Author: maharashtrabreakingnews.com

रिक्षा परवाना स्थगितीचे स्वागत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील रिक्षा चालकांसाठी २०१७ पासून मुक्त परवाना देण्यात येत होता मात्र याची संख्या इतकी वाढली की वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा प्रशासनाला शक्य होत नव्हते, नोकरी करणाऱ्यानी सुद्धा हे परवाने घेतलेले होते. रिक्षा चालकांच्या संघटनाकडून यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत होती याला यश आलेले असून आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा खुले परवाने देण्यास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाच्या आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्यातील खूले नवीन रिक्षा परवाने देण्यास आज ९ मार्चपासून देण्यास…

Read More

१४ वर्षांच्या मुलींसाठी सर्व पिं. चिं महापालिका रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारतर्फे महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी एचपीव्ही लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नवीन सांगवी रुग्णालयात सदर मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये २४ लाभार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. महापौर रवी लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये १४ वर्षे पूर्ण पण १५ वर्षांखालील मुलींसाठी…

Read More

विविध कार्यक्रमांद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या आरोग्याकडे आणि वैयक्तिक आयुष्याकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कामाच्या धकाधकीत अनेकदा महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात, मात्र निरोगी शरीर आणि सकारात्मक मन असेल तरच त्या कुटुंब, समाज आणि कार्यस्थळी अधिक सक्षमपणे योगदान देऊ शकतात. त्यामुळे महिलांनी आपल्या दैनंदिन दिनक्रमात आरोग्याची काळजी घेणे, नियमित व्यायाम करणे आणि मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिलेने दिवसातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी राखून ठेवत आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवावा. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी ऊर्जा…

Read More

महापौरांचे क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठकांचे सत्र सुरु; आज त्यांनी घेतला अ क्षेत्रीय कार्यालयातील विविध विभागांचा सविस्तर आढावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रभागांमधील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देत अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई करणे, कचरा संकलन, नालेसफाई तसेच रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय वाढवून नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अतिक्रमण, कचरा संकलन, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची नियमित साफसफाई,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तापमानामुळे उष्मालाटेचा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेमुळे होणारे आजार आणि उष्माघात टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी दिवसातून पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली तरीही ठराविक वेळाने पाणी घेत राहावे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करावा. विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. हलकी व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत तसेच प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, असेही सूचित करण्यात आले आहे. उन्हात काम करणाऱ्या नागरिकांनी टोपी, छत्री…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – ओम साई या संस्थेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध क्षेत्रातील ४५ महिलांनी याचा लाभ घेतला. सहली दरम्यान महिलांचा सत्कार करतांना या सहलीच्या आयोजका नेहा कुलकर्णी म्हणाल्या, “आमच्या दृष्टीने प्रत्येक महिलेचे आपले एक विश्व असते. आणि ती त्या विश्वाची जन्मदात्री असते. म्हणून प्रत्येक महिला सत्कारास पात्र आहे.”या प्रसंगी ४५ महिलांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना रजनी अहेरराव म्हणाल्या, “स्त्रि म्हणजे निसर्गाची सर्वांग सुंदर निर्मिती आहे. समाजाने कितीही बंधने घातली, तरी तिने स्वतःचा मार्ग तयार करून एक वेगळी वाटचाल केली आहे.” उज्जला केळकर, मिसेस चटर्जी वर्सेस…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आखाती देशातील युद्ध थांबवावे व जगात शांतता नांदावी या करीता संत तुकाराम नगर येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली “जागतिक शांतता” आवाहन रॅली संपन्न झाली.त्यांनी संत तुकाराम महाराज हॉल येथे श्रमिकांना संबोधित केले.या रॅलीमध्ये शेकडो श्रमिक व पिंपरी चिंचवड वाशीय सहभागी झाले होते. रॅली वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. संत तुकाराम महाराज पुतळ्याचे दर्शन घेऊन रॅलीला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पंचशील बौद्ध विहारांमध्ये भगवान गौतम बुद्धांना वंदन करून पुढे श्री गणेश मंदिरात दर्शन घेतले.सर्व जाती धर्माच्या स्थळांना भेट देऊन जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. मृत्यू…

Read More

ज्ञानेश्वरी ग्रंथावर विधान प्रकरणी स्वामी गोविंददेवगिरी यांचा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी तर्फे निषेध आळंदी ( अर्जुन मेदनकर ) – आचार्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित ‘ज्ञानोबा ते तुकाराम’ या राष्ट्रीय परिषदेत केलेल्या विधानाचा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्या वतीने तीव्र निषेध करीत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेव महाराज, श्री संत एकनाथ महाराज आणि श्री संत तुकाराम यांच्या ग्रंथांमध्ये वाङ्मय हे ग्रंथ नाहीत, ते भाष्य व संकलन आहे, अशा आशयाचे विधान केल्याचा आरोप संस्थान कमिटीने केला आहे. आळंदी संस्थान कमिटीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,…

Read More

– नगरपरिषदेवरील आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीक्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या धार्मिक यात्रांसाठी आवश्यक खर्च वाढत असताना सध्याचे शासकीय अनुदान अपुरे पडत असल्याने ते वाढवण्याची मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी सविस्तर पत्र पाठवून आळंदी नगरपरिषदेवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे. आमदार लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे की, आळंदी नगरपरिषदेला सध्या यात्राकराच्या स्वरूपात केवळ १.६२ कोटी रुपयांचे अनुदान मिळते. मात्र, सन २०२३–२४ या कालावधीत यात्रेसाठी नगरपरिषदेला तब्बल २.७३ कोटी रुपयांचा खर्च करावा लागला. परिणामी, सुमारे…

Read More

नोंदणी झालेल्या सर्व रुग्णांना मिळणार नामांकित रुग्णालयात मोफत उपचार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा महाकुंभ असलेल्या ‘अटल महाआरोग्य शिबिराचा’ यंदाचा सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेल्या ११ वर्षांची गौरवशाली परंपरा कायम राखत, यावर्षी देखील रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे, या सर्व रुग्णांच्या पुढील उपचारांचा आणि शस्त्रक्रियांचा संपूर्ण खर्च शिबिराच्या माध्यमातून उचलला जाणार असल्याची ग्वाही आमदार शंकर जगताप यांनी दिली. अटल महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने समारोपाच्या प्रसंगी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार उमा खापरे,  तांत्रिक सेवा महाराष्ट्र राज्य,(सीआयडी) पोलिस अधीक्षक वैशाली माने, भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पक्षनेते प्रशांत शितोळे तसेच भाजप नगरसेवक,…

Read More