Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी (पिंपरी) येथे गुरुवार (दि.१२ मार्च) रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. औद्योगिक विकासाची योजना आखताना त्यांनी अविकसित भागांना प्राधान्य दिले. ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योग यांची सांगड घालत त्यांनी ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेला चालना दिली. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या नियोजनात त्यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी…

Read More

आठ प्रभागांसाठी आठ स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती; नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ होणार कार्यवाही पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या पशुवैद्यकीय विभागाशी संबंधित तक्रारींचे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे निवारण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील श्वानांच्या उपद्रवाबाबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने तसेच महापौर रवि लांडगे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नागरिक आणि नगरसेवकांना त्यांच्या समस्या थेट मांडता याव्यात व त्यांचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी क्षेत्रीय स्तरावर नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यापूर्वी तक्रारींचे निवारण प्रामुख्याने केंद्र स्तरावरून होत असल्याने कार्यवाहीस वेळ लागत होता. मात्र आता प्रत्येक प्रभाग स्तरावर तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी आठही प्रभागांसाठी…

Read More

स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी पिंपरी चिंचवड महापालिका ‘ॲक्शन मोड’मध्ये; देशात अव्वल येण्याचा महापालिकेचा निर्धार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – देशातील सर्वात मोठे स्वच्छता सर्वेक्षण मानल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची प्रक्रिया सध्या देशभरात जोमाने सुरू असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका यंदा देशात अव्वल स्थान मिळवण्यासाठी ‘ॲक्शन मोड’मध्ये कामाला लागली आहे. केंद्र सरकारच्या आवासन व शहरी कार्य मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणासाठी मार्च दरम्यान प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता उपक्रमांना अधिक वेग देत कचरामुक्त, स्वच्छ आणि सुंदर पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी विविध विभागांची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज मिळावा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता एकाच ठिकाणी व्हावी या उद्देशाने विरांगणा महिला महासंघाच्या पुढाकारातून विशेष महिला सक्षमीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये सुमारे ७५० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिरात महिलांना विविध शासकीय योजना, प्रमाणपत्रे आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन तसेच नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यांसह इतर महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत माहिती आणि सहाय्य देण्यात आले. तसेच महिलांसाठी उपयुक्त असलेल्या ई-श्रम कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी, मनरेगा योजना, बीओसीडब्ल्यू (BOCW) कामगार कार्ड, पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना, आयुष्मान भारत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि सर्वसमावेशक विकासाचा मार्ग दाखवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे चिंचवड येथे असंघटित कामगारांनी एकत्र येत जयंती साजरी केली. यशवंतरावांच्या ध्येयवादी कार्याची आठवण यावेळी काढण्यात आली. कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणाऱ्या यशवंतरावांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यशवंतरावजी चव्हाण यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रगतिशील महाराष्ट्राच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे, अशी भावना उपस्थित कामगार बांधवांनी व्यक्त केली. यावेळी नंदा जाधव, रुक्मिणी जाधव,आयशा चौधरी, रेखा गायकवाड़,रेशमा गायकवाड,निशा अलंकार प्रियंका चौहान,सचिन देडे, गजानन चौहान,विद्याधर वाघमारे,संतोष भट्ट,राजेंद्र साबले आदी उपस्थित होते

Read More

यशवंतराव चव्हाण यांनी कुशल नेतृत्व, लोकाभिमुख धोरणे आणि विकासाभिमुख विचारांच्या माध्यमातून रचला आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया – महापौर रवि लांडगे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, लोकाभिमुख धोरणे आणि विकासाभिमुख विचारांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला. त्यांचे कार्य, मूल्ये आणि राज्यकारभारातील संतुलित दृष्टी आजही प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात त्यांच्या प्रतिमेस तसेच वल्लभनगर व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर रवि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी आज पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल (वायसीएम) रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी संपूर्ण रुग्णालयाचा सविस्तर आढावा उपमहापौर यांना दिला. यावेळी उपमहापौर बाबर यांनी रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची प्रकृती, सुरू असलेले उपचार तसेच रुग्णालयात मिळणाऱ्या आरोग्य सेवांबाबत माहिती घेतली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, उपचारांची गुणवत्ता आणि विविध विभागांतील कामकाजाची पद्धत याचीही त्यांनी पाहणी केली. रुग्णालयातील ओपीडी, आपत्कालीन सेवा, तसेच इतर महत्त्वाच्या विभागांतील उपलब्ध वैद्यकीय सुविधा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.…

Read More

पीसीयू येथे टेक युअर चान्स – टेक्निऑन २०२६ महोत्सव संपन्न पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक शिक्षणापुरते मर्यादित राहू नये. अनुभव आधारित नव उपक्रम, नव संकल्पना सादर केल्या पाहिजेत यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या वतीने (पीसीयू) सुरू करण्यात आलेला “टेक युअर चान्स – टेक्निऑन २०२६” हा महोत्सव म्हणजे एक सर्वसमावेशक, मार्गदर्शक, उत्कृष्ट व्यासपीठ आहे. यामध्ये प्रयोग करा, स्पर्धा करा, नव कल्पना साकार करा आणि नेतृत्व घ्या हा मुख्य उद्देश आहे. आपली आवड आणि नवीन कल्पना प्रत्यक्ष कृती मध्ये ही एक मोठी संधी आहे, असे प्रतिपादन पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड…

Read More

उद्योजक आणि कामगार वाचविण्यासाठी गॅसचा राखीव कोटा द्या, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेची मागणी पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आखाती देशातील इराण – इस्राईल, अमेरिका या देशातील युद्धाचा प्रत्यक्ष फटका हा आपल्या भारत देशातील उद्योगांवर झाला आहे. त्यात कच्च्या मालाची किंमत वाढणे, आपला निर्यातक्षम पक्का व कच्चा माल तसाच बंदरामध्ये पडून राहणे आयात होणाऱ्या मालामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास अशा धातूंचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे. या युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे उद्भवलेल्या औद्योगिक गॅस पूरवठ्याच्या समस्येवर केंद्र व राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा व औद्योगिक गॅस पुरवठा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रत्येक प्रभागात मूलभूत नागरी सुविधा दर्जेदार आणि सुरळीतपणे मिळणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. योग्य दाबाने पाणीपुरवठा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, अतिक्रमणमुक्त रस्ते तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध आणि समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महापालिका शाळांमधील सुविधा अधिक सक्षम करणे, हॉकर्स झोनचे योग्य नियोजन करणे आणि ‘माझी वसुंधरा’ उपक्रमात शहराला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आरोग्य, अतिक्रमण, पाणीपुरवठा, स्थापत्य, उद्यान, पशुवैद्यकीय आदी विभागांचा आढावा घेण्यासाठी महापौर रवि लांडगे…

Read More