Author: maharashtrabreakingnews.com

साईदीप प्रतिष्ठानचा पुरस्कार सोहळा संपन्न पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘समाजासाठी सत्कार्य करणारे देवासमान असतात. यशवंतराव चव्हाण यांचे सत्कार्य आणि घराघरांतील महिलांचे कार्य वंदनीय आहे!’ असे गौरवोद्गार ह. भ. प. किसनमहाराज चौधरी यांनी संत तुकाराम उद्यान, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे (गुरुवार, दिनांक १२ मार्च) काढले. जागतिक महिलादिन आणि यशवंतराव चव्हाण जयंतीचे औचित्य साधून साईदीप प्रतिष्ठान – पुणे आयोजित यशवंत – वेणू आणि यशवंतराव चव्हाण उद्योजकता पुरस्कार तसेच महिला सन्मान सोहळ्यात किसनमहाराज चौधरी बोलत होते. याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे, कृष्णा मित्तल, ज्ञानेश्वर काळोखे, प्राचार्य भानुदास मालुसरे आणि साईदीप प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘करिअरकडे लक्ष देताना तथा संसाराचा गाडा ओढत असतानाच महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे’ असे मत पिंपरी – चिंचवडच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी व्यक्त केले. विविध भारती म्युझिकल इव्हेंट मार्फत “साथिया ये तुने क्या किया…” हा हिंदी – मराठी सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात पार पडला. यावेळी उपमहापौर बोलत होत्या. शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरिजादेवी कुदळे, प्रसिद्ध एकपात्री कलाकार शारदा मुंडे आदी उपस्थित होते. यावेळी महिलादिनाचे औचित्य साधून उपमहापौर बाबर यांच्या हस्ते मुंडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. बाबर म्हणाल्या की, ‘एखाद्या कुटुंबातील महिला आरोग्यसंपन्न असल्यास ती संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य व्यवस्थित…

Read More

यशवंत – वेणू गौरव सोहळा संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘आजच्या प्रगत महाराष्ट्राची पाळेमुळे यशवंतराव चव्हाण यांच्या द्रष्ट्या कार्यात आहेत!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे (गुरुवार, दिनांक १२ मार्च) काढले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने राष्ट्रपतींचे धोरणात्मक सल्लागार डाॅ. देवानंद शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डाॅ. अनिता शिंदे या दांपत्याला यशवंत – वेणू पुरस्कार प्रदान करताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठवाडा जनविकास संघ, पिंपरी चिंचवड व शारदा प्रतिष्ठान भालकी, बिदर यांच्या संयुक्तपणे सीमावर्ती भागातील भालकी तालुक्यातील (जि. बिदर) अट्टरगा, गुंजरगा, माणकेश्वर आणि बसवनवाडी येथील सहकारी प्राथमिक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा आणि मराठी प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘अभिमान मराठीचा, उत्सव मराठी भाषेचा’, या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत सीमावर्ती भागातील मराठी शाळांना आणि शिक्षकांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल ‘सन्मान चिन्ह’ देऊन गौरविण्यात आले. तसेच मराठी भाषेचे महत्त्व आणि संवर्धन या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान, विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याबद्दल जनजागृती करण्यात आली. भारताचे संविधान, ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराज गाथा,…

Read More

एमआयटी एडीटी विद्यापीठासमोर कचऱ्याच्या गाड्या अडवून तीव्र आंदोलन लोणी-काळभोर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून लोणी-काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायती व परिसरातील काही गावांकडून अद्यापही बेकायदेशीरपणे दररोज टाकल्या जाणाऱ्या ३५ ते ४० ट्रॅक्टर कचऱ्याविरोधात एमआयटी शिक्षण संकुलातील तब्बल ६००० विद्यार्थ्यांनी एल्गार करत पुन्हा तीव्र ‘कचरा बंद’ आंदोलन छेडले आहे. पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी गतआठवड्यात (दि. ०४ मार्च २०२६) विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘कचरा बंद’ आंदोलन करत कचरा वाहून नेणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ट्रॅक्टरांना कॅम्पसमधून नदीपात्राकडे जाण्यास मज्जाव केला. यानंतर पुणे शहर झोन-६ चे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी मध्यस्थी…

