Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचा घेतला आढावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी शहरातील भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासोबतच त्यांचे संगोपन, आरोग्य सेवा आणि नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण यासाठी ठोस उपाययोजना करा. पिंपरी चिंचवड शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा, अशा सूचना महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरीक्त आयुक्त विक्रांत बगाडे, नगरसदस्या वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर, अर्चना सस्ते, नगरसदस्य अनंत कोऱ्हाळे, मंदार देशपांडे, उत्तम केंदळे, संजय…

Read More

शहर सुधारणा समितीच्या बैठकीत आरोग्य, झोपडपट्टी, पर्यावरण, स्वच्छता आदी विषयांचा सविस्तर आढावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांच्या जीवनमानात अधिक सुधारणा करण्यासाठी नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची सर्वसमावेशक संरचना तयार करण्यात येणार आहे. शहराचा विकास करताना नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत नियोजनबद्ध पद्धतीने कामे राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे सभापती संजय नाना काटे यांनी दिली. शहर सुधारणा समितीची बैठक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात समितीचे सभापती संजय नाना काटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शहर…

Read More

आरोपींची सव्वा कोटींची मालमत्ता जप्त; फसवणुकीची रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाची पावले पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पुणे जिल्ह्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील ‘फ्लायनॉट सास प्रा. लि.’ (Flynaut Saas Pvt. Ltd.) या कंपनीने शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुण पदवीधरांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचे प्रकरण समोर आले होते. या गंभीर विषयावर आमदार  शंकर जगताप  यांनी आक्रमक भूमिका घेत विधानसभेत (दि . 10) तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आमदार शंकर जगताप यांनी तारांकित प्रश्नाच्या (प्रश्न क्रमांक २७८६८) माध्यमातून हिंजवडी आयटी पार्कमधील…

Read More

​पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा’ पुन्हा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने महापौर रवी लांडगे, क्रीडा सभापती कैलास कुटे आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना गुरुवारी विशेष निवेदन देण्यात आले. शहराला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलेला असून, महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेमुळे उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळत असे. मात्र, सन २०१९ मध्ये ही स्पर्धा शेवटची घेण्यात आली होती आणि त्यानंतर ती प्रलंबित असल्याने शालेय खेळाडूंमध्ये निराशेचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील घरेलू कामगारांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चा काढून मोठ्या घोषणा देत आपल्या मागण्यांचा आवाज बुलंद केला. महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आयोजित मोर्चामध्ये ,निमंत्रक राजू वंजारे, ज्ञानेश पाटील,कामगार नेते काशिनाथ नखाते,संतोष विभुते,महिलाध्यक्षा माधुरी जलमूलवार,जिल्हाध्यक्ष रुक्मिणी जाधव,लाला राठोड, सुनील भोसले,सुमित्रा जैसवाल, सुनंदा लोंढे,नंदा जाधव,कलावती शिंदे,अर्चना शिंदे,शितल धनगर,शोभा सरोदे,उषा दोडके,बिस्मिल्ला शेख आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांचे विविध प्रश्न आहेत, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज मोठ्या संख्येने घरेलु कामगार सहभागी झाल्या. घरेलू कामगार मंडळ सुस्थितीत पुनर्जीवित करावे, मंडळामध्ये नोंदणी असूनही त्यांना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “पुरस्कार हा केवळ एखाद्या व्यक्तीचा सन्मान नसून त्याने आयुष्यभर जपलेल्या मानवी मूल्यांचा, कष्टांचा आणि सामाजिक योगदानाचा सार्वजनिक गौरव असतो. पिंपरी-चिंचवड हे आज केवळ उद्योगांचे शहर राहिले नसून वैचारिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध झालेले शहर आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. मुख्य संपादक अविनाश कांबीकर यांच्या वतीने आयोजित ‘पिंपरी-चिंचवड सन्मान सोहळा २०२६’ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी शहराचे नवनियुक्त महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्ष नेते भाऊसाहेबजी भोईर, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदडे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष…

Read More

राज्य सरकारचा ‘मुक्त रिक्षा परवाना’ बंद करण्याचा निर्णय स्वागतार्ह डॉ बाबा कांबळे ​पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर करणाऱ्या ‘मुक्त रिक्षा परवाना’ धोरणाला अखेर राज्य सरकारने पूर्णविराम दिला आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी गेल्या चार वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि संघर्षाला मोठे यश आले असून, या निर्णयामुळे राज्यातील लाखो रिक्षा चालकांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. ​वाढत्या रिक्षा संख्येमुळे उत्पन्नावर गदा ​या निर्णयाचे स्वागत करताना डॉ. बाबा कांबळे म्हणाले की, “२०१७ मध्ये सरकारने मुक्त परवाना धोरण सुरू केल्यामुळे रिक्षांच्या संख्येत अफाट वाढ झाली होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड सारख्या शहरांमध्ये रिक्षेची…

Read More

मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपला पाहिजे – डॉ. किर्ती धारवाडकर एसबीपीआयएम मध्ये मराठी भाषा गौरवदिन आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. मराठी संतांनी आपल्या भजन, प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, कथा, नाटक, कादंबऱ्या, कवितासंग्रह तसेच इतिहास संशोधकांच्या बखर, प्रवास वर्णन, आत्मचरित्र अशा विविध साहित्यातून समाजाचे प्रबोधन करून अंधश्रद्धेवर प्रहार केले. यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध झाली. आपल्या भाषेचा हा समृद्ध वारसा आपण जपला पाहिजे असे मार्गदर्शन एसबीपीआयएम संस्थेच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांनी केले.    मराठी भाषा गौरवदिन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एसबीपीआयएम महाविद्यालय…

Read More

अन्न नागरी पुरवठा विभागाचे पुणे विभागीय पुरवठा उपायुक्त रमेश बेंडे सेवानिवृत्त ऑल महाराष्ट्र व पिंपरी-चिंचवड रेशन दुकानदार आणि पदाधिकाऱ्यांकडून कार्याचा गौरव पुणे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाचे विभागीय पुरवठा उपायुक्त रमेश बेंडे हे नुकतेच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात सहकारी अधिकारी, रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण निरोप दिला. या कार्यक्रमास पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे ‘सहाय्यक विभागीय पुरवठा अधिकारी दिनेश तावरे, ऑल महाराष्ट्र रेशन धान्य दुकानदार संघटनेचे खजिनदार विजय गुप्ता, पुण्याचे एफडीओ प्रशांत खताळ साहेब व त्यांचे सहकारी, पदाधिकारी, संघटनेचे लाजपत मित्तल, चिंतामणी सोनकर, भाजप…

Read More

– पुणे महानगर प्रदेशाच्या विकासाला गती देणार: डॉ. अभिजीत चौधरी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) नूतन महानगर आयुक्त म्हणून डॉ. अभिजीत चौधरी (IAS) यांनी सोमवारी (दि.9) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. मावळते महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. चौधरी यांनी पुणे महानगर क्षेत्राच्या सुसूत्र नियोजनासह रिंग रोड आणि मेट्रो प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, सहआयुक्त (प्रशासन) रुपाली आवले-डंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. मावळते महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे व अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी डॉ. चौधरी यांचे…

Read More