Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड मतदारसंघ ठाकरे गटाकडेच रहावा; बैठकीत एकमत… चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कुठल्याही परिस्थितीत चिंचवड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडेच रहावा, यासाठी शिवसैनिकांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. त्यासाठी आज रविवारी (दि. २९) रोजी) शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची वाल्हेकर वाडी येथे बैठक झाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघ फक्त मशाल चिन्हावरच लढविण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी बैठकीत केला आहे. लवकरच पक्षाचं एक शिष्ठमंडळ उद्धव साहेबांची भेट घेऊन त्यांच्याकडे आग्रही मागणी करणार असल्याची माहिती चिंचवड विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपशहर प्रमुख हरेश आबा नखाते यांनी प्रसिद्धीस दिली आहे. बैठकीला पिंपरी चिंचवड शहर संघटिका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा प्रमुख…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ कासारवाडी येथील जैन स्थानकाच्या पगारिया सभागृहामध्ये ज्येष्ठ तपस्विनी श्रीमती गीता जैन यांच्या 71 दिवसाच्या प्रदीर्घ तपश्चर्येचा समारोप प्रत्याख्याध समारंभ मंगलमय वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी कासारवाडी जैन स्थानकामध्ये विराजित उपप्रवर्तिनी प पू मंगल प्रभाजी म सा, प पू डॉ मधुस्मिताजी म सा, प पू हर्षिताजी म सा, प पू दिव्यांशी श्री जी यांच्या मंगलमय सान्निध्यात संपन्न झाला. आणि प पू मंगल प्रभाजी यांच्या मुखारविंदाने हा प्रत्याख्यान करण्यात आले . यावेळी तपस्वीनी श्रीमती गीता जैन यांना तपचंद्रिका या उपाधिने सन्मानित करण्यात आले व त्यांना सन्मानपत्र बहाल करण्यात आले. सुशील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी – चिंचवड न्यायालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका न्यायालय आणि पुणे जिल्हा विधी प्रधिकरण तसेच पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पिंपरी, नेहरूनगर न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये, अल अमुदी, व्ही. एन. गायकवाड आणि व आकुर्डी न्यायालयात व्ही. एस. डामरे यांनी आणि त्यांच्या समवेत पॅनल जज्ज म्हणून ॲड. मोनिका गाढवे, ॲड. वैभव कल्याणकर, ॲड. तमन्ना रोहरा, ॲड. दिव्या संहिता यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन आणि पाहुण्यांचे स्वागत करून झाली. कार्यक्रमात प्रमुख वक्ते यांची भाषणे झालीत. त्यामध्ये न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी लोक…

Read More

चिंचवड मतदारसंघ ठाकरे गटाकडेच रहावा; बैठकीत एकमत चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कुठल्याही परिस्थितीत चिंचवड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडेच रहावा, यासाठी शिवसैनिकांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. त्यासाठी आज रविवारी (दि. २९) रोजी) शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची वाल्हेकर वाडी येथे बैठक झाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघ फक्त मशाल चिन्हावरच लढविण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी बैठकीत केला आहे. लवकरच पक्षाचं एक शिष्ठमंडळ उद्धव साहेबांची भेट घेऊन त्यांच्याकडे आग्रही मागणी करणार असल्याची माहिती चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे. बैठकीला पिंपरी चिंचवड शहर संघटिका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोर्‍हाळे, शहर संघटक संतोष सौंदणकर, उपशहरप्रमुख…

