- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
कौशल्याधारित, रोजगारक्षम ‘गेम डिझाईन’ व ‘व्हीएफएक्स’ अभ्यासक्रम सुरु; प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव यांची माहिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कुल ऑफ डिझाईनमध्ये साडेचार हजार चित्रांतून सर्वात अधिक लांबीची कॉमिक स्ट्रीप साकारण्याचा ‘लॉंगेस्ट कॉमिक स्ट्रीप’, तसेच सलग २४ तास पेंटिंग करण्याचा ‘स्केचवर्स’ हा उपक्रम घेण्यात आला. यासह डॉ. डी. वाय. पाटील सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट, गुडस्पीड गेम्स आणि व्हिज्युअल बर्ड्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्याधारित व रोजगारक्षम दोन पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु डॉ. स्मिता जाधव यांनी दिली. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – औंध येथील शिवनेरी ब्रिगेडच्या पुढाकाराने अंतर्गत सुरक्षा बळकट करण्याच्या दृष्टीने १० ते १५ मार्च २०२५ या दरम्यान पाच दिवसीय सैन्य-नागरिक समन्वय प्रशिक्षण व सराव शिबीराचे आयोजन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण उपक्रमात भारतीय लष्कर, महाराष्ट्र पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), दहशतवादविरोधी पथक (एटीएस), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग आणि वैद्यकीय पथक यांच्या सहभागाने संयुक्त प्रशिक्षण व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांचा आढावा घेण्यात आला. शिवनेरी ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर एस. तलुजा यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाचा उद्देश नागरी आणि सैन्य प्रशासन यांच्यातील समन्वय वृद्धिंगत करणे, कार्यक्षमता सुधारणा करणे आणि आपत्ती व्यवस्थापनासह विविध आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे “झिंग २०२५” हा सांस्कृतिक कार्यक्रम, विविध बौद्धिक स्पर्धा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन प्रसंगी गुरुवारी (दि.२० मार्च) “मिसेस इंडिया २०२४” या फॅशन शोमध्ये प्रथम रणरअप झालेल्या सई खलाटे आणि शनिवारी (दि. २२ मार्च) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास चित्रपट अभिनेते अनिल गवस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होणार आहेत. एसबीपीआयएम व्यवस्थापन कौशल्य व संशोधनाला प्रोत्साहन देणारी राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त व्यवस्थापन संस्था आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून, झिंग या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक, उद्योजक आणि सामाजिक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘केवळ स्वराज्याची निर्मिती नाही तर मिळवलेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याचे अतुलनीय कार्य शिवरायांनी केले. त्यासाठी त्यांनी नेहमी रयतेच्या कल्याणाचाच विचार केला!’ असे प्रतिपादन लेखक व इतिहास अभ्यासक श्रीकांत चौगुले यांनी संत तुकारामनगर येथील सोहम ग्रंथालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘लोककल्याणकारी राजा शिवछत्रपती ‘या विषयावरील व्याख्यान प्रसंगी बोलताना केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण सुवर्णा, विश्वनाथ अवघडे, प्रकाश ब्राह्मणकर, ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर आदी उपस्थित होते. यावेळी चौगुले पुढे म्हणाले की, ‘मध्ययुगीन काळात अन्याय, अत्याचार यांनी परिसीमा गाठली होती. अशा पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली. कर्नाटकातील बेलवडी मल्लमाचे उदाहरण…
महापालिका चॅरिटेबल ट्रस्टची आर्थिक मदत देण्याची सूचना महापौर अभावी रुग्णांसह नातेवाईकांना अर्थसहाय्य मिळेना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरिब रुग्णांना मिळणारी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत बंद झाली आहे. सदर अर्थसहाय्य महापौरांच्या स्वाक्षरीने देण्यात येते. मात्र, आता महापौर नाहीत, तर आयुक्तांच्या स्वाक्षरीने अर्थसहाय्य करावे, अशी सूचना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना याबाबत पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शहरातील सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकर रुग्णांना आर्थिक मदत व्हावी. या उद्देशाने दि. 4 सप्टेंबर 1991 रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. याद्वारे वैद्यकीय…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग क्षेत्रिय कार्यालयासमोर थेरगाव येथे नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज पासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले. डांगे चौक,रहाटणी फाटा, १६ नंबर आदी परिसरामध्ये अत्यंत अमानुष पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने, दंडूके शाही पद्धतीने कारवाई करण्यात येत असून फेरीवाला प्रमाणपत्र न देता हॉकर झोनची अंमलबजावणी न करता चुकीच्या पद्धतीने कारवाई क्षत्रिय अधिकारी किशोर ननावरे करत आहेत याचा निषेध करत हे उपोषण सुरू करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग क्षेत्रिय कार्यालय क्षेत्रामध्ये असणाऱ्या गोरगरीब, पथारी, हातगाडी, स्टॉल ,धारकावरती अत्यंत अमानुष पद्धतीने बेकायदेशीरपणे चुकीच्या पद्धतीने कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले जात आहे .…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – या धोरणांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील ७ ई रिक्षा धारकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते प्रत्येकी ३० हजार रुपये अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. मागील महिन्यात देखील या ई- वाहन धोरणांतर्गत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते १२ ई – रिक्षा धारकांना अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले होते. अशा एकूण शहरात आत्तापर्यंत १९ ई- रिक्षा धारकांना अनुदान धनादेशाचे वाटप करण्यात आले. राज्यात वाहनातून निघणाऱ्या धुरांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने २०२१ पासून राज्यात ई- वाहन धोरण राबविण्यात येत आहे. या अंतर्गत इलेक्ट्रोनिक वाहन खरेदी करणाऱ्यांना अनुदान…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी मार्गदर्शक आणि सांगवी येथील बाबुराव घोलप महाविद्यालयातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिकेने पीएचडी विद्यार्थ्यांकडून लाच घेतल्याच्या प्रकरणावर विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा झाली. आमदार शंकर जगताप यांनी या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना प्रश्न विचारले. पीएचडी मार्गदर्शकांकडून होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर उयोययोजना करावी, अशी आग्रही मागणी आमदार जगताप यांनी केली. आमदार शंकर जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये संबंधित प्राध्यापिकेच्या अटकेसह, विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांवरील नियंत्रण, विद्यार्थ्यांची गैरसोय, आणि पीएचडी मार्गदर्शकांकडून होणाऱ्या गैरप्रकारांवर सरकारने कोणती पावले उचलली आहेत, या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. या प्रश्नांना उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा मुद्दा विधानसभेत गाजला. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात या गंभीर मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याची माहिती दिली. चिखलीत अवैध गॅस भरणीचा प्रकार आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होली गावात भरलेल्या सिलेंडरमधून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे अवैध प्रकरण उघडकीस आल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार यांनी सदर घटना चिखली गावठाण येथे घडल्याचे स्पष्ट केले. तसेच, अशा प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता असल्याचे मान्य केले. *गॅस चोरी आणि…
धर्माविषयीचे तर्क-कुतर्क थांबवा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपल्या धर्माविषयी परंपरेविषयी कोणी विनाकारण तर्क कुतर्क करत असेल तर तो थांबविण्यासाठी आणि देवाच्या नाम साधनेचा आग्रह धरण्यासाठी भगवंताने आपल्याला जी वाचा दिली आहे, त्याचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांनी आज केले. श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्याची समाप्ती माऊली महाराज यांच्या कीर्तनाने झाली, त्यावेळी ते बोलत होते. काल्याच्या कीर्तनासाठी त्यांनी प्रेमाद्भुतसिंधू, कुळसागरइंदू, कान्हाप्रिय बंधू, गुणातीत साधू जगद्गुरु तुकोबारायांचा गवळणीपर प्रकरणातील अभंग घेतला होता. गोड लागे परी सांगतांचि न ये । बैसे मिठी सये आवडीची ॥१॥ वेधलें वो येणें श्रीरंगरंगें । मी हे…
