Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दरवर्षीप्रमाणे ( ०७ वे वर्ष ) या वर्षीही आमचे गांव खुंटेफळ ( वाटेफळ ) येथे दिवाळी निमित्ताने संपूर्ण गावामध्ये घरोघरी जावून प्रत्येक कुटुंबास दिवाळीच्या खूप खूप शुभेछ्या दिल्या व छोटीशी भेट म्हणून मिठाई वाटप केले. या प्रसंगी मी व कुमार – अर्जुन मोढवे पाटील , भूषण मोढवे पाटील , आर्यन अमृते , आदित्य वाळके , सोहम वाळके , दादा वाळके ,  केशव साठे उपस्थित होते.

Read More

मातंग समाजाला दिशा देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे : आ. अमित गोरखे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – समाजाला प्रगती करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. समाजाने एकत्र येऊन त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे. आज आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी दिशा देण्याच्या चळवळीत सर्वांनी पुढे यावे. समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने विविध घटकांशी लवकरच संवाद साधणार आहोत, येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे काम सर्वांनी जोमात करावे असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी येथे केले. दीपावलीनिमित्त महाराष्ट्रातील समाजाच्या प्रमूख कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आज पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात संपन्न झाला. आ. गोरखे म्हणाले, “राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या वर्गीकरणात तातडीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन…

Read More

पिंपळे सौदागर वासियांनी लुटला विविध गीतांचा आनंद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आली माझ्या घरी ही दिवाळी…, पाहिले न मी तूला…, दिन दिन दिवाळी… गाई म्हशी ओवाळी… यासह मराठी आणि हिंदी चित्रपटातील अस्सल गीतांनी उन्नती सोशल फाउंडेशनची दिवाळी पहाट सुरमई ठरली. उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथील पिके इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात शनिवारी (दि. 2) स्वरामृत दिवाळी पहाट उत्साहात पार पडली. तर, रविवारी (दि 3) सायंकाळी स्वरामृत दिवाळी संध्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. यावेळी शंकरशेठ जगताप, आमदार अश्विनीताई जगताप, विजयभाऊ जगताप, बाप्पू काटे, निर्मला कुटे, जयनाथ काटे, जगन्नाथआप्पा काटे, मल्हारी कुटे, बाळासाहेब काटे, विजय भिसे, राजू भिसे, भानुदास…

Read More

बाबा कांबळे यांनी घेतला उमेदवारी अर्ज माघारी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बाबा कांबळे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोमवारी (दि. 4) त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत आमदार बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला. आपण ज्या मागण्यांसाठी लढत आहोत त्या पूर्ण करण्याची ग्वाही महायुतीमधील नेत्यांनी दिल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले. बाबा कांबळे म्हणाले, मी गेली 25 वर्षांपासून गोर गरिब कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी काम करत आहे. रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन…

Read More

-विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ- अजित गव्हाणे – काकड आरती घेत विठ्ठल मंदिरात नागरिकांशी संवाद भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  नेहरूनगर, पिंपरी येथील विठ्ठल नगर पुनर्वसन प्रकल्पातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने रविवारी (दि.3) भल्या पहाटेच महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून विठ्ठल नगर पुनर्वसन प्रकल्पातील समस्या आगामी काळात मार्गी लावणार असल्याचे गव्हाणे यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीतर्फे भोसरी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी रविवारी काकड आरतीच्या निमित्ताने नेहरूनगर विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये काकड आरती घेतली. यानंतर त्यांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चार महिन्यापूर्वी गावातील मंडळींनी भोसरी विधानसभेतील चित्र बदलले पाहिजे असा विचार मांडला. गेल्या दहा वर्षात भोसरी मतदारसंघात अत्यंत वाईट परिस्थिती उद्भवली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे. नाथ साहेबांनी कौल दिला असून परिवर्तन होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभेचे आमदार होणार आहेत की काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे असा विश्वास माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ (दि.4) भोसरीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत माजी आमदार विलास लांडे बोलत…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी गावाला मोठा इतिहास आहे. येथील राजकारणाला समाजकारणाची जोड आहे. माझ्या कुटुंबाने भोसरी गावासाठी मोठे बलिदान दिलेले आहे.भोसरी ग्रामस्थांचे अनुकरण आजूबाजूची गावे करतात. गावातूनच जर बंडखोरीचे निशान फडकले गेले तर याचा संदेश वेगळा जाऊ शकतो. गावचे गावपण टिकावे हाच आम्हा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. ज्याच्यासाठी पुढाकार घेत माघार घेतली. ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये सर्वांच्या साक्षीने आपण एकत्र येऊन अजित गव्हाणे यांची पाठीशी उभे राहत आहोत हा संदेश आपल्या विजयाची नांदी ठरेल असा विश्वास शिवसेनेचे (उबाठा) रवी लांडगे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात कोअर समितीचे सर्व सदस्य, सर्व जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्हाकार्यकारी अध्यक्ष या शहराच्या राजकीय दृष्टीने महत्वाची जबाबदारी असणाऱ्या पदावर निवड झाल्यानंतर शत्रुघ्न (बापू) काटे हे प्रथमच भाजपा शहर कार्यालयात आले होते यावेळी शत्रुघ्न काटे यांचे शहर भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कोअर समितीच्या सर्व सदस्यांनी हार व पुस्तक देऊन शत्रुघ्न (बापू) काटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार अमर साबळे, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्या आमदार उमा खापरे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संभाजी ब्रिगेड ,छावा मराठा युवा संघ ,जिजाऊ ब्रिगेड ,छावा संघटना, आणि आमची मेन कोर कमिटी कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत लवकरच भूमिका घेणार मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अरुण पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, कुणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले. हजारो चिंचवडकराच्या साक्षीने सामाजिक कार्यकर्ते तथा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी व समर्थक अरुण पवार यांनी भव्य रॅली द्वारे शक्तीप्रदर्शन करीत आपला…

Read More

अखेर चिंचवडमध्ये तिरंगी लढत नाना काटे यांचा अर्ज मागे तिरंगी लढतीत भोईरांना फायदा चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचे लक्ष लागलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात अखेर तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून आता खरी लढत ही महायुतीचे उमेदवार शंकर जगताप आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्यात होणार आहे. गेल्या एका महिन्यापासून निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या बरोबरीने भाऊसाहेब भोईर यांनी संपूर्ण चिंचवड मतदार संघ पिंजून काढला असून आतापर्यंत त्यांनी चिंचवड मतदार संघातील एक लाख पेक्षा अधिक लोकांना त्यांनी संपर्क साधला आहे. त्यामुळे सध्या भोईर यांचे पारडे जड झाले असून त्यांना त्याचा निश्चित फायदा होणार आहे.…

Read More