पार पाडत अखेर स्वराज्य सोसायटीमध्ये नागरिकांच्या हक्काचे पाणी अक्षरशः खेचून आणले. त्यांच्या या प्रयत्नांचे तोंड भरून कौतुक माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले. तर अजित गव्हाणे यांच्या पुढाकारातून प्रश्न मार्गी लागल्याची भावना बोराटे यांनी व्यक्त केली.  मोशी, बोराटेवस्ती येथील स्वराज्य हाऊसिंग सोसायटीतील…

Read More

पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपीएमएल) खरेदी करण्यात येणाऱ्या ४० सीएनजी बसेससाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अदा करावयाच्या रक्कम तसेच अनौपचारिक पर्यावरण शिक्षण प्रकल्पातून पर्यावरणीय बुद्ध्यांक विकसित करणे या विषयासह विविध  विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये  महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक  सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील हवा शुद्ध करण्याच्या दृष्टीने…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर व सॉफ्टवेअर गटाच्या अंतिम फेरीनंतर स्कुल ऑफ कंम्पुटींगच्या सायबर नाॅट्स व साईनसेन्स या संघांनी नाविन्यपूर्ण कल्पनांसह आपापल्या गटातील विजेतेपदाला गवसणी घातली. सायबर नाॅट्स संघात आदिल देवकर, झोया पठाण, प्रणव बुलबुले, मोहित पोकळे, सोहम बागुल, अमन खान या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ज्यांना प्रा. प्रणव चिप्पलकट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. तर साॅफ्टवेअर गटातील विजेत्या साईनसेन्स संघात चैतन्य पगारे, अनिंदिता संझगिरी, आयुषमान मिश्रा, ओम बनकर, पारस साळुंखे, स्पर्श महाजन इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यांना प्रा.दिशा गभाने यांचे मार्गदर्शन लाभले. दोन दिवस चाललेल्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘’स्वच्छता ही सेवा पंधरवडा’’ निमित्त आयोजित स्वच्छ सांस्कृतिक उत्सवात मराठी सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी दिली आहे. २ ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ हे अभियान राबविण्यात येत आहे. ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ अंतर्गत शुक्रवार २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत सी सर्कल, स्पाईन रोड, भोसरी येथे ‘स्वच्छ सांस्कृतिक उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या उत्सावाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पवना नदी प्रदूषण टाळण्यासाठी  नाना काटे सोशल फाउंडेशनच्या या वर्षीही पुढाकार घेण्यात आला. या मध्ये परिसरातील नागरिकांना मूर्ती व निर्माल्य विसर्जित न करता सर्व गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले मागील ८  वर्षापासून हा उपक्रम पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबविण्यात येत आहे, यात परिसरातील घरगुती व गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन  नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते या उपक्रमाला गणेशभक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यात रहाटणी,पिंपळे सौदागर व पिंपरी येथील घरगुती व सार्वजनिक असे एकूण १२…

Read More

– जिल्हा नियोजन समितीकडून ३ कोटी २२ लाखांच्या कामांना मंजुरी – भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदार संघातील वीज विषयक विविध कामांसाठी पुणे जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे ३ कोटी २२ लाख रुपयांच्या विविध कामांना व उपकरणे खरेदीला मंजुरी मिळाली आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. भोसरीसह समाविष्ट गावांमध्ये वीज पुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी आमदार लांडगे यांनी सातत्त्याने पाठपुरावा केला आहे. भोसरी शाखेचे विभाजन, नवीन उच्चदाब केंद्र, नवीन रोहित्र उभारणी अशा कामांना यापूर्वीच राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्यादृष्टीने मनुष्यबळ निर्मितीही करण्यात येत आहे.…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर गोवंश संवर्धन, गोशाळा अनुदान, गायरान जमिनी गोचारा आणि गोशाळा यांना वापरास देण्यासह प्रति गायींना प्रतिदिन शंभर रुपये अनुदान, इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचे मागणीसाठी पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक व गोभक्त मिलिंद एकबोटे यांचे हरिनाम गजरात बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. यावेळी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, गोभक्त गणेश हुलावळे, नवनाथ शिंदे, भगवान कोकरे, संजय घुंडरे, आत्माराम महाराज शास्त्री अर्जुन मेदनकर यांचेसह राज्यातील गोशाळा चालक, गोभक्त, भाविक नागरिक उपस्थित होते. राज्य शासनाने लाडकी बहिण अनुदान योजना सुरु करून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच धर्तीवर गोवंश…

Read More

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल वाकडकर यांनी केलेल्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाच्या आवाहनाला गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला असून. त्यांनी उभारलेल्या पर्यावरण पूरक विसर्जन घाटातून जवळपास ३२०० मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन व्हावे, जल प्रदूषण रोखले जावे आणि गणेश मूर्तीची विटंबना रोखली जावी या मुख्य उद्देशाने श्री विशाल वाकडकर यांनी वाकड येथील द्रौपदा मंगल कार्यालयाजवळ पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जन घाटाची निर्मिती केली होती. मागील सहा वर्षांपासून ते सातत्याने हा उपक्रम राबवत आहेत. या वर्षी गणेशोत्सवात दहा दिवसांत जवळपास तीन हजार दोनशे मूर्तींचे विसर्जन…

Read More

(काँग्रेस पदाधिकारी शिष्टमंडळाची अतिरिक्त पोलीस आयुक्त कडे मागणी) पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –   काँग्रेस नेते आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या जीविताला धोका निर्माण करणारे वक्तव्य भाजप नेत्यांकडून सातत्याने केली जात आहेत. भाजप नेते तरविंदर सिंग मारवा, शिंदे सेनेचा आमदार संजय गायकवाड, भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे, रेल्वे राज्यमंत्री रोहित सिंग बिट्टू आणि यूपी सरकारचे मंत्री रघुराज सिंग यांच्या नुकत्याच झालेल्या पाच वक्तव्यांचा दाखला देत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने आज अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. वसंत परदेशी यांची भेट घेत संबंधित गुन्हेगार भाजप नेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करत गुन्हे दाखल न झाल्यास शहरभर सातत्याची विविध आंदोलने करणार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी चिंचवड शहरातील आद्य पत्रकार कै.भा.वी.कांबळे यांची 86 वी जयंती पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांच्या वतीने एकत्रितपणाने महानगरपालिका भा.वी.कांबळे पत्रकार कक्षात साजरी करण्यात आली. यावेळी अति.आयुक्त प्रदिप जांभळे पाटील म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारीता जागृत व निर्भिड आहे. मी महाराष्ट्र राज्यात अनेक भागात फिरलो तेथील पत्रकारीता आणि येथील पत्रकारीतेत फरक आहे. येथील पत्रकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यावेळी महापालिका उप आयुक्त आण्णा बोदडे, यशवंत भोसले, प्रतापराव गुरव, देवेंद्र तायडे, राजन वडके, विवेक इनामदार, गोविंद देशपांडे, दादा आढाव, संतलाल यादव, अर्चना मेंगडे, भाई विशाल जाधव आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब ढसाळ म्हणाले, पत्रकारीता…

Read More