- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळातर्फे प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जल्लोष 2024 युवक महोत्सव’ विभागीय अंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे उद्घाटन सकाळच्या सत्रात कमला एज्युकेशन सोसायटीच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा तर; संध्याकाळच्या सत्रात पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी व्यासपीठावरती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक सदानंद भोसले, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे, संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुणकुमार वाळुंज, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या वतीने दोन दिवसीय 39 वे. वार्षिक अधिवेशन २०२४ भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे संपन्न झाले. त्यात एकूण 489 नामांकने 94 संस्थांकडून प्राप्त झाली होती आणि 1682 जणांनी या अधिवेशनात सहभाग घेतला होता. दोन दिवसीय 39 वे वार्षिक अधिवेशनात 360 केस स्टडीज, 62 घोषणा आणि 62 पोस्टर्स स्पर्धकानीं सादर केले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, सुवर्ण, रजत, कास्य पदके प्रदान करण्यात आले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी स्पर्धेचे उद्घाटन लुमॅक्स इंडस्ट्रीज लि. चे व्हाईस प्रेसिडेंट (ऑपरेशन) राजेश डुब्बेवार यांनी केले व स्पर्धकांना मार्गदर्शन केले. तर; समारोप प्रसंगी विजेत्यांना पुरस्कार हेड…
ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती दिनी ज्ञानोत्सव साजरा आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील मेदनकरवाडी ( ता. खेड ) पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ओळख श्री ज्ञानेश्र्वरीची या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती दिनी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षातील ज्ञानोत्सव उपक्रमात हरिनाम गजरासह जय हरी माऊली नामजयघोषात सरपंच अमोल साळवे यांचे हस्ते करण्यात आली. ओळख श्री ज्ञानेश्वरी ची सांस्कृतिक, अध्यात्मिक कार्यक्रमात मेदनकरवाडी येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री ज्ञानेश्वरी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. प्रशालेत श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सन २०२४ – २०२५ या वर्षभरातील उपक्रमात उत्साही…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षातील ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती दिनानिमित्त आळंदीत विविध कार्यक्रमांचे आयोजन हरिनाम गजरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रदक्षिणा करण्यात आली. या जयंती दिना निमित्त श्री ज्ञानेश्वरी जयंती दिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव या महोत्सवाचे बोधचिन्ह देऊन आळंदी देवस्थान तर्फे सन्मानित करण्यात आले. यावर्षी आळंदीसह परिसरात सर्वत्र श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२४ – २०२५ साजरे केले जात आहे. या वर्षातील श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी तील १८ वा अध्यायाचे पारायण, कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विविध…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – तीर्थक्षेत्र देहू आळंदी येथून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीला नदी प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण सुटता सुटत नसल्याने भाविक नागरिकांत प्रचंड नाराजी पसरली आहे. गेल्या दोन महिन्यात अनेक वेळा नदी प्रदूषणाने नदी फेसाळली. यात पुन्हा मंगळवारी ( दि. २४ ) इंद्रायणी नदीचे प्रदूषण पाणी फेसाळलेले आल्याने प्रदूषण वाढले. यामुळे नदीचे पुलावर फेसाळलेली नदी पाहण्यासह नागरिकांनी सेल्फी घेत सोशल मीडियावर आळंदीतील नदी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे. आळंदी देहू सह पुण्यातील नद्या प्रदूषण मुक्त होण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिक, भाविक आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान…
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘रक्त संकलन अभियाना अंतर्गत शिबिराचे आयोजन चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये ‘रक्त संकलन अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत चिंचवड येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले. युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे आणि शहर सरचिटणीस शिवम डांगे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड येथील गोखले हाॅल येथे ‘पिंपरी चिंचवड ब्लड बँक’ यांच्या माध्यमातून हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात.…
आशा नेगी यांच्या ब्युटी ऑफ लाईफ पुस्तकाचे प्रकाशन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्थळ निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृह … रविवारी संध्याकाळची पाचची वेळ … कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर प्रयत्नपूर्वक मात करून पुन्हा सर्वसामान्य माणसांसारखे जीवन जगण्याचा संदेश देणारे ‘ब्युटी ऑफ लाईफ – द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हायवर’ या आशा नेगी लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचा प्रसंग …. कॅन्सर झाला हे समजले की रूग्ण मुळापासून कोलमडतो … आपल्याच नशीब हे का, असा प्रश्न पडतो … संपूर्ण कुटुंब सैरभैर होते … कॅन्सरवर मात करू शकतो हे मनाला ही शिवत नाही… परंतु आशा याला अपवाद… त्यांची कहाणी ऐकताना उपस्थित निःशब्द होतात……
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – परतीच्या मान्सूनमुळे पिंपरी चिंचवड शहर व परिसरात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे आणि आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या पूरनियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेत अधिका-यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार आज महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १३, ७, ४, १०, ६, ९, ७ आणि…
डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अधिस्वीकृती द्या – एस. एम. देशमुख राज्यस्तरीय पहिल्या डिजिटल मीडिया कार्यशाळेत ४०० पेक्षा अधिक पत्रकारांचा सहभाग पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- डिजिटल च्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकार देखील समाजासाठी उपयुक्त ठरणारे विषय सडेतोड पणे मांडत आहेत. प्रिंट व इलेक्ट्रानिक मीडियाला पूरक असणाऱ्या या डिजिटल माध्यमांना आता जनमान्यता मिळाली आहे तर सध्याच्या स्पर्धा युगात डिजिटल मीडिया प्रभावी साधन ठरत आहे असे प्रतिपादन लखनऊ येथील न्यूज फोर पीएम या यू ट्यूब चॅनलचे संपादक संजय शर्मा यांनी केले. पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहामध्ये पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी…
‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ७वा दीक्षांत समारंभ उत्साहात पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विद्यार्थी हा उद्याच्या विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. भारताच्या या युवा पिढीने कधीही हताश न होता, शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्विरित्या करिअर करावे. विद्यार्थ्यांनो दुसऱ्याच्या यश-अपयशाचा विचार न करता, केवळ आपले काम, प्रतिभा व तत्वांवर ठाम राहून कष्ट केल्यास कुठल्याही क्षेत्रात यश नक्कीच मिळते, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी मांडले. ते येथे आयोजित एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या ७व्या दिक्षांत समारंभा प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, प्रतिष्ठित शास्त्रज्ञ इस्रो…
