- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– हरकती घेतलेल्या शेतकरी, भूमिपुत्रांना अखेर दिलासा – भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेतील वाढीव हद्दीतील मौजे बोऱ्हाडेवाडी येथे नगर रचना योजना (T.P. Schemes) मधून रहिवाशी क्षेत्र वगळण्याबाबतचा प्रस्तावाला महानगरपालिका सर्वसाधरण सभेत प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. रहिवाशी क्षेत्र वगळण्यात आल्यामुळे आता ‘ग्रीन झोन’मध्ये टी.पी. स्कीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे भूमिपुत्रांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार महानगरपालिका प्रशासनाने नगर रचना योजना राबवण्यास सुरूवात केली होती. मात्र, बोऱ्हाडेवाडी येथील स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र यांनी निवासी क्षेत्र या योजनेतून वगळवावे. या करिता योजनेला विरोध केला.…
मुलींमध्ये एमआयटी, आळंदीचा प्रथम क्रमांक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात पीसीसीओईने तर मुलींच्या गटात आळंदी येथील एमआयटी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजयी संघांना बुधवारी (दि.२५) पीसीईटीचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव बाजीराव पाटील व कै. श्रीमती लीलाताई शंकरराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ फिरता चषक पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, एसडीडब्ल्यू डॉ. पद्माकर देशमुख पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. ज्ञानेश्वर चिमटे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. …
सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या विचारातून समाजातील शेवटच्या घटकातील, तळागाळातील सर्वसामान्य, कष्टकरी, गरजू नागरिकांपर्यंत केंद्र शासन असो, राज्य शासन असो अथवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल या सर्वांच्या कल्याणकारी योजना पोहचविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आम्ही ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. त्यामाध्यमातून लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांचा जनसेवेचा वसा आणि वारसा अविरतपणे चालविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. पिंपळे गुरव येथील भाजप कार्यालयात अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत सुरक्षा संच आणि गृहोपयोगी भांड्यांचा संच वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गुजरातचे आमदार…
-कामाची केली पाहणी ; वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर ते पिंपरीकडे जाताना पवना नदीवर नविन समांतर पुल बांधण्यात आला असून तो लवकरच नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. गुरुवार (दि. २६) या पुलाच्या कामाची माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पाहणी केली. पुलाच्या वाहतुकी दरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेच्या उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना यावेळी नाना काटे यांनी दिल्या. पिंपरीगाव पिंपळे सौदागर दरम्यानच्या समांतर पुलाचे काम पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक बाबी तसेच वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने पडताळणी झाल्यानंतर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्ष नेते नाना…
महाराष्ट्र मजदुर संघटनेच्या वतीने स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या 91व्या जयंतीनिमित्त अभिवादन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज खऱ्या अर्थाने साहेबाच्या विचाराना प्रमाण मानून कष्टकरी माथाडी ¸ हमाल मापडी कामगाराच्या करिता कार्य करणारे सरकार राज्यात प्रस्थापित झाले असून कायद्यात सुधारणा करण्यासाठी आणलेले विधेयक व त्या विधेयकामध्ये सुधारणा करण्यासाठी काही सूचना माथाडी कामगार, संघटना यांना मागविण्यात आल्या व त्याच अनुषंगाने कामगारांनी / संघटनांनी असमाधान व्यक्त केल्यानंतर सदरील विधेयक थांबवून त्यावर चिकित्सा समिती नेमण्यात आली. आज खऱ्या अर्थाने हा कष्टकरी कामगारांच्या एकजुटीचा विजय आहे. कष्टकरी गोरग़रीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आपले आयुष्य वेचणार्या अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त चिंचवड येथील अण्णासाहेब पाटील…
– भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश – राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा’ योजनेतून निधी उपलब्ध पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकीकात भर घालणारा ‘बायोडायर्व्हसिटी पार्क’ (जैवविविधता उद्यान) तळवडे येथे विकसित करण्यात येत आहे. सुमारे ७० एकर जागेत होणारा हा प्रकल्पामुळे निगर्स परिसंस्थेचा जीर्णोद्धार होणार आहे. महानगरपालिका स्थायी समिती सभेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी तळवडे येथे ‘बायोडायर्व्हसिटी पार्क’ विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी महानगरपालिका, राज्य सरकारकडे सातत्त्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. राज्य सरकारच्या…
महाआरोग्य शिबिराचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे मयूर जाधव यांचे आवाहन ! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मयूर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी श्री मयूर भरत जाधव मित्रपरिवार यांच्यावतीने ‘महाआरोग्य शिबिर सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या सप्ताहामध्ये नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मयूर जाधव यांनी दिली. सदर शिबिर सप्ताह येत्या शुक्रवार (दि. २७ सप्टेंबर २०२४ ते २ ऑक्टोबर २०२४) दरम्यान राबविण्यात येणार आहे. तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक प्रभागात सदर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात येतील. तसेच…
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे आकुर्डी येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयातील प्रा. भूषण मारुतीराव नानचे यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. ते मुळ गडहिंग्लजचे रहिवासी आहेत.राजस्थान येथील जे.जे.टी. विद्यापीठ येथून “मानवी क्रिया ओळखण्यासाठी हायब्रिड डीप लर्निंग मॉडेल” विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. वरील संशोधनसाठी त्यांचे आजपर्यंत ४ आंतरराष्ट्रीय व २ राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध नामवंत व स्कोपस इंडेक्स्ड जर्नल्स मध्ये प्रसिध्द झाले आहेत. या संशोधनसाठी मुंबईचे डॉ हिरेन दंड व डॉ भाग्यश्री टिंगरे यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, विश्वस्त तेजस पाटील, संकुलाचे संचालक रियर एडमिरल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचार, मनमानी कारभार दहशत आणि एकाधिकारशाहीचा कारभार सुरू आहे. करदात्या नागरिकांच्या खिशातील पैसा जागोजागी ओरबडला जात असून, नागरिक पाणी, वीज, रस्ते, खड्डे या प्रश्नांनी वैतागलेले आहेत. या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने ‘परिवर्तन’ करायचे ठरवले आहे. हे परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडीची शक्ती एक दिलाने लढणार असून त्यासाठी आमच्यामध्ये एकजूट आहे. आमची ही एकजूट पाहून आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्य संघटक एकनाथ पवार म्हणाले. शिवसेना राज्य संघटक तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे एकनाथ पवार यांच्या निवासस्थानी भोसरी विधानसभा महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे शहरासह जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. यापार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील शाळा आणि कॉलेजेसना गुरुवारी (२६ सप्टेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. पिंपरी चिंचवड व पुण्यात बुधवारी दुपारनंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली. तीन तास झालेल्या या पावसानं पुण्याची अक्षरशः वाट लावली. ठिकठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं नागरिकांना यातून मार्ग काढणं अवघड बनलं होतं. तसंच दुपारपासूनच रात्री उशीरापर्यंत बाणेर रोड, विद्यापीठ रस्ता, शिवाजीनगर भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. आज देखील रेड अलर्टमुळं हीच परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळं शालेय…
