- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
बंडखोरी शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुती मधील घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांनी अर्ज कायम ठेवले आहेत. बंडखोरी शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले. मात्र नाना काटेंनी माघार न घेतल्याचे सांगितले आहे. यावरून काटे बंडखोरी कायम ठेवणार असल्याचे सध्यातरी दिसते आहे. काटे म्हणाले, दिवाळी निमित्त अजितदादांनी मला फोन केला भेटून जाईल असे सांगितले होते. त्यांनी मला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अपक्ष अर्ज मागे घेण्याबाबत काही चर्चा झाली नाही. चिंचवडमध्ये भाजपचा महायुतीचा उमेदवार आहे. त्याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा…
निवडणूक विभागाने सुलक्षणा धर यांचा हरकत अर्ज फेटाळला पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आपण कोणतीही माहिती शपथपत्रातून दडवली नाही. ज्या कागदपत्रांचा वापर करून निवडणूक विभागाकडे हरकत नोंदवली जात आहे, ती फार पूर्वीची असून संबंधित संस्थेवरून आपण यापूर्वीच राजीनामा दिला असल्याचे महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा धर यांनी निवडणूक विभागाकडे नोंदविलेल्या हरकतीचे महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी खंडन केले. धर यांनी निवडणूक विभागाकडे सादर केलेली माहिती खूप जुनी असल्याचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले. अण्णा बनसोडे म्हणाले, “चिखली येथील सिद्धार्थ मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदाचा मी मागील काही वर्षांपूर्वी राजीनामा दिला आहे. त्यानंतर…
पदयात्रा काढून घेतल्या कार्यकर्त्यांच्या घरी भेटीगाठी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी बुधवारी (दि. 30) प्रचाराचा शुभारंभ केला. बोपखेल येथील ग्रामदैवत बापूजी बुवा मंदिरात बनसोडे यांनी प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडला. त्यानंतर त्यांनी बौद्ध विहारला भेट देऊन बोपखेल मध्ये पदयात्रा काढली. महायुतीचे उमेदवार म्हणून अण्णा बनसोडे यांनी 28 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर लगेच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. बोपखेल गावापासून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. प्रचार शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी उपमहापौर नानी घुले, चेतन घुले, भाऊसाहेब सुपे, संजय अवसरमल, रवींद्र…
आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांची माहिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आरपीआय (आठवले) पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्यासोबत आहे. पक्षातील नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असून पुढील काळात त्याला यश येईल. यामुळे अण्णा बनसोडे यांच्या मताधिक्यामध्ये वाढ होईल असे आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी सांगितले. आरपीआय (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांना बनसोडे यांची भेट घेतली. यावेळी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कुणाल वाव्हळकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती जकाते, माजी अध्यक्ष सुरेश निकाळजे, जनरल सेक्रेटरी दयानंद वाघमारे, उप जनरल सेक्रेटरी बाबा सरवदे यांच्यासह आरपीआयचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कुणाल वाव्हळकर म्हणाले,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’ अशा घोषणा देत मते मागितली जात आहेत. मात्र प्रभू श्रीराम, व हिंदू देवदैवतांची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला राम कृष्णाचे नाव घेण्याचाही अधिकार नाही असा टोला माजी महापौर व आमदार महेशदादा लांडगे यांचे कट्टर समर्थक राहुल जाधव यांनी हाणला आहे. भोसरीतील प्रचार रंगात आला आहे. महाविकास आघाडी च्या वतीने या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असे म्हणत मते मागितली जात आहेत. माजी महापौर राहुल जाधव…
मतदान प्रक्रिया सुलभपणे पार पडण्यासाठी मतदान केंद्रावर सोयी सुविधा उपलब्ध करून देणार : आयुक्त शेखर सिंह पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मतदानाच्या दिवशी मतदारांना सहज व सुलभपणे मतदान करता यावे, तसेच त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शहरातील सर्व मतदान केंद्रावर महापालिकेच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यासह शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याअनुषंगाने शहरातील तिन्ही मतदार संघातील विविध मतदान केंद्रांची पाहणी आयुक्त शेखर सिंह यांनी केली, त्यावेळी ते बोलत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग क्षेत्रीय कार्यालय, तिसरा मजला, थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये विहित मुदतीत ३२ उमेदवारांनी ४४ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. या नामनिर्देशन पत्रांची आज छाननी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी यावेळी वैध आणि अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची घोषणा केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने दाखल केलेल्या ४४ नामनिर्देशन अर्जांपैकी ३९ अर्ज वैध ठरले आहेत व ५ अर्ज अवैध ठरले आहेत. ४४ नामनिर्देशन पत्रे ३२ उमेदवारांनी दाखल केले होते. त्यापैकी ४ उमेदवारांची उमेदवारी अवैध ठरली आहे. वैध उमेदवारांची यादी :- रफिक रशिद कुरेशी, सचिन वसंत सोनकांबळे, सचिन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – तत्कालीन आयुक्तपदी दिलीप बंड असताना व स्वतः अजित गव्हाणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी शहरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखविले त्यासाठी मीटर प्रमाणे पाणी देणे सुरू केले. मात्र खऱ्या अर्थाने भाजपनेच शहरवासीयांना २४ तास पाणी मिळावे या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. अमृत योजना अंतर्गत पाईपलाईन, कनेक्शन बदलणे, आंद्रा मधून शंभर एमएलडी पाणी, भामा आसखेड मधून २०० एमएलडी पाणी आणण्यासाठी वेगाने सुरू असलेली कामे हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे २४ तास पाणीपुरवठ्यासाठी केवळ घोषणा केलेल्या नेत्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये, असा टोला भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांनी हाणला आहे…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये विरोधकांची अवस्था अगदी केविलवाणी झाली आहे. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही विषय राहिलेले नाहीत. त्यामुळे ते बेसुर झाले आहेत. सत्ताधारी आमदारांवर आरोप करण्यासाठी कोणताही विषय ठोस नाही. म्हणून बॅनर लावून टीका करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. “दिवा विझताना जशी फडफड होते” अगदी तशीच विरोधकांची अवस्था झाली असल्याची टीका शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात शिवसैनिकांकडून करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने महायुती तर्फे भाजपचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपनेते इरफान सय्यद, संभाजी शिरसाठ, मनीषा फुंदे, उपजिल्हाप्रमुख अरुण जोगदंड, संदीप क्षीरसागर ,सागर पाचारणे,…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “कविता बंधमुक्त असावी!” असे प्रतिपादन हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे सचिव आणि ज्येष्ठ प्रवचनकार उत्तम दंडिमे यांनी आर्य समाज ग्रंथालय, पिंपरी कॅम्प येथे मंगळवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी केले. शब्दधन काव्यमंचच्या माध्यमातून पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज ग्रंथालय व मोफत वाचनालयात आयोजित केलेल्या दिवाळी माध्यान्ह या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उत्तम दंडिमे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे, शब्दधनचे सचिव ज्येष्ठ साहित्यिक तानाजी एकोंडे, कवयित्री फुलवती जगताप, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, लेखक नारायण कुंभार, सत्संग परिवारातील रमेश पाटील, विधिज्ञ अंतरा देशपांडे, ज्येष्ठ कवी कैलास भैरट यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे तीस कवींनी कविसंमेलनात…
