Author: maharashtrabreakingnews.com

– ‘चिखली-मोशी- चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ चा विकास पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमदार महेशदादा लांडगे यांनी समाविष्ट गावांचा प्रचंड कायापालट केला आहे. या गावांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. १० वर्षांपूर्वीची गावे आणि आत्ताची गावे याची तुलना केली, तर आमदार लांडगे यांनी समाविष्ट गावांचा केलेला विकास डोळ्यात भरतो, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर नितीन काळजे यांनी माध्यमांशी बोलताना केले. माजी महापौर नितीन काळजे म्हणाले की, १० वर्षांपूर्वी समाविष्ट गावे विकासापासून वंचित होती. एकही आरक्षण विकसित झाले नव्हते. २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून नवीन गावांमध्ये विकासाची अनेक कामे करण्यात आली. विकास आराखड्यातील रस्ते झाले. च-होली, डुडुळगाव या भागात…

Read More

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा शुभारंभ वाकडमधूनच करणार- शंकर जगताप * म्हातोबाच्या चरणी लीन होऊन विजयासाठी घेतला आशीर्वाद ! – वाकडकरांच्या प्रेमळ स्वागताने भारावले शंकर जगताप ! – ते आले..त्यांनी पहिलं .. आणि त्यांनी जिंकलं – सेल्फी, हस्तांदोलन, शुभेच्छांनी वाढला प्रचारफेरीचा उत्साह ! चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वाकड म्हातोबा देवस्थानच्या आशीर्वादाने आणि वाकडवासीयांच्या भरघोस पाठिंब्याने आपण नक्कीच निवडून येणार. त्यानंतर विकासकामांची सुरुवात वाकडच्या म्हातोबा देवस्थान पासूनच करणार, अशी ग्वाही चिंचवड विधानसभा मतदार संघाचे शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी दिले. वाकड गावात प्रचार दौऱ्यात म्हातोबा चरणी लीन होवून मनोभावे माथा टेकवून त्यांनी विजयासाठी आशीर्वाद घेतला.…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहर हे वेगाने वाढणारे शहर आहे. या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण शहरासाठी आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी दिले. आणि आता भामा आसखेड धरणातून १६० एमएलडी पाणी योजनेचे भूमिपूजन केले आहे. एवढ्या पाण्याने शहराची तहान भागणार नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या धरणातून शहराला पाणी आणण्यासाठी उपाययोजना करू. मी या शहराला पाणी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाकड येथील सभेत दिले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी मतदार संघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन बुधवारी दापोडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यानंतर आमदार बनसोडे यांच्या प्रचारार्थ दापोडीत भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. बुधवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने व महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पिंपरी विधानसभेचा जाहीरनामा ऑनलाइन पद्धतीने प्रकाशित करण्यात आला. पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतिचे अधिकृत उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ फिरंगाई देवीचे दर्शन घेऊन दापोडी गावातून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात…

Read More

सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी सांगवी येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करत प्रचाराचे रणशिंग फुंकले. या प्रसंगी सांगवीतील महिलांनी भाऊसाहेबांचे औक्षण करून त्यांचे मोठ्या मनाने स्वागत केले. त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून नागरिकांच्या समस्यांना जाणून घेत पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी सांगवीतील नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाऊसाहेबांनी सांगवीतील नागरिकांशी संवाद साधत, नागरिकांच्या भेटीगाठी केल्या. त्याच बरोबर त्यांनी सांगावी परिसरातील राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. सांगवी परिसरात प्रचारा दरम्यान नागरिकांनी आणि महिला भगिनींनी भाऊसाहेब भोईर यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर मतदारांच्या घरी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखलीत संतपीठ, टाऊन हॉल विकसित केला. देहू-आळंदीला जोडणारा समांतर रस्ता, चिखली आकुर्डी 18 मीटरचा रस्ता विकसित होत आहे. यामुळे चिखली परिसराचा कायापालट होत असून, ही कामे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच झाली आहेत. त्यामुळे आम्ही महेशदादांसोबत असल्याची ग्वाही चिखली, कुदळवाडीतील नागरिकांनी दिली. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या आपुलकीच्या गाठीभेटींना चिखली, कुदळवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी ठिकठिकाणी आमदार लांडगे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, उपमहापौर शरद बो-हाडे यांच्यासह ग्रामस्थ महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड मधील तीनही आमदारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये आता पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले व महायुतीवर त्यांनी घणाघाती हल्ले चढवले. पिंपरी विधानसभा मतदार संघात महा विकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. या संवाद मेळाव्यास शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क नेते आमदार सचिन आहेर हेही उपस्थित होते. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, ही निवडणूक केवळ विधानसभेची नाही, तर महाराष्ट्र यापुढे…

Read More

राम कृष्ण हरी वाजवा तुतारी घोषणांनी संत तुकाराम नगर दुमदुमले पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांच्या रॅलीने पिंपरी विधानसभा मतदारसंघात आता बदल अटळ आहे हे उस्फुर्त मतदारांनी दाखवून दिले. डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ आज पंचशील बुद्ध विहार संत तुकाराम नगर येथून झाला यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. संत तुकाराम नगर मधील मतदारांनी यावेळी उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचे उस्फुर्त स्वागत केले. ही रॅली…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरीतील माजी नगरसेविका सारिका संतोष लांडगे व संतोष लांडगे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये सारिका लांडगे यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हा भाजप आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांना मोठा धक्का मानला जात आहे. भोसरीचा गड या पंचवार्षिकमध्ये ढासळताना पाहायला मिळत आहे. यापूर्वी भाजपचे लक्ष्मण सस्ते, भिमाबाई फुगे आणि आता सारिका लांडगे यांच्या माध्यमातून भाजपला मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. सारिका संतोष लांडगे यांनी बुधवारी यमुनानगर निगडी येथे महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लोकसभेमध्ये आपण रात्री रात्री बँकांच्या शाखा उघड्या ठेवून काय झाले ते पाहिले. आता मला नवीनच माहिती मिळाली की भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या ‘डिजिटल इंडिया’चा चांगलाच प्रचार सुरू आहे. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा झाल्यानंतर आता भाजपकडून या मतदारसंघात ‘डिजिटल लक्ष्मी दर्शन’ सुरू असून याच्या विरोधात आता आपला आवाज एकजुटीने वाढवला पाहिजे असे शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा) काँग्रेस तसेच इतर घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ यमुना नगर निगडी येथे (दि .6)मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ अमोल कोल्हे बोलत…

Read More