Author: maharashtrabreakingnews.com

पीसीसीओई मध्ये बास्केटबॉल स्पर्धा संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतर विभागीय बास्केटबॉल मुलींच्या स्पर्धेत पुणे शहर संघाने विजेतेपद पटकावले.    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (दि. १४ व १५ ऑक्टोबर) येथे झालेल्या या मुलींच्या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा, पुणे शहर, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा या चार संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेतून निवड झाली होती. या स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्यात आल्या.    अंतिम सामन्यात पुणे शहर संघाने व पुणे जिल्हा संघावर ३६ विरुद्ध २२ या गुणफरकाने विजय मिळवला. सिया खिलारे, मानसी निर्मलकर, चैतन्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला “नॅकचे ए प्लस” मानांकन नुकतेच प्राप्त केले आहे. हे मानांकन मिळणे म्हणजे पीसीईटीच्या विश्वस्तांनी एसबीपीआयएमच्या कर्मचाऱ्यांवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. या महाविद्यालयाने राष्ट्रीय मुल्यांकन व प्रत्यायन परिषदेची नॅकची ‘ए प्लस’ श्रेणी दुसऱ्या फेरीमध्ये प्राप्त केली आहे. त्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.     यावेळी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त “वाचन प्रेरणा दिवस” साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, निशा पवार ,भावना देवरे, प्रज्ञा शिरोडकर गीतांजली दुबे,हेमा सिंग यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार यांनी डॉ. कलाम यांचा ‘स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडते, तर खरे स्वप्न…

Read More

पीसीसीसोईआर येथे ‘अल्टिमेट रोबोटिक चॅम्पियनशिप – २४’ चे उद्घाटन पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विविध स्पर्धांमधून भाग घेताना विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांना प्रेरणा मिळते. चाकोरी बाहेरच्या नवकल्पना अशा स्पर्धांमधून प्रकट होतात. त्यासाठी रोबोटिक चॅम्पियनशिप सारख्या राष्ट्रीय स्पर्धा एक उपयुक्त व्यासपीठ आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी व्यक्त केले.      पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीसोईआर) येथे अल्टिमेट रोबोटिक चॅम्पियनशिपचे (युआरसी) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. १६) करण्यात आले. यावेळी पीसीसीसोईआर चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, ई…

Read More

पीसीईटी मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सर्वांत मोठा गरबा नाईट आयोजित पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  देशातील अग्रमानांकित शैक्षणिक संस्थापैकी एक असणाऱ्या, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट मध्ये ‘ढोल बाजे – दांडिया नाईट’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पीसीईटी आकुर्डी कॅम्पस मधील ४५०० पीसीईटीयन्स या दांडिया नाईट मध्ये सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी – विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी यांनी रास-दांडिया,  पारंपरिक गरब्याचा आनंद लुटला. यंदाचे या दांडिया नाईटचे तीसरे वर्ष होते.       कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताच्या उद्योग क्षेत्र आपल्या कर्तृत्वाने उजळून टाकणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण स्वर्गीय रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यात आली. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे…

Read More

आयोगाकडूनच होतेय आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन.. पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्याचा निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेतून अजूनही बाहेर आलेला नाही. संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली असताना प्रसिद्धीलोलुप तिघा राज्यकर्त्यांची नावे आणि फोटो शासकीय योजनांद्वारे जाहिरातींच्या माध्यमातून रेडीओ, टीव्ही आणि सोशल मिडीयावर अजूनही झळकत आहेत. दुसरीकडे जनसंपर्क कार्यालयावरील नावाची पाटीदेखील दिसू नये, यासाठी विरोधकांवर तात्काळ कारवाईचा बडगा उचलण्याचे आदेश देणाऱ्या निवडणूक आयोगाची कृती नक्कीच वादग्रस्त आहे. यामुळे ही निवडणूक नक्कीच निष्पक्ष होईल?, असा सवाल उपस्थित होतोय. त्यांनी आतातरी राज्यकर्त्यांचे लाड बंद करावेत, अशी उपरोधिक मागणी शिवसेना ठाकरे गटाचे चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुख्य निवडणूक…