Read More

एमआयटी-एडीटी विद्यापीठात राष्ट्रीय परिषद पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – प्रत्येक सरकारी योजनेमागील हेतू विधायक असला तरी प्रभावी अंमलबजावणीच्या अभावामुळे अनेक योजना जनसामान्यांपर्यंत अपेक्षित प्रमाणात पोहोचत नाहीत. ‘विकसित भारत’ ही संकल्पना प्रेरणादायी असली, तरी तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व भारतीयांची सामूहिक जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत माजी खासदार तथा पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले. एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (एमआयटी-एसआयसीएस) तर्फे ‘विकसित भारत @२०४७ : सबलीकृत नागरिक, सक्षम धोरणे आणि मजबूत संस्था’ या विषयावर भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (आयसीएसएसआर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या. ‘विकसित भारत’…

Read More

– आमदार महेश लांडगे यांच्या लक्षवेधीवर राज्य शासनाचा प्रतिसाद – पुणे-पिंपरी-चिंचवडमधील रस्ते, विकास प्रकल्पाना गती देण्याची मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “पुणे मेट्रोपोलिटन रिजनमध्ये सुरू असलेल्या रस्तेविकास आणि इतर प्रकल्पांचे भूसंपादन करण्यासाठी गती देण्यात येईल. आवश्यक निधी महापालिका आणि राज्य शासन दोन्हीकडून उपलब्ध करून दिला जाईल. कालबद्ध नियोजनासाठी लवकरच आढावा बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पुणे मेट्रोपोलिटन रिजन (PMR) मधील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी आज विधानसभेत जोरदार चर्चा झाली. आमदार महेश लांडगे यांनी पुणे–नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडी आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेबाबत राज्य शासनाचे लक्ष वेधले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

– महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाठपुरावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर तसेच श्रीक्षेत्र आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी या प्रकल्पांकडे शासनाचे लक्ष वेधत निधी मंजुरीसाठी पाठपुरावा केला आहे. महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तालिका अध्यक्ष म्हणून योगेश सागर यांनी आमदार लांडगे यांच्या मागणी प्रतिसाद दिला. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत विविध योजनांसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. AMRUT-३ योजनेअंतर्गत शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पासाठी सुमारे २०१६ कोटी रुपये…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ, पुणे यांच्या वतीने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर देशसेवेसाठी समर्पित कार्य करणाऱ्या वीर पत्नी व वीर माता श्रीमती सुमेधाताई चिथडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महालक्ष्मी सभागृहात आयोजित या कार्यक्रमात सुमेधा चिथडे यांनी सैनिकांसाठी केलेल्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास समाजासमोर उलगडला. त्यांच्या अनुभवकथनाने सभागृहातील उपस्थित श्रोते भारावून गेले. सुमेधा चिथडे आणि त्यांचे पती स्वर्गीय योगेश चिथडे यांना भारतीय सैन्याबद्दल विशेष जिव्हाळा होता. सियाचेनमधील कठीण परिस्थितीत तैनात असलेल्या सैनिकांना ऑक्सिजनची गंभीर समस्या असल्याचे समजल्यानंतर त्यांनी तेथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्धार केला. लोकसहभागातून निधी उभारण्यासाठी सुमेधाताईंनी स्वतःचे दागिने विकून “पावनभिक्षा” हा उपक्रम सुरू केला. त्यांच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पीसीसीओइ सेंटर फॉर इनोव्हशन इनक्युबेशन अँड लिंकेजेस फोरमच्या (पीसीसीओइ – सीआयआयएल) यांच्या वतीने “इनोव्हेट-एक्स” ही तीन दिवसीय स्टार्टअप कल्पना सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी १५ मार्च रोजी, सकाळी १० वाजता, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पीसीइटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई व इतर प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पीसीसीओइचे संचालक, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस…

Read More