Author: maharashtrabreakingnews.com

रामदास आठवले यांचा आकुर्डी येथे कार्यकर्ता मेळावा पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे अत्यंत सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, अशा सूचना आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिल्या. आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी खासदार अमर साबळे, अजिज शेख, बाळासाहेब भागवत, चंद्रकांता सोनकांबळे, सुजाता पालांडे, सिकंदर सूर्यवंशी, राजेंद्र कांबळे, कमल कांबळे, विकास गाडे, इला ठोसर, अंकुश कानडे, दुर्गाप्पा देवकर, रामचंद्र माने, मारुती जकाते, दयानंद वाघमारे, रत्नमाला सावंत, नवनाथ डांगे, अंकुश कानडे आदी उपस्थित होते. महायुतीच्या पाठीमागे…

Read More

  चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने पिंपळे निलख, वाकड आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा नवा ‘पटर्न’ अंमलात आला. या पॅटर्नच्या माध्यमातून आमदार निधीतून कोट्यावधी रुपयांची विकासकामे आमच्या गावात झाली. आणि खऱ्या अर्थाने आमच्या गावाचे रुपडे बदलले. स्व. लक्ष्मणभाऊंनी सुरू केलेला हा विकासाचा पॅटर्न असाच अविरत सुरू राहण्यासाठी त्यांच्याप्रमाणेच विकासाची दूरदृष्टी असलेले त्यांचे बंधू आणि महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनाच आमचा जाहीर पाठींबा असून त्यांना गावातून हजारो मतांचे लीड आम्ही देणार असल्याचा विश्वास, पिंपळे निलख, वाकड ग्रामस्थांनी व्यक्त केला. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – अखिल भारत ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवडतर्फे चिंचवड विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा देण्यात आला आहे. महासंघाच्या वतीने पत्राद्वारे पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. याप्रसंगी अखिल भारत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, ब्रम्होद्योग प्रदेश उपाध्यक्ष राजन बुडूख, प्रदेश चिटणीस संजय परळीकर, कार्याध्यक्ष महेश बारसवडे, सरचिटणीस आनंद देशमुख, राहुल कुलकर्णी, शामकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष अतुल इनामदार, मकरंद कुलकर्णी, सचिव प्रवीण कुरबेट, महिला अध्यक्ष सुषमा वैद्य, कोषाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, पिं.चिं. ब्रम्होद्योग अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, ब्रम्ह उद्योजक आघाडी अध्यक्ष कार्तिक गोवर्धन, ऋजुता कुलकर्णी, पूर्वा बारसवडे आदी मान्यवर…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज सकाळच्या सत्रात पिंपळे सौदागर येथील नागरिकांच्या गाठीभेटी घेवून त्यांच्याशी मनमोकळेपणे सुसंवाद साधत नागरिकांच्या समस्या तसेच अडीअडचणी समजून घेतल्या. पिंपळे सौदागर वासियांना रोज भेडसावणारे प्रश्न त्याच बरोबर त्यांच्या मनातील भावना समजून घेवून त्यांच्याशी भोईर यांनी समाधानकारक चर्चा करून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असा पिंपळे सौदागर येथील नागरिकांना शाब्दिक आधार दिला. पिंपळे सौदागर येथील नागरिक म्हणाले की आम्ही पूर्ण ताकदीनिशी भाऊसाहेब भोईरांच्या पाठीशी असून आम्ही भोईर यांनी जाहीर  पाठिंबा दिला आहे.   या प्रसंगी भाऊसाहेब भोईर म्हणाले की सर्वधर्म समभाव आणि निक्षपाती भावना मनात…

Read More

कॅम्प मधील व्यापाऱ्यांचा अण्णा बनसोडे यांच्याबद्दल आपुलकीचा सुर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – व्यापाऱ्यांच्या कोणत्याही अडचणीमध्ये आमदार अण्णा बनसोडे कायम खंबीरपणे पाठीशी उभे राहतात. कोणत्याही व्यापाऱ्याला कधीही त्रास न दिलेला आमदार म्हणून त्यांची सर्व व्यापाऱ्यांमध्ये प्रतिमा आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्प मधील सर्व व्यापारी आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी आहेत. कॅम्प मधील व्यापाऱ्यांनी आमदार अण्णा बनसोडे यांच्याबद्दल आपुलकीचा सूर आवळला. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी बुधवारी (दि. 13) पिंपरी कॅम्प परिसरात प्रचार दौरा केला. लिंक रोड येथून पदयात्रेला सुरुवात झाली. देवी लिंक, पत्रा शेड, रमाबाई नगर, भाटनगर, बौद्ध नगर,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – व्यापारी किंवा सर्वसामान्य माणूस कोणालाही त्रास होईल असे चुकीचे कोणतेही काम मी केले नाही. व्यापारी व सर्वसामान्यांसाठी मी कायम तत्पर राहिलो. असे प्रतिपादन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी येथे केले. अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आज बुधवारी पिंपरी कॅम्प व पिंपरी गावात प्रचार फेरी काढण्यात आली. त्यावेळी पिंपरी कॅम्प मध्ये ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे, नाना काटे, संदीप वाघेरे, शैलेश मोरे, जयश्री गावडे, निकिता कदम, शितल शिंदे, कोमल मेवाणी, जगन्नाथ साबळे, अरुण टाक, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, युवा नेते बबलू सोनकर, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष संजय…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचे पिंपरी गाव परिसरात अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. मा विकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज पिंपरी गाव परिसरात आपली प्रचार फेरी आयोजित केली होती यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना नेते राजाराम कुदळे, स्थायी समितीच्या माजी सभापती उषाताई वाघेरे, काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते उमेश खंदारे, शिवसेनेचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश वाघेरे आबा खराडे, नचिकेत वाघेरे, आदित्य खराडे, किरण नढे, विजय ओव्हाळ, विनू गिल, प्रवीण कुदळे, रंगनाथ कापसे, महादेव वाळुंजकर, मनोज कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे संकट आल्यानंतर मोठ्या भावाप्रमाणे या शहरात आमच्या मदतीसाठी कोणी धावले असेल, तर ते आमदार महेश लांडगे होते. कोरोनातील त्यांचे सहकार्य आम्ही कधीच विसरू शकत नाही. आम्ही कुटुंबापासून लांब होतो. मात्र, त्यावेळी आमची कुटुंब प्रमाणे काळजी घेतल्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभे असल्याची भावना पूर्वांचल विकास मंचद्वारे आयोजित उत्तर भारतीय संमेलनात व्यक्त करण्यात आली. पूर्वांचल विकास मंच यांच्यावतीने उत्तर भारतीय संमेलनाचे भोसरी येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार तथा भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी हे उपस्थित होते. यावेळी उत्तर भारतीय नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उत्तर भारतीय मोर्चाचे…

Read More

  चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- जुनी सांगवीतील नागरिकांनी स्व. लक्ष्मणभाऊ आणि त्यांच्या कुटुंबावर कायम प्रेम केले आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. आताही तेच प्रेम आणि तोच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहून या विधानसभा निवडणुकीतही आमच्या विजयाचा विश्वास दुणावला असल्याची भावना; आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी जुनी सांगवी परिसरातील मधुबन सोसायटी, शितोळे नगर, पवार नगर, लक्ष्मी नगर, ममता नगर, पवनानगर, प्रियदर्शनी नगर, शिवांजली रोड भागात बैठका, कोपरा सभा तसेच महिला बचत गटांशी संवाद…

Read More

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर मनसेला मोठे खिंडार पडले असून महाराष्ट्र निर्माण सेनेचे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे के के कांबळे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या प्रवेशबाबत सांगताना के के कांबळे म्हणाले की, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी डॉ सुलक्षणा शिलवंत यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषित, नम्र, अभ्यासू, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न जाणणाऱ्या मागासवर्गीय महिलेला उमेदवारी देऊन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांना दिलासा निर्माण करून दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने एका सर्वसामान्य महिलेला संधी दिली त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य व मागासवर्गीय मतदार अतिशय…

Read More