Read More

– भोसरीतील मेळाव्यात समर्थकांचा विजयाचा निर्धार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘‘१० वर्षांत काय केले?’’ असा प्रश्न विचारणाऱ्यांना मी सांगणार आहे. शास्तीकर सरसकट माफ झाला आणि तुम्ही व तुमचे कुटुंबीय त्याचे लाभार्थी आहेत. आतापर्यंत मी कुणाचे नाव घेतले नाही. मात्र, आता भर चौकात नाव घेवून सांगणार कुणाचा किती शास्तीकर माफ झाला. ‘भोसरीत राहण्याची लाज वाटते’ असा आरोप तुम्ही केला. त्यामुळे आम्हा भोसरीकरांचा स्वाभिमान दुखावला आहे. मी माफ केले असते. पण, माझ्या भोसरी गावचे नाव बदनाम करायला नको होते, असे टिकास्त्र आमदार महेश लांडगे यांनी सोडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भोसरी गावठाण येथील महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या मैदानावर निवडणूक नियोजनाबाबत…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  दिलासा संस्थेच्या वतीने चिंचवड गाव येथील समरसता गुरुकुलम येथे दुर्गाष्टमीच्या दिवशी एक ऐतिहासिक नोंद घ्यावी असे काम पिंपरी चिंचवड शहरातील साहित्यिकांनी केले. पुरुष साहित्यिकांनी महिला साहित्यिकांसोबत भोंडवा खेळला. विशेष म्हणजे ही भोंडला गीते पारंपारिक चालीत होती पण आजच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारी होती. कवी सुरेश कंक भोंडला गीत सादर करताना रक्तदानाचे महत्त्व सांगतात.. रक्ताचे दान बाई रक्ताचं दान.. वाचवू एका जीवाचे प्राण माणुसकीची ठेवूया जाण एकोपा ठेवून काम करू छान.. तर ज्येष्ठ कवयित्री संगीता सलवाजी आपल्या भोंडला गीतातून औषधी झाडे आपल्या दारी असावीत यासाठी सांगतात.. एक झाडं लावू बाई दोन झाडं लावू तुळस ,झेंडू, गवती…

Read More

विद्यार्थ्यांनी पथनाट्य व रॅलीच्या माध्यमातून दिला समाजाला सकारात्मक संदेश पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च व स्कूल ऑफ वेदिक सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘मानसिक आरोग्य सप्ताह’ साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘संवेदनशीलता –  मानसिक आरोग्याची’ या विषयावर लोणी-काळभोर गावात रॅली काढून व पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. विद्यापीठातील ‘मॅनेट’ या इमारतीपासून या रॅलीला विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा. डाॅ.अनंत चक्रदेव व डाॅ.मोहित दुबे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी, स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चच्या प्रभारी प्राचार्या डॉ. प्रिया सिंग आणि स्कूल ऑफ वेदिक सायन्सेसच्या प्रभारी प्राचार्या  डॉ. माधवी गोडबोले यांच्यासह दोन्ही स्कुलचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थी देखील उपस्थित होते. ही रॅली लोणी-काळभोर गावात पोचल्यानंतर प्रा. पुष्पा आटोळे आणि डॉ. शशिकला यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्यावर आधारित, ‘पिंजरे से मुक्ती’  हे अतिशय सुंदर पथनाट्य सादर केले. रॅलीच्या सांगते साठी लोणी-काळभोर गावच्या सरपंच सौ. सविताताई लांडगे यांनीही हजेरी लावून पथनाट्याचे तोंडभरून कौतुक करताना विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. या रॅलीच्या व मानसिक आरोग्य सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. नीता म्हवान यांनी कष्ट घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक डाॅ.सुनिता कराड, प्र. कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार सायली कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी विनय लोंढे आणि रेहान सय्यद यांची निवड करण्यात आली.    अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था ( रजि.) या संस्थेशी संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड पुढील एक वर्षासाठी (सन २०२४ ते २०२५) करण्यात आली आहे.    पत्रकार संघाचे पदाधिकारी व सभासदांची मंगळवारी बैठक घेण्यात आली या बैठकीत अध्यक्ष – सायली कुलकर्णी, (माझी सखी सोबती); उपाध्यक्ष – विनय लोंढे (खरा सामना); रेहान सय्यद (शबनम न्यूज); सचिव – संतोष जराड (पीसीएमसी न्यूज); कोषाध्यक्ष – गणेश शिंदे (न्यूज…

Read More