- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराचा आज थेरगाव येथे शुभारंभ झाला. गणेश नगर येथील श्री गणरायाच्या चरणी नारळ वाढवून भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी माजी उपमहापौर झामाताई बारणे, चिंचवड विधानसभा प्रचारप्रमुख काळूराम बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, माजी नगरसेवक संतोष बारणे, शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे सचिव विश्वजित बारणे, माजी नगरसेवक गोरक्षनाथ पाषाणकर, आरपीआय पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर, भारत केसरी पै. विजय गावडे, बबलू सोनकर, अभिषेक बारणे, राकेश बारणे, सनी बारणे, दिगंबर गुजर, करिष्मा बारणे, राजेश पुरोहित, रवी भिलारे, विनोद फंड,…
महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे केले आवाहन चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- चिंचवड विधानसभेच्या शाश्वत विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच आज या मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. चिंचवड मतदार संघात विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना आपण सर्वांनी प्रचंड मतांनी विजयी करत विधानसभेवर पाठवण्यात असे आवाहन आमदार अश्विनी जगताप यांनी केले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय (ए) व मित्र पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी आज वाकड विनोदे वस्ती परिसरातील सोसायटी धारकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी…
भय आणि भ्रष्टाचारमुक्त भोसरी मतदारसंघासाठी निवडणूक लढणार असल्याचे केले स्पष्ट पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी मंगळवारी (दि. २९) मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. फक्त सत्ता, पैसा, पैशातून आलेल्या सत्तेचा गैरवापर, खोटी आश्वासने आणि दहशत व भ्रष्टाचाराने पिचलेल्या या जनतेनेच आता माझी निवडणूक हातात घेतली आहे. ही जनतेची आणि शिवसैनिकांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. भय आणि भ्रष्टाचारमुक्त भोसरी मतदारसंघ करण्यासाठी मी निवडणूक लढणार असल्याचे रवि लांडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगितले. यावेळी शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रभारी अशोक वाळके, शहर समन्वयक कैलास नेवासकर, उपशहरप्रमुख नेताजी काशीद, माजी…
गद्दारांना माफी नाही – डॉ. अमोल कोल्हे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चुकीला एक वेळ माफी असू शकते परंतु गद्दारीला माफी नाही ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर गद्दारी केली त्यांना माफ केले जाणार नाही असे उद्गार शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी काढले. पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या सभेत खासदार अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की सुलक्षणा शीलवंत या वाघीण आहेत. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत होता त्यावेळी भले भले मागे हटत होते परंतु ही वाघीण मैदानात उतरली.…
कै. सोपानराव भोईर यांना स्मरण करून चिंचवड विधानसभेतून भाऊसाहेब भोईर यांचा अपक्ष अर्ज दाखल चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सकाळी वडील कै. सोपानराव भोईर (आप्पा) यांच्या भोईर नगर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, क्रांतिवीर चापेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून पुढे मंगलमूर्ती वाडा येथे जाऊन श्री मोरया गोसावी यांचे दर्शन घेऊन पुढे काळभैरवनाथ मंदिर व धनेश्वर मंदिर तसेच शहरातील महापुरुषांना अभिवादन करत शेकडोंच्या संख्येने रॅली काढत दळवी नगर, चिंचवड गाव अशा नियोजित मार्गाने २०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालय, येथे जाऊन उमेदवारी अर्ज भरला. यावेळी कन्या मानसी गौरव घुले-भोईर, मा. नगरसेवक गणेश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांनी पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बाळासाहेब ओव्हाळ यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन रविवारी प्रमुख कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी ओव्हाळ यांना पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघासाठी अधिकृत एबी फॉर्म देऊन त्याची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे ओव्हाळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मंगळवारी सकाळी ओव्हाळ यांनी पिंपरी एच. ए. कंपनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व राजेंद्र जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने 31 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर दरम्यान नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी दिली. या दिवाळी पहाटमध्ये पहिल्या दिवशी उद्या 31 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता पार्श्वगायिका ज्योती गोराणे, गायिका निकिता बहिरट, गायिका भक्ती कापरे यांचे गायन होईल. त्यांना हार्मोनियमवर पूजा वाणी, ढोलकीवर लक्ष्मी कुडाळकर आणि सहगायिका राधिका साकोरे संगीत साथ करतील. पहिल्या दिवशी श्रद्धा वरानकर निवेदन करतील. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 01 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध पार्श्वगायिका…
संभाजी ब्रिगेड, छावा मराठा युवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, छावा संघटनेचा अरुण पवार यांना पाठिंबा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हजारो चिंचवडकराच्या साक्षीने सामाजिक कार्यकर्ते तथा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी व समर्थक अरुण पवार यांनी भव्य रॅली द्वारे शक्तीप्रदर्शन करीत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, वाढती बेरोजगारी, वाहतूक कोंडी, नदी प्रदूषण या महत्त्वाच्या समस्या सोडविणार असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले. अरुण पवार यांनी पिंपळे गुरव येथील निवासस्थानापासून कार्यकर्त्यांसमवेत जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी गाव, काळेवाडी, थेरगाव अशी दुचाकी भव्य रॅली काढत ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अनिल…
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक ॲड. संदीप चिंचवडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक ॲड. संदीप चिंचवडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत उद्योजक अमर गवारे, अजय गायकवाड, पुंडलिक ठाकूर, राजेंद्र बर्गे हे उपस्थित होते. ॲड. संदीप चिंचवडे हे अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत. उच्चशिक्षित, अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ओळख आहे. ते चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तीव्र इच्छुक होते. दरम्यान हा मतदारसंघ महायुतीत भाजपला गेल्यामुळे ॲड. संदीप चिंचवडे यांनी अपक्ष मैदानात उतरण्याचे ठरवले आहे. मी चिंचवड विधानसभा मतदार संघात अपक्ष निवडणूक घडवणार आहे. मतदारसंघातील सोसायट्यांचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, रस्त्यांचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजप-शिवसेना-आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सोमवारी (दि. २८) रोजी विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी अर्चना यादव यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल, खा. श्रीरंग बारणे, शिवसेना शिंदे गटाचे उपनेते इरफान सय्यद, भाजपकडून आ. अमित गोरखे, उमा खापरे उपस्थित होते. दरम्यान मतदार संघातून निघताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि मतदार संघातील नागरिक स्वयंस्फूर्तीने आ. बनसोडे यांच्यासोबत होते. विशेषतः महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून तसेच घरांच्या छतावरून नागरिक हे…