Read More

भोईर यांचा लढण्याचा निर्धार, पत्रकार परिषदेतून केली भूमिका जाहीर २ ऑक्टोबर रोजी निर्धार मेळाव्यात करणार राजकीय भूमिका स्पष्ट पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- संपूर्ण ताकदीनिशी मी चिंचवड विधानसभेच्या रणांगणात उतरणार असून या निवडणुकीत माझा पक्ष हा माझा मतदारच ठरवतील. जनतेच्या दरबारातच मी न्याय मागणार असून माझ्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे दरवाजे उघडे आहेत,  अशी राजकीय भूमिका  भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब भोईर बोलत होते.कित्येक वेळा राजकारणात ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच जवळ बसून माझा कार्यक्रम केला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आणि…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पुणे जिल्हा क्रीडा परिषद, पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आंतर शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४  आयोजित करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत शनिवारी (दि. २८) चिंचवड, शाहूनगर येथील पंडित दीनदयाळ मैदानात (अटल बिहारी वाजपेयी उद्यानासमोर) सकाळ पासून आंतरशालेय खो खो च्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या मैदानावर पावसामुळे सर्वत्र चिखल साचला असून अशा चिखलात खेळाडूंचा जीव धोक्यात घालून खो-खोच्या स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. काही पालक व क्रीडा शिक्षकांनी येथील त्रुटी आयोजकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याऐवजी तक्रारी कडे दुर्लक्ष केले आणि चिखलात साचलेल्या गाळात खो-खो स्पर्धा सुरू केल्या आहेत.…

Read More

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर, २०२० राबविण्यास सुरवात झाली. “माझी वसुंधरा अभियान ४.०” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२४ या कालावधीत राबविण्यात आले होते. *माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. गटातील विजेते तसेच, महसूल विभाग व जिल्ह्याच्या एकूण कामगिरी वरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची शासनाच्या मान्यतेनंतर निवड करण्यात आली आहे. “माझी वसुंधरा अभियान ४.०” चा अंत्तीम निकाल खालील प्रमाणे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर या दोन गावांना जोडणारा पवना नदीवर नुतन समांतर पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून पुलाचे संपुर्ण बांधकाम पुर्णत्वास आले असून तो लवकरच नागरिकांच्या वाहतुकीस व दळणवळणास खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती उषा वाघेरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. दिलेल्या   प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आज या पुलाच्या कामाची मनपा स्थापत्य विभागाचे अधिकारी वर्ग व कंत्राटदार यांच्या  उषा संजोग वाघेरे पाटील तसेच युवा नेते ऋषिकेश वाघेरे पाटील यांनी पाहणी केली.पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर या पुलाचे अंतिम कामे लवकर पुर्ण करून तो लवकरच नागरिकाना खुला करून द्यावा अशी सूचना देखील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मयूरभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मयूर जाधव युवा प्रतिष्ठान आयोजित महाआरोग्य शिबीर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पहिल्या दिवशी दापोडी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती तुषारभाऊ नवले, जन्नतताई सय्यद, मेहबूब शेख, अजयभाऊ कांबळे, शाहनवाजभाई शेख, सचिन खोकर, हभप बोधेकाका, विनायक हुलावळे, बाळासाहेब फुले, विशाल भुजबळ, प्रमोद वाघमारे, निशांत म्हेत्रे, योगेश जाधव, सुनील कांबळे उपस्थित होते. क्रिस्टल आय केअर आणि ओंकार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून भव्य महाआरोग्य शिबिर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने दापोडी येथील शिबिरामध्ये नागरिकांना शुगर, रक्तदाब, ताप,…

Read More

पिंपरी चिंचवड मधील ब्युटीशियन महिलांनी अनुभवली इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया यांची जादुई कला पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  आपण सुंदर, आकर्षक दिसावे असे प्रत्येकाला वाटते, आपल्या सभोवताली अनेक ब्युटी पार्लर, सलॉन असत्तात आपण मात्र आपल्याला कोण चांगल दाखवू शकतो त्यामध्ये जात असतो. तर एका व्यक्तीने जगातील प्रत्येकजण कसा चांगला दिसेल, कुणाला कोणती हेअर स्टाइल शोभेल असा विचार केला आणि आपल्या कामाच्या माध्यमातून जगभर नाव पोहोचवले ती व्यक्ती म्हणजे इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया. आज त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांचे काम पहाण्याची संधी पिंपरी – चिंचवड मधील महिलांना मिळाली. निमित्त होते , कै.मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्टच्या वतीने पिंपरी चिंचवड…

Read More