- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाने आमदार स्थानिक विकास निधीचा उपयोग करण्यास ‘ब’ दर्जा असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना मंजुरी दिली आहे. आमदार शंकर जगताप यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्था पायाभूत सुविधांसाठी निधीचा लाभ घेऊ शकतील. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने ४ मार्च २०२५ रोजी यासंदर्भात शासन शुद्धीपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील तसेच या क्षेत्राला लागून असलेल्या ग्रामीण भागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जागेवर पायाभूत सुविधांची कामे आता आमदार निधीतून करता येणार आहेत. त्यासाठी एका आमदाराला वर्षभरात सोसायट्यांच्या एकूण २.५० कोटी रुपयांपर्यंतच्या कामांसाठी शिफारस करता येणार आहे. त्यासाठी शासनाने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी शाखा कार्यालय अंतर्गत आज दि.०६.०३.२०२५ रोजी गुरुवारी २२ केव्ही HA1 व HA2, पिंपरी फीडर वर अत्यंत तातडीचे दुरुस्तीचे कामे करायची आहेत. त्यामध्ये २२ kv पिंपरी गाव व २२ केव्ही वाघेरे फीडर वरील खालील ठिकाणचा वीज पुरवठा सकाळी ठिक १०.०० वाजेपासून ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. पिंपरीतील डेअरी फार्म रोड, अशोक थेटर, साई चौक, शनी मंदिर गल्ली, बालामल चाळ, गेलार्ड चौक, pwd वैष्णवी मंदिर गल्ली, वाघेरे कॉलोनी १,२,३,४, गीता निवास, जुना काटे पिंपळे रोड, समृद्धी हॉटेल समोरील परिसर, भीम नगर, शीतलादेवी, महालक्ष्मी मंदिर, माळी आळी, बालामाल चाळ, नाणेकर कॉम्पलेक्स जवळील परिसर इत्यादी. ठिकाणचा वीजपुरवठा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपळे निलख प्रभागाची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे पण वाढती लोकसंख्या या गोष्टी मुळे जागोजागी कचऱ्याची समस्या डोक वर काढत होती आणि याचाच परिणाम म्हणून अनेक सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहू लागले आणि प्रभागाच्या सौंदर्याला कळा लागली पण यावर आप चे रविराज काळे आणि मार्ग काढत एक शकल लढवली ज्या ज्या ठिकाणी असा कचरा जमा होतोय अशा ठिकाणी सेल्फी पॉईंट उभे करायचे ती जागा सुशोभित करायची पण कल्पना चांगली असून सुधा ती प्रत्यक्षात उतरण एवढ सोप नव्हतं शहरात काही ठिकाणी पालिका प्रशासाने हा उपक्रम राबविला होता पण प्रभागात हे शिवधनुष पेलन सोपी गोष्ट नव्हती पण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे जापनीज मेंदूज्वर (Japanese Encephalitis – JE) प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. १ ते १५ वयोगटातील बालकांसाठी १ मार्च २०२५ पासून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत अवघ्या तीन दिवसांत ३५ हजारांहून अधिक मुलांचे लसीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही मोहीम शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि विशेष लसीकरण शिबिरांमध्ये प्रभावीपणे राबविली जात आहे. शहरातील सर्व मुलांचे शालेय व समाजस्तरावर मोफत लसीकरण केले जात आहे. पालक या मोहिमेस मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. लसीकरण मोहिमेचा यशस्वी टप्पा संपूर्ण शहरात राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत ४…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘उन्नत लोकशाहीसाठी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या महाराष्ट्रात उपेक्षितांचा आवाज ऐकणारे संवेदनशील शासन असावे!’ असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरीगाव येथे व्यक्त केले. पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित वार्षिक शब्दोत्सव उपक्रमांतर्गत जीवनगौरव व अन्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मोरे अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ पत्रकार पीतांबर लोहार, कृषिभूषण सुदाम भोरे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची व्यासपीठावर आणि शिवाजी चाळक, संतोष गाढवे, आत्माराम हारे आदी मान्यवरांची सभागृहात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड येथील पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या 2025 ते 27 या दोन वर्षासाठी अध्यक्षपदी कासारवाडी ( पुणे)येथील युवा कार्यकर्ते श्रेयस पगारिया यांची तर विजय भिलवडे यांची कार्याध्यक्षपदी महासंघाच्या सभेमध्ये निवड करण्यात आली .महामंत्री पदी संदीप फुलफगर तर कोषाध्यक्षपदी नेनसुखजी मांडोत यांची एक मताने निवड करण्यात आली ..इतर कार्यकारणी सदस्यांचीही यावेळी निवड करण्यात आली निवड खालील प्रमाणे: वरिष्ठ उपाध्यक्ष :दिलीप भनसाळी, प्रकाश गदिया, दिलीप चोरडिया,उपाध्यक्ष:: – प्रकाश भंडारी,श्रेणिक मंडलेचा, शांतीनाथ पाटील, संजय खाबिया ,सह कोषाध्यक्ष :तुषार मुथा -, मंत्री:वीरेश छाजेड सुरगोंडा पाटील, प्रचार प्रसिद्धी प्रमुख -संदेश गदिया, धीरज नहार. कार्यकारिणी सदस्य–देवेंद्र पारख, अभिनंदन छाजेड ,गणेश मुथा,…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय,राज्यमार्गावरील अनधिकृत बांधकामे निष्कासन करण्याची मोहीम गत तीन दिवसापासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु आहे. यात ३ ते ५ मार्चदरम्यान विविध भागातील अनधिकृत बांधकामांवर लक्ष्य करण्यात येत असून एकूण ९०४ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. या कारवाईमुळे निश्चितच संबंधित भागातील वाहतुक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी पीएमआरडीएने विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून बुधवारी (दि.५) पुणे नाशिक रोड, पुणे सोलापूर रस्ता व पुणे चांदणी चौक ते पौड रस्ता अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सकाळी 9:30 वाजेपासून सुरु करण्यात आलेल्या या कारवाई जवळपास 252…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत माण- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ हा २३.२०३ किलोमीटरचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्राधिकरणामार्फत एकूण आवश्यक जागांपैकी ९९.९४ टक्के जागा मेट्रो सवलतकार कंपनीस उपलब्ध करून दिली असून आजघडीला मेट्रो प्रकल्पाचे काम ८३ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी पीपीपी तत्वावर करण्यास शासनाने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी मान्यता दिलेली आहे. मेट्रो लाईन – ३ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकरणाने शासनाच्या मान्यतेने मेट्रो सवलतकार कंपनी पुणे आय टी सिटी मेट्रो रेल लि. यांच्यासोबत सवलतकरारनामा केला आहे. यानुसार मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या सर्व जागा मेट्रो प्रकल्प बांधकामासाठी उपलब्ध करून…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी रानराई महोत्सव व २८ वे फुले, फळे, भाजीपाला बागा वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शन आयोजन करण्यासाठी तसेच ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेत मैलाशुद्धीकरण प्रकल्प बांधणे या कामाची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्त डेटा एन्ट्री ऑपरेटर्स यांना जीआयएस अनेबल ईआरपी अंमलबजावणीकरीता तात्पुरत्या स्वरूपात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी माणसांचा अभिमान द्विगणित झाला आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात त्या विविधतेत एकता आहे. त्यापैकी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर चा हा पहिला मराठी राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस. बी. पाटील पब्लिक स्कूल येथे गुरुवारी मराठी राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य बिंदु सैनि, उपप्राचार्य पद्मावती बंडा यांच्यासह कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनीं व सुलोचना पवार यांनी मराठी भाषा व महाराष्ट्र गौरव समूहगीत सादर…
