Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिलासा संस्था व मानवी हक्क आणि संरक्षण जागृती या संस्थांच्या वतीने पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे बुधवार, दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘मी महात्मा गांधी बोलतोय!’ हे लक्षवेधी पथनाट्य सादर करण्यात आले. ८४ वर्षांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. पी. एस. आगरवाल यांनी महात्मा गांधी यांची हुबेहूब भूमिका साकारली होती. मानवी हक्क आणि संरक्षण जागृती संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, संगीता जोगदंड, शब्दधन काव्यमंचाचे सदस्य कवी शामराव सरकाळे, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी पथनाट्यात सहभाग घेतला होता. सुभाष चव्हाण यांनी “तू हिंदू…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शाळेचे वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छ करीत स्वच्छता अभियानाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय विद्यानिकेतच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, प्रिती…

Read More

– चाकण औद्योगिक पट्टयातील सर्वाधिक वेतनवाढ करार – भाजपा आमदार महेश लांडगे यांची यशस्वी मध्यस्थी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चाकण औद्योगिक वसाहतमधील ‘इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या निघोजे आणि महाळुंगे प्लांटमध्ये वेतनवाढ करार केला आहे. या करारानुसार कायमस्वरूपी कामगारांना २१ हजार ३०० रुपये,  रोलवर आलेल्या सभासद कामगारांना २ हजार ५०० आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना १ हजार २५० रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून कामगारांनी पेढे वाटत फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड  आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये हॉटेल कलासागर, कासारवाडी येथे झालेल्या बैठकीमध्ये चौथ्या…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला “नॅकचे ए प्लस” मानांकन प्राप्त झाले आहे. एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयाने राष्ट्रीय मुल्यांकन व प्रत्यायन परिषदेची नॅकची ए प्लस श्रेणी दुसऱ्या फेरीमध्ये प्राप्त केली आहे अशी माहिती पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ची स्थापना २००९ साली झाली. ही संस्था स्थापने पासूनच शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहे. या आधी संस्थेला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटेशन (एनबीए) मानांकन पहिल्या फेरीत पटकावले होते. आता या महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती  आहे. हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रुमला या घटनेची माहिती मिळाली. एका रिसॉर्टवरच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरला हा अपघात झाला. पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टवरच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. सकाळच्या सुमारास धुके असलेल्या डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळले. हा अपघात नेमका कशामुळे घडला याची माहिती समोर आलेली नाही. या हेलिकॉप्टरमध्ये तिघे होते आणि तिघांचाही मृत्यू झाला. या परिसरात एकमेक हेलिपॅड असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या व्यक्ती तिथे येत असतात. घटनेची माहिती पोलिसांसह, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नवी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळे निलख, विशाल नगर परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या परिसरातील अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली असून सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेत आहेत. तरुणी, महिला, जेष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. गुन्हेगारांवर व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. पिंपळे निलख, विशाल नगर परिसरातील अवैध धंदे बंद करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन साठे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.     मंगळवारी सचिन साठे यांनी पोलीस आयुक्तालय व नवी सांगवी पोलीस स्टेशन येथे…

Read More

शाळाबाह्य मुलांच्या पुनर्नोंदणीसाठी महापालिका राबवतेय तीन-टप्प्यांचा व्यापक उपक्रम महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत ५२२ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना ओळखले; १०९ मुलांची नोंद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्यप्रवाहामध्ये आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांच्या पुनर्नोंदणीचा व्यापक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने, यावर्षी जुलैच्या सुरुवातीला, या शाळाबाह्य मुलांची ओळख पटवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सर्वंकश सर्वेक्षण सुरू केले. शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शिक्षण हक्क कायद्यांतर्गत नोंदणी करण्यासाठी स्वयंसेवकांसोबत सहकार्य करण्याच्या मुख्याद्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये १०९ मुलांची नोंद पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुलांची तात्काळ नोंदणी समाविष्ट करण्यासाठी मुख्याध्यापकांना शक्य तितक्या मुलांची, विशेषत: असुरक्षित भागातील…

Read More

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वाकड येथील रस्त्यांवर पथदिवे लावण्याचा पालिका प्रशासनाला विसर पडलेला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते श्री विशाल वाकडकर यांनी वारंवार पाठपुरावा केला असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाकड हिंजवडी नवीन लिंक रोड वरील रॉयल मिराज सोसायटीच्या बाजूस असणारा तीस मीटर रुंदीचा रस्ता तयार झाला असून पुढे हा रस्ता हिंजवडी कडे जातो आहे. सदरील रस्त्याचे पालिका हद्दीतील काम पूर्ण झाले असून. या रस्त्यावर पालिकेकडून अद्याप दिवाबत्तीची सोय करण्यात आली नाही. या रस्त्यावर पथदिवे लावण्यात यावे तसेच रस्त्याच्या बाजूस ओपन जिम चे साहित्य…

Read More

बाणेर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड आर्चरी असोसिएशन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया द्वारा आयोजित सीएम स्कूल परिसरामध्ये धनुर्विद्या या क्रीडा प्रकारातील पंच आणि प्रशिक्षक यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरा दरम्यान सहभाग घेतलेल्या शिबिरार्थींना धनुर्विद्या खेळाचे मार्गदर्शन, तांत्रिक प्रशिक्षण, धनुर्विद्येचे स्पर्धा पंच व नियम, खेळ मानसिकता विकास, खेळाडूंना आवश्यक असलेले आहार तज्ञांचे मार्गदर्शन आधी विषयांवर तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबिरामध्ये जिल्ह्यातून सुमारे 60 शिबिरार्थींनी सहभाग घेतला. शिबिरार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षक अभिजीत दळवी, धनुर्विद्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय पंच सोनल बुंदेले, आहारतज्ञ पायल शहा आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या शिबिराबद्दल माहिती…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड येथील सेंट अँड्—युज हायस्कूलमधील 120 विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत हातात स्वच्छता आली. अंगणात समाज का अंधारात? स्वच्छ भारत आदर्श भारत, स्वच्छता पाळा रोगराई टाळा, माझा भारत स्वच्छ भारत, आदी श्लोगणचे हातात फलक घेऊन घोषणा देत चिंचवड एमआयडीसी परिसरात आज सकाळी रॅली काढून नागरीकात स्वच्छतेविषयी जनजागृती केली. तसेच शाळा व शाळाबाहेरील परिसरात रस्त्याच्या दुर्तफा बाजूचे प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा, आधीची स्वच्छता झाडलोट करून महात्मा गांधी जयंती साजरी केली. नागरिकांनी कुडा व कचरा कुंडीत टाकून महापालिकेला सहकार्य करावे, असेही जागोजागी आवाहन केले. हायस्कूलचे फादर राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिम उपक्रम राबविण्यात आला.…

Read More