- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– ‘हॅट्रिक’साठी जाधववाडीतील महिला भगिनींकडून विजयाचे औक्षण! – सर्वाधिक ‘लीड’ जाधववाडीतून देण्याचा ग्रामस्थांनी व्यक्त केला विश्वास पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली, जाधववाडी भागामध्ये दहा वर्षांमध्ये अंतर्गत रस्त्यांची कामे झाली. विकास आराखड्यातील रस्त्यांना न्याय मिळाला. विद्यार्थ्यांसाठी शाळेची इमारत, पाण्याच्या टाक्या, उद्यान व्यायामशाळा उपलब्ध करून देताना चिखली जाधववाडी भागाचा सुनियोजित विकास होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले. समाविष्ट गाव म्हणून दुर्लक्षित राहिलेल्या जाधववाडीकरांसमोर विकासाचे व्हिजन’ ठेवले आणि ते पूर्ण केल्यामुळे ग्रामस्थ आमदार महेश लांडगे यांच्या कामाची पोचपावती सर्वाधिक ”लीड” देऊन करतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय व मित्रपक्ष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. सुलक्षणा शिलवंत यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. पिंपरीत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत यांच्यात थेट लढत होणार आहे.
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिक्षणाबरोबरच मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे असून महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या नवोदित मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान करुन आपला मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क तर बजवावाच शिवाय प्रत्येकाने किमान १०० मतदारांना देखील मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचे आहे. राज्याच्या तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही सक्षम करण्यासाठी नवोदित मतदारांचे मतदान महत्त्वाचे आहे प्रतिपादन प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी केले. २०६, पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदार कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालय येथे…
थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे तसेच पारदर्शक वातावरणात पार पाडणे हे सामुहिक कर्तव्य असून निवडणुकीचे गांभीर्य ओळखून सर्वांनी आपली जबाबदारी राष्ट्रीय भावनेने तसेच समन्वयाने पार पाडावी, असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया होणार असून चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतर्गत मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. हे प्रशिक्षण दोन सत्रात पार पडले. प्रथम सत्रात थेरगाव येथील स्व.शंकर अण्णा गावडे स्मृती कामगार…
थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्राच्या हितासाठी करायचं मतदान..,एकतेने एकजुटीने गाजवूया मैदान..,लोकशाहीचा करूया सन्मान..,१०० टक्के करायचं मतदान..हा वासुदेवाचा आवाज सकाळी सकाळी काळेवाडी, तापकीर चौक, रहाटणी परिसरात घुमला आणि या आवाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत काळेवाडी, तापकीर चौक, रहाटणी परिसरातील उद्याने, सोसायट्यांमध्ये महाराष्ट्राची प्राचीन परंपरा असलेल्या वासुदेवाच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. डोक्यावर मोरपिसांची टोपी, हातात टाळ आणि मधुर वाणीने मतदान जनजागृती करणाऱ्या वासुदेवाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनीही गर्दी केली होती. शहरातील नव मतदार असलेल्या तरुणाईला, मतदानाचा हक्क न बजावणाऱ्या मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि त्यांना मतदान करण्याची प्रेरणा देण्यासाठी लोकगीतांच्या सहाय्याने…
भाऊसाहेब भोईर यांनी दिले पोलीस आयुक्तांना पत्र पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महासाधू मोरया गोसावी, संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा आदर्श पिंपरी चिंचवड शहराला आहे. हे सुसंकृत व कायदा आणि सुव्यवस्था पाळणाऱ्या सुजाण नागरिकांचे शहर आहे. या शहरामध्ये देशभरातून येऊन सर्व जाती, धर्माचे लोक कष्ट करून देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात हातभार लावत आहेत. ज्येष्ठ नेत्या माधवी लता यांनी निवडणुकीच्या तोंडावर चिंचवड विधानसभा क्षेत्रात येऊन प्रक्षोभक वक्तव्य करू नये व सामाजिक वातावरण बिघडवू नये अशा आशयाचे पत्र ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी पोलीस आयुक्त यांना दिले आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यभर वाहत आहेत.…
पत्रकार परिषदेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड, भोसरी यापैकी किमान एक तरी जागा काँग्रेस पक्षाला द्यावी, अन्यथा पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाहीत असा इशारा महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे माजी अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य मनोज विष्णू कांबळे यांनी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला. शनिवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सायली नढे, पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, सचिव संदीप शिंदे, स्वाती शिंदे, हरीश डोळस, संदेश नवले, सुरेश गायकवाड, युनूस बांगर, सुधाकर कुंभार, निखिल…
– पिंपरीतील बैठकीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा आग्रह पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दीड लाख लोकसंख्या असलेल्या टपरी, पथारी, हातगाडी, धारक धुणी -भांडी महिला कामगार, रिक्षा चालक यांचा आवाज पिंपरी विधानसभेच्या निवडणुकीत घुमणार आहे. बाबा कांबळे हे पिंपरी विधानसभेतून निवडणुकीला उभा राहणार आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे हा निर्धार त्यांनी केला आहे. पिंपरी येथे कष्टकरी कामगार पंचायत, टपरी, पथारी, हातगाडी, घरकाम महिला कामगार, रिक्षा चालक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत कार्यकर्त्यांनी बाबा कांबळे यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. यावेळी रिक्षा ब्रिगेड प्रमुख बाळासाहेब ढवळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शेलार, शहराध्यक्ष संतोष गुंड, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे उपाध्यक्ष अनिल गाडे…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – १० वर्षे गायब असणाऱ्यांना माझ्याविरोधात बोलण्यास एकही मुद्दा नाही. सरसकट शास्तीकर माफीचे विरोधकही लाभार्थी आहेत. त्याची फलक लाऊन माहिती दिली जाईल. विरोधक खोटे बोलत आहेत. खोटेनाटे आरोप करत आहेत. पण, मी खरे बोलणार ते त्यांना लागणार आहे. जेवढे माझ्यावर आरोप करतील तेवढ्याच ताकदीने मी यांच्या विरोधात उभे राहणार आहे. वेळ येऊ द्या, जशाच तसे उत्तर दिले जाईल. सगळ्यांचा नाद करा पण आपला करायचा नाही. खतरनाक पद्धतीने पुराव्यानिशी उत्तर दिले जाईल, असा इशारा देतानाच ‘‘नागेश्वर महाराजांची शपथ… मोशी गावातील एकोपा कायम ठेवणार, असा विश्वासही भोसरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांनी दिला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – उमेदवार शंकर जगताप यांच्या महाविजयासाठी मतदारसंघातील प्रत्येक बुथच्या सक्षमीकरणावर भर द्या. प्रत्येक बुथवर ५१ टक्केपेक्षा जास्त मतदान मिळविण्यासाठी कामाला लागा. तसेच ज्या बुथवर मतदानाचा टक्का कमी आहे त्या बूथवर अधिक मतदान कसे होईल यावर भर द्या, अशा सूचना गुजरातचे आमदार राकेश शहा यांनी दिल्या. पिंपळे गुरव, महालक्ष्मी लॉन्स याठिकाणी भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या महाविजयाची रणनीती ठरविण्यासाठी रहाटणी – सांगवी मंडलातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत स्व. आमदार लक्ष्मण जगताप, आमदार अश्विनी जगताप व शंकर जगताप यांच्या…
