- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी येथे दिशा सोशल फाऊंडेशनचा उपक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यातील विधानसभा निवडणुकांचा सुरू असलेला रणसंग्राम, त्यात होणारे बेछूट आरोप – प्रत्यारोप, त्यामुळे तापलेले वातावरण, वर्षानुवर्षांचे हेवेदावे, कुरघोडीचे राजकारण… सगळं काही बाजूला ठेवून राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, आमदार, खासदार, विधानसभा निवडणुकीतील उमेदवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बुधवारी (दि.३०) एकत्रितपणे दिवाळी फराळाचा मनमुराद आनंद घेतला. राजकारणात एकमेकांचे विरोधक तसेच प्रतिस्पर्धी उमेदवारांनी गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. खेळीमेळीचे हास्यविनोदी वातावरण व धमाल किश्श्यांमुळे जवळपास चार तास गप्पांची मैफल रंगली. दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने यंदा आठव्या वर्षी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले. वाकड येथील हॉटेल बर्ड व्हॅलीत झालेल्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिशा फाउंडेशन आयोजित दिवाळी फराळाच्या या कार्यक्रमानिमित्त खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पिंपरी – चिंचवड शहरात सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. बुधवारी (ता. ३०)) वाकड येथील दिशा फौंडेशन आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमात डॉ कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधत राजकीय फटकेबाजी केली. सलग दोन दिवस खासदार अमोल कोल्हे चिंचवड मतदारसंघात आहेत. आजच्या कार्यक्रमाला त्यांनी दिलेला वेळ बघता त्यांचे मित्र आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी राजकीय डिप्लोमसीची संधी कोल्हे यांनी साधली अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. योगायोग असा की डॉ कोल्हे यांचा पिंपरी चिंचवडमधील पहिला कार्यक्रम २००९ साली दिशा सोशल…
कचरा डेपोच्या लढ्याला यश मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आमदार अश्विनी जगताप यांचे आभार शंकर जगताप यांना विधानसभेत पाठवण्याचा पुनावळे ग्रामस्थांचा निर्धार चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनीताई यांच्या माध्यमातून पुनावळे गावच्या विकासासाठी व गावातील समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या आमदार निधीमधून गावात अनेक विकासकामे वेगाने झाली. पुढील पिढीला आपल्या पुनावळे गावचा अभिमान वाटला पाहिजे, अशा पद्धतीने विकासाचा वेग वाढविण्यात येईल, अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी दिली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी प्रचारानिमित्त आज पुनावळे गावचा दौरा केला. यावेळी ग्रामदैवत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी चिंचवड विधानसभेतील अपक्ष उमेदवार नाना काटे यांना शुभेच्छा दिल्या. अपक्ष उमेदवार नाना काटे यांनी आज माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी नखाते यांनी त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन ही केलं. माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, संतोष कोकणे, राज तापकीर आदी यावेळी उपस्थित होते. नखाते यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी करत जगतापांच्या घराणेशाहीला विरोध केला होता. आज नाना काटे आणि चंद्रकांत नखाते यांच्यात झालेल्या सदिच्छा भेटीने चिंचवड मध्ये नवीन चर्चा रंगल्या आहेत.
धान्याची उचल व वितरण सुरळीत होऊन शिधापत्रिकाधारकापर्यंत वेळेत पोहोचणार.. अन्यथा दुकानदार पुन्हा आंदोलनाच्या तयारीत… मुंबई (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यभरात स्वस्त धान्य दुकानदारांनी दिवाळी दिवशी म्हणजेच ०१ नोव्हेंबर पासून पुकारलेल्या आंदोलनाला तात्पुरत्या स्वरुपात स्थगित दिली आहे. काही काळासाठी त्यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. याबाबतची माहिती ऑल महाराष्ट्र फेयर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन, पुणे, अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, ” स्वस्त धान्य दुकानदारांच्या मार्जिन वाढ यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी दुकानदारांनी शुक्रवार दि १ नोव्हेंबर २०२४ पासून राज्यात धान्याची उचल व वितरण न करण्याची भूमिका घेतली होती.…
समिती ॲक्शन मोडवर,आचारसंहिता संपल्यानंतर बैठकीचे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरात प्रथमच पथविक्रेता समिती पदासाठी निवडणूक घेण्यात आली यामध्ये महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघाचे पॅनल बहुमताने निवडून आले या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सत्कार करून कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समिती सदस्यांनी कामकाज सुरू करण्याची मागणी यावेळी केली. महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघतर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वातील पॅनल पिंपरी चिंचवड महानगरपालिका पथविक्रेता समिती सदस्यपदी बहुमताने निवडून आले याबद्दल पॅनल प्रमुख काशिनाथ नखाते,सदस्य राजू बिराजदार, सदस्य किरण साडेकर,सदस्य प्रल्हाद कांबळे,सदस्य किसन भोसले, सदस्य अलका रोकडे,सदस्य…
तुतारी वाजणार, बदल घडणार भोसरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी विधानसभेने, तसेच येथील नागरिकांनी गेल्या १० वर्षांमध्ये जे भोगले त्याची परतफेड करण्यासाठी जनता आतूर आहे. अजित गव्हाणे यांच्या रुपांत शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व मिळणार आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात “तुतारी वाजणार आणि बदल घडणार” असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिली आहे. अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांनी कोपरा सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार निलेश लंके म्हणाले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )– २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक जनरल निरीक्षक म्हणून मा.मन्वेशसिंग सिध्दू (भा.प्र.से) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अर्चना यादव यांनी दिली. सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या मा.मन्वेशसिंग सिध्दू (भा.प्र.से) निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, क्वीन्सगार्डन रोड, ट्राफिक पोलीस चौक पुणे असा आहे. संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९२७००५१२०६ हा असून दूरध्वनी क्रमांक ०२०-२९५१४८८६ असा आहे. तसेच निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी श्री. मुकुंद पवार असून त्यांचा संपर्क क्रमांक ८००७२००५८५ असा आहे. जनरल निरीक्षक पिंपरी विधानसभा मतदार संघ यांना व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, पुणे येथे भेटण्याची वेळ सकाळी…
: रॅलीत युवकांचा लक्षणीय सहभाग वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी मंगळवारी (ता. २९) जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार अमोल कोल्हे, अखिल भारतीय काँग्रेस कमीटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, सुनिल गव्हाणे, माजी नगरसेवक नवनाथ जगताप, मच्छिन्द्र तापकीर, संपत पवार, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष इम्रान शेख, यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाचे दर्शन घेऊन रॅलीचा प्रारंभ झाला. सुवासिनींनी औक्षण केले. फटाक्यांची आतषबाजी, फुलांची…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी समर्थकांनी विजयाची हॅट्रिक करण्याचा निर्धार केला. मंगळवारी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज आणि प्रमुख मंदिरांमध्ये दर्शन घेउन पदयात्रेला सुरवात करण्यात आली. बापुजी बुआ चौक – लांडगे लिंबाजी तालिम मित्र मंडळ – भैरवनाथ मंदिर- मारुती मंदिर – पीएमटी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पाहार घालून अभिवादन – संत तुकाराम मंगल कार्यालय येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी-आरपीआय-मित्र पक्ष महायुतीच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघातून आमदार महेश लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.…
