- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पत्रकारिता आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. पत्रकारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात रस निर्माण करून काम करावे. त्यामुळे लिखाण व्यापक, फुलेल आणि बहुअंगी होईल. पत्रकारांनी प्रचंड वाचन केले पाहिजे. मोजके आणि सकस लिहिले पाहिजे. वाटेल ते लिहू नये. चुकीवर प्रहार करावा आणि चांगल्याला चांगले म्हणावे, त्याचे कौतुक करावे. पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे. पत्रकारिता संपली, तर समाज संपेल, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. हेमंत देसाई यांनी व्यक्त केले. पत्रकारांना वेगळी नजर असली पाहिजे आणि ते टिपून छापता आले पाहिजे, असेही ते म्हणाले. अखिल मराठी पत्रकार संस्था महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आयोजित “पीसीएमसी टॉप…
पीसीसीओइ मध्ये महिला दिन साजरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘ती’ ने फक्त घरातील जबाबदाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता स्वतःच्या करिअर आणि वैयक्तिक आकांक्षा शोधून पुढे यावे. ‘ती’ ने आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाने व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन दोन्हीचे संतुलन साधावे. तसेच इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा ‘स्व’ ची ओळख स्वीकारली तर जीवनात आनंद मिळेल. सर्व क्षेत्रात आता महिला महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिला सक्षमीकरणाचा उत्सव आणि विविध क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची ओळख आहे असे पीसीइटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओइ) येथे महाविद्यालय अंतर्गत तक्रार समिती यांच्या सहकार्याने महिला दिनाचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी चांगलीच गाजली. शहर विकास आराखडा, जकात नाका जागेचा वापर आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र वाद रंगला. “स्मार्ट सिटी की डर्टी सिटी?” असा सवाल उपस्थित करत नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजावर जोरदार टीका केली. सुमारे चार तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेत अनेक नगरसेवकांनी अधिकारी व ठेकेदारांच्या कामाच्या पद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. सुरेश भोईर यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा करताना निखिल बोराडे यांनी धार्मिक स्थळांच्या स्थलांतरावर शुल्क लावू नये आणि स्थानिक शेतकऱ्यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. भोईर यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती करत सप्टेंबर २०२४…
आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक जमिनीचे कायमस्वरूपी हस्तांतर करण्याची मागणी पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा पाठपुरावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना आता वेग आला आहे. आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे हस्तांतरण आणि रावेत येथील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे आधुनिकीकरण या दोन महत्त्वपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा आमदार शंकर जगताप यांच्याकडून केला जात आहे. यासंदर्भात भाजपा महायुती सरकार सकारात्मक असून, आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक जमिनीचे हस्तांतर कायमस्वरूपी करणे आणि रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी 105 कोटी रुपयांची निधी देण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महासभेत नगरसदस्या स्नेहा कलाटे यांनी महापौर रवि लांडगे यांचा शहराचे प्रथम नागरिक या नात्याने विकास आराखडा समितीवर अध्यक्ष म्हणून समावेश करण्याची मागणी केली,महापालिका सभेत आपले मत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. महापौर रवि लांडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत केलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी शहराला अपेक्षित असे कार्यक्षम नेतृत्व मिळाले असल्याचे कलाटे यांनी नमूद केले. शहराच्या विकासाच्या दृष्टीने महापौर लांडगे यांनी विकास आराखडा समितीवर शहराचे प्रथम नागरिक या नात्याने समितीचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करावे, जेणेकरून शहराचा सर्वांगीण विकास अधिक पारदर्शक व प्रभावीपणे साधता येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर, पण तिथे आपल्या मुलांची सुरक्षा नक्की किती आहे? हा गंभीर प्रश्न उपस्थित करत आमदार अमित गोरखे यांनी राज्याच्या विधिमंडळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लावून धरला. शाळांमधील ‘ICC’ आणि ‘POSH’ समित्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या समित्यांचे ‘ऑडिट’ करणे आणि शाळांना त्यांच्या सुरक्षेनुसार ‘रेटिंग’ देणे, यांसारख्या क्रांतिकारी मागण्या आमदार गोरखे यांनी केल्या. आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. शाळांमधील सुरक्षा समित्या, स्वसंरक्षण शिक्षण आणि सुरक्षा मानके यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आमदार गोरखे यांनी केलेल्या मागणीला शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमदार…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – औंध येथील जिल्हा एकात्मिक आयुष रुग्णालयाची वाढती गरज लक्षात घेता या रुग्णालयाचे ३० खाटांवरून ५० खाटांपर्यंत उन्नतीकरण करण्यात यावे तसेच रुग्णांसाठी आवश्यक औषधे आणि आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विधान परिषदेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आमदार उमा खापरे यांनी मांडली. औंध परिसरासह पुणे शहर आणि उपनगरातील नागरिक आयुर्वेद, योग, नैसर्गिक चिकित्सा, युनानी आणि होमिओपॅथी अशा आयुष पद्धतींच्या उपचारांसाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र रुग्णसंख्या वाढत असताना सध्या उपलब्ध असलेल्या ३० खाटांची क्षमता अपुरी पडत असल्याचे आमदार खापरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. रुग्णालयात अधिक खाटा उपलब्ध झाल्यास अधिक रुग्णांना उपचार मिळू शकतील तसेच…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – फेरीवाल्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर रितू ताई तावडे यांची महानगरपालिका भवन येथे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी भेट घेतली. यावेळी फेरीवाल्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीत अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या आणि सर्वेक्षणामध्ये नाव असलेल्या फेरीवाल्यांवर कोणताही अन्याय होणार नाही,असे आश्वासन महापौर रितू तावडे यांनी दिले. शहराच्या अर्थव्यवस्थेत आणि दैनंदिन जीवनात फेरीवाल्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचे व रहदारीला अडथळा न करता व्यवसाय करावा असे त्यांनी नमूद केले. यावेळी नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन,फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने पथ विक्रेता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या पुनावळे आणि वाकड शाखांच्या वतीने दोन दिवसीय पुनेविला प्रीमियर लिग ३ या महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पुनावळे येथे करण्यात आले होते. रविवार, दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी राॅयल शेरनीज या विजेत्या संघाला करंडक प्रदान करून गौरविण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेविका रेश्मा भुजबळ यांनी, ‘महिला या जशा संगीतात नैपुण्य दाखवतात; तशा मैदानावर क्रिकेटही खेळू शकतात!’ असे गौरवोद्गार काढले. तर बक्षीस वितरण प्रसंगी स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी, संचालिका अर्पिता कुलकर्णी आणि गायक अथर्व कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्या संघासह सर्वांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अभय…
गांधी पेठ तालीम मित्रमंडळाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘एक स्त्रीच दुसर्या स्त्रीला समजून घेऊ शकते. त्यामुळे महिलांनी परस्परांशी स्नेहभाव जोपासावा!’ असे आवाहन ज्येष्ठ नगरसेविका अपर्णा डोके यांनी गांधी पेठ, चिंचवडगाव येथे (सोमवार, दिनांक ०९ मार्च) केले. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून गांधी पेठ तालीम मित्रमंडळाच्या महिला विभागाच्या वतीने विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करताना अपर्णा डोके बोलत होत्या. नगरसेविका मनीषा चिंचवडे, सामाजिक कार्यकर्त्या पूजा आगज्ञान, मंडळाच्या महिला विभाग अध्यक्षा गीतल गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी योग, वीरपत्नींसाठी कार्य, उद्योग, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आसावरी पाटील, स्मिता सुधीर माने, अनिता…
