Author: maharashtrabreakingnews.com

 भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमचा संघर्ष वैयक्तिक नाही. महागाई, बेरोजगारी, अधिकार आणि भ्रष्टाचार या विरोधात आमची लढाई आहे. तळेगावात आलेला फॉक्सकॉन प्रकल्प भाजपने ओढून नेला. सहा लाख नोकऱ्या या भागातल्या मुलांना मिळणार होत्या. आमच्या मुलांच्या सहा लाख नोकऱ्या तुम्ही खाल्ल्या, तुम्हाला घालवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. पंधराशे रुपये देऊन दाम दुपटीने महागाई करणाऱ्या सरकारला महिला शक्तीच घरी बसवणार आहे असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे सोमवारी (दि.11) महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – निवडणुकीआधीच अवसान गळालेल्या ठाकरे-पवारांच्या नेतृत्त्वात मविआला जबरदस्त धक्का बसला असून, विरोधी उमेदवाराचे कंबरडेच मोडल्यात जमा आहे. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले आणि ‘बेरजेचे’च्या राजकारणासाठी माहीर असलेले माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आता मविआतून ‘वजा’ झाल्याने या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी मोरेश्वर भोंडवे हे मतांचा ‘गुणाकार’ करणार हे नक्की. भोंडवे यांच्या खेळीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. थोडक्यात, याचा राजकीय फायदा उठवत मोरेश्वर भोंडवेंनी आता शंकर जगतापांना एक लाखाच्या ‘लीड’ने विधानसभेत पाठविण्याचा चंग बांधला आहे. परिणामी, चिंचवड मतदारसंघात जगताप-भोंडवे यांच्यातील दिलजमाईमुळे महाविकास आघाडीच्या बड्या-बड्या नेत्यांची झोप उडणार आहे. चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप…

Read More

– गाठीभेटी, सोसायटीधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाविकास आघाडी सरकारच्या सत्ताकाळात अंमलबजाणी सुरू झालेला सोसायटीधारकांवरील कचरा उपयोगकर्ता शुल्क वसुलीला आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच स्थगिती मिळाली. सोसायटीधारकांचे १६५ कोटी रुपयांचे ओझे कमी झाले. बिल्डरसोबत संवाद साधून आमच्या समस्या सोडविल्या. सोसायटीधारकाच्या कोणत्याही समस्येसाठी आमदार लांडगे धावून येतात. त्यामुळे आमचा पाठींबा आमदार महेश दादा लांडगे यांनाच असल्याची ग्वाही चिखली, मोशी परिसरातील सोसायटीधारकांनी दिली. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी चिखली, मोशी परिसरातील सर्व गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकाऱ्यांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. आमच्या समस्यांसाठी मदतीला धावून येणाऱ्या महेश लांडगे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची…

Read More

शंकर जगताप यांच्या विक्रमी विजयाचा व्यक्त केला विश्वास पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांना अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष हनुमंत सुतार यांनी जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. शंकर जगताप यांना शहरातील विविध सामाजिक संघटनांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी ५२ टक्के समाजाची सामाजिक संघटना असून, यामध्ये कर्मचारी आघाडी, विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी तसेच शेतकरी आघाडी व ऑल इंडिया गोर बंजारा समाज संघटना यांचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या यामध्ये प्रामुख्याने विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांची त्यांनी भेट घेतली या भेटीदरम्यान आपल्याला विधान परिषद मिळाल्यामुळे आमच्या उमेदवारांचा पिंपरी विधानसभेच्या विजयाचा मार्ग हा सुखकर झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. दरम्यान आमदार अमित गोरखे यांची पिंपरी विधानसभेच्या 398 बुथ वरती असणारी पकड सोबतच पिंपरी विधानसभेमधील सर्वच प्रभागांमध्ये असणारा दांडगा जनसंपर्क हा उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या विजयासाठी लावून सर्वतोपरी अण्णा बनसोडे यांना विजयी करण्यासाठी आपण प्रयत्न करावे असे या भेटीदरम्यान पार्थ पवार हे म्हणाले. पिंपरीमधील सध्याची परिस्थिती त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये काय…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभेचे दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्या झंझावाती विकासकामांमुळे येथील मतदार समाधानी आहेत. त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी महत्वाची विकासकामे मार्गी लावले आहेत. त्यामुळे भोसरीसह निगडी प्रभाग क्रमांक १३ आणि समाविष्ट गावांचा मोठा विकास झाला आहे. मोठमोठे प्रकल्प या मतदार संघात त्यांच्यामुळेच आले. काही पूर्ण झाले तर, काही प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे भोसरी मतदारसंघाचा खरोखरच चेहरामोहरा बदलून गेला आहे. त्यामुळे ते सलग तिसऱ्यांदा लाखोंच्या मताधिक्क्याने भोसरी विधानसभेचे आमदार होतील, असा आशावाद शहर भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे. पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शांत, संयमी आणि ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ यांच्या पुढाकारातून आपण चिंचवडचा ‘न भूतो न भविष्यती’ असा विकास करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल टाकले होते. शंकर जगताप हेदेखील लक्ष्मणभाऊ यांच्याप्रमाणेच विकासाचे स्मार्ट व्हिजन असणारे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या चिंचवड विधानसभेच्या स्मार्ट विकासासाठी स्मार्ट व्हिजन असणाऱ्या शंकर जगताप यांना साथ देऊन विधानसभेत पाठवावे, असे आवाहन आमदार अश्विनी जगताप यांनी थेरगाववासीयांना केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी थेरगाव येथील ग्रामस्थ आणि नागरिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. यावेळी माजी उपमहापौर…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरात विखुरलेल्या समस्त सिरवी समाजाच्या सुख-दुःखामध्ये सदैव साथ देणाऱ्या अजित गव्हाणे यांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा आहे असे सिरवी समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले. या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करतानाच सिरवी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले. नेहरूनगर येथे माजी विरोधी पक्ष नेते राहुल भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयात रविवारी (दि.10) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सिरवी समाजाच्या वतीने महाविकास आघाडी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी माजी महापौर हनुमंत भोसले, विरोधी पक्ष नेते राहुल भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात जवळपास एक लाखापेक्षा अधिक मतदारांची भर पडली आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांना मूलभूत सुविधा निर्माण करून देण्यावर मी भर देणार आहे. या मूलभूत सुविधा मिळाल्या तरच खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही; असा विश्वास महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी दिले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांचा रावेत – किवळे, मामुर्डी परिसरात जोरदार प्रचार दौरा संपन्न झाला. या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागोजागी फुलांच्या वर्षावात आणि फटाक्यांची…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ नेहरूनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा या परिसरामध्ये रविवारी (दि.10) काढलेल्या प्रचार दौऱ्याला उच्चांकी प्रतिसाद मिळाला. रविवारी काढलेल्या या प्रचार दौऱ्याने आत्तापर्यंतच्या सर्व गर्दीचे अक्षरशः रेकॉर्ड मोडले. माजी महापौर हनुमंत भोसले यांनी नेहरूनगर मधून सर्वाधिक “लीड” अजित गव्हाणे यांना मिळवून देणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी माजी महापौर वैशाली घोडेकर,विरोधी पक्षनेते राहुल भोसले , माजी नगरसेवक समीर मासुळकर तसेच  नेहरूनगर , मासुळकर कॉलनी, अजमेरा परिसरातील पक्षाचे आजी माझी पदाधिकारी,ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होत्या. माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून…

Read More