Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री Devendra Fadnavis यांनी सादर केलेला २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा केवळ आर्थिक ताळेबंद नसून राज्याच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट रोडमॅप असल्याची प्रतिक्रिया आमदार Amit Gorakhe यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना गोरखे म्हणाले की, दिवंगत Ajit Pawar यांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या नावाने ‘अजित पवार गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ सुरू करण्याचा तसेच त्यांच्या कार्याची आठवण जपणारे स्मारक उभारण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. प्रशासनातील शिस्त आणि विकासाभिमुख दृष्टीकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांच्या कार्याला हा योग्य सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले. अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी समिती गठित करण्याचा निर्णय हा सामाजिक…

Read More

राज्याचा अर्थसंकल्प विकासाचा सर्वसमावेशक ‘रोडमॅप’; ५ दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा पायाभूत सुविधा, शेतकरी आणि तीर्थक्षेत्र विकासावर भर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  –  आजचा दिवस महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवासातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ आर्थिक घोषणांचा दस्तऐवज नसून, तो विकसित महाराष्ट्राचा एक व्यापक आराखडा आहे.  शाश्वत, सर्व समावेशक, प्रगतशील आणि सुशासन असा विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसत आहे. ज्यामध्ये महापुरुषांचा आदर्श जतन करून विकसित महाराष्ट्राचा रोड मॅप तयार करण्याचा दूरदृष्टीकोन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडला आहे.  मुंबई महानगराच्या  धर्तीवर आता पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ही…

Read More

“विकसित महाराष्ट्र २०४७” चे ध्येय्य दृष्टिक्षेपात..! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पाचे स्वागत करत भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा आणि सर्व घटकांसाठी आशादायी असल्याची प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प “विकसित महाराष्ट्र २०४७” या ध्येयाकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन, तसेच महिला शेतकऱ्यांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच, औद्योगिक विकासासाठी…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर आणि जेएसडब्ल्यू ग्रुप ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयआयटी कानपूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) च्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या “टीम तटरक्षक” ने “इनोवेशन इन रेझिलियनट इन्फ्रास्ट्रक्चर” हा प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. देशभरातून ३०० पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयातील संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पीसीसीओईआरच्या विजेत्या संघात अभिषेक गिरी, वैशाख आनंद एम, माहेक फातन, सृष्टी सावळी यांचा समावेश होता. टीम तटरक्षक ने मजबूत तांत्रिक पायाभूत रचना, नाविन्यपूर्ण डिझाईन, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीची क्षमता असलेला प्रकल्प…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२६–२७ सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोपोलिटन रिजन (PMR) वर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भुयारी मार्ग, उन्नत रस्ते जाळे आणि औद्योगिक व आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. भाजपा नेते व आमदार महेश लांडगे यांनी महाराष्ट्रा या विकासात्मक उपाययोजनांचा स्वागत करताना म्हटले आहे की, “महाराष्ट्राचे अर्थसंकल्प २०२६–२७ हा फक्त एक आर्थिक दस्तऐवज नाही, तर ‘विकसित महाराष्ट्र 2047’ कडे जाणारा रोडमॅप आहे. पुणे-पिंपरी-चिंचवड सारख्या महानगरांना आणि ग्रामीण भागांना समर्पित या धोरणांनी राज्याचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केला आहे,…

Read More

– भाजपा आमदार महेश लांडगे यांची आढावा बैठक – राज्य शासनाकडे विविध मागण्यांचा पाठवणार प्रस्ताव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील मूलभूत समस्यांवर चर्चा करून त्यांचे त्वरित निवारण करण्यासाठी उपाययोजना ठरवण्यात आल्या. बैठकीत नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता, बंद पथदिव्यांचे दुरुस्ती कामे, सांडपाणी वाहिन्यांचे नियमन आणि खराब रस्त्यांच्या दुरुस्तीवर सविस्तर चर्चा झाली. या सर्व बाबींसाठी नगरपालिकेच्या तांत्रिक टीमकडून सविस्तर अहवाल सादर करण्यात आला. महेश लांडगे यांनी या मुद्द्यांवर राज्य शासनाकडे विविध मागण्यांचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले असून, या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी नियमित बैठकांचे…

Read More

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न भारतासह जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड, ब्राझिल, युएई यासह ४३ देशांमधील ११६ पेक्षा अधिक चित्रपट, लघुपट, माहितीपट महोत्सवात प्रदर्शित पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केरळ राज्यातील मल्याळम भाषेतील आशयसंपन्न ‘मलवाझी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावत महोत्सवात विशेष ठसा उमटवला. तर मराठी भाषेतील ‘अ स्टोरी कार्वेड ऑन अ ट्री’ या संवेदनशील मांडणी असलेल्या लघुपटाने प्रेक्षक आणि परीक्षकांची मने जिंकत सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार पटकावला. अॅनिमेशन विभागात राजस्थान येथील ‘द वेट वॉल’ या चित्रपटाने आपली वेगळी छाप पाडत सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्मचा मान मिळवला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दुलाल…

Read More

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘पीसीएमसी श्वान रेबीज प्रतिबंधक लसीकरण, जनजागृती व सर्वेक्षण’ करण्यासाठी मिशन रेबीज मोहिम हाती घेण्यात आली असून यासाठी डब्ल्यूव्हीएस ही संस्था कार्यरत आहे. संबंधित संस्थेचे कर्मचारी आपल्या परिसरातील भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी आल्यानंतर त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मिशन रेबीज अंतर्गत प्राणीप्रेमी व नागरिक यांच्यासोबत समन्वय साधत शहरातील भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात येत आहे. हे काम सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत शहरातील विविध भागांमध्ये सुरू असते. या कामासाठी नियुक्त संस्थेच्या वतीने आतापर्यंत ९…

Read More

शहरातील प्रमुख प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचा निर्धार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या एका महिन्यात शहरातील विविध भागांना भेटी देत नागरिकांच्या समस्या तसेच नगर सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची प्रत्यक्ष माहिती घेतली आहे. या भेटीदरम्यान शहरातील प्रमुख प्रश्नांची यादी तयार करण्यात आली असून त्यावर टप्प्याटप्प्याने काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि वैद्यकीय सुविधांशी संबंधित समस्यांवर महापालिकेच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी रवि लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळाला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात उद्योग, गुंतवणूक आणि सेवा क्षेत्राच्या विकासासाठी केलेल्या घोषणांचे स्वागत करण्यात आले असून हा अर्थसंकल्प औद्योगिक विकासाला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेले उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ हे राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या धोरणाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात मोठे औद्योगिक क्लस्टर उभारण्याचा निर्णय घेतला असून २०४७ पर्यंत राज्याच्या उत्पन्नामध्ये उद्योगांचा वाटा ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा उद्देश आहे. ‘इन्वेस्ट महाराष्ट्र’ नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याची घोषणा तसेच प्रत्येक जिल्ह्यात लघु व मध्यम उद्योग केंद्र स्थापन करण्याचा निर्णयही स्वागतार्ह…

Read